Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापुरातील आठरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. याबाबत त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदे गटाचे नेते मनीष काळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नव्याने शिंदे गटात दाखल झालेले सागर शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्यासह आठरा पदाधिकाऱ्यांनी रामराम ढोकल्याचे जाहीर केले.
MUMBAI | शिवसेनेच्या बैठकी नंतर आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
उपनेते आणि संपर्क प्रमुखांची बैठक होती
उपनेते जोमाने काम करत आहेत
अधिक जिद्दीने काम करा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले
काही उपनेत्यांवर अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे
उद्धव ठाकरे देखील लवकरच दौरा करणार आहेत
त्यांच्या दौऱ्याची आखणी सुरू आहे
ऑन आशिष शेलार
ते सारखं भूमिका बदलताहेत
आधी वांद्रे आता ते वरळीमध्ये येत आहेत
आम्ही करून दाखवलं आहे
आम्ही आमचं काम घेऊन लोकांसमोर जाणार आहोत
दोन वर्षात महाराष्ट्राला केंद्राने निधी दिला
स्मार्ट सिटीची पिंपरी चिंचवडमध्ये घोषणा झाली
आज त्यावरून आरोप होत आहेत
मुंबईत त्यांचं योगदान काय
बुलेट ट्रेन आहे पण त्याने मुंबईचा विकास होणार आहे का?
आम्ही आमच्या सरकारच्या काळातील कामं घेऊन लोकांच्या पुढे जाऊ
पण त्यांनी केंद्र सरकारच्या पाच योजना मुंबईमध्ये दाखवून द्याव्यात
वाढत्या अवैध धंद्यामुळे दादागिरीचा जोर प्रचंड वाढला आहे. बुलढाणा शहर हे क्राईमकडे वळताना दिसत आहे. छोट छोट्या कारणावरून शहरात वाद होत आहे. काल रात्री साडेनऊ दरम्यान दोन गटात तुफान जीवघेणी हाणामारी झाली. हा हाणामारीत एकाच गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे.बुलडाणा शहरातील गजानन टॉकीज जवळ ही घटना घडली
सोलापूर : ग्रामस्थांचा पाठलाग चुकविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या चोराचा मृत्यू झाला असून, १८ तासांनंतर चोराचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे या गावात मध्यरात्री चोरट्यांनी गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने पळविले.बाहेर जाताना गावातील युवकांना माहिती झाल्यानंतर त्यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. ग्रामस्थांना घाबरून चोराने पळ काढला आणि गावातील एका विहिरीत उडी घेतली.मात्र,या चोरट्याचा विहिरीत जीव गेला.गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.जीवरक्षकांना बोलावून शोध घेण्यात आला.मोटारीच्या सहाय्याने पाणी काढून शोध घेतल्यानंतर तब्बल १८ तासांनी या चोराचा मृतदेह सापडला.त्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला.
वर्धा जिल्ह्यातील अल्लिपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कानगाव माजरी रस्त्यावर ठेवून असलेला ३ हजार लिटर क्षमतेचा ३ लाख रुपये किंमतीचा टॅकर अज्ञात चोरट्याने पडविल्याची घटना उघडकीस आली असुन यासंबंधी टॅकर हेमंतराव माळोदे यांनी अल्लिपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंतराव माळोदे हे ठेकेदारी करीत असुन त्यांनी रसत्याच्या कामासाठी आपला टॅकर रसत्याच्या कडेला उभा करून ठेवला होता.मात्र अज्ञात चोरट्याने हा ३ लाख रुपये किंमतीचा टॅकर पळवून नेला अशी तक्रार टॅकर हेमंतराव माळोदे यांनी अल्लिपूर पोलिस ठाण्यात दिली असून घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनिल गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनिल गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.
यवतमाळ: वाहनासह सुगंधित गुटखासाठा जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. घाटंजी रोडवरील पांढरी गावाजवळ करण्यात आलेल्या कारवाईत एकूण सहा लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मनिष राजकुमार हेमनानी (वय 34), नितीन प्रकाश हेमनानी (वय 26, दोघेही रा. पळसवाडी सिंधी कॅम्प) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. घाटंजी येथून यवतमाळकडे सुंगधित गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून यवतमाळ वाहतूक उपशाखेच्या पथकाने घाटंजी रोडवरील पांढरी गावानजीक नाकाबंदी केली. यावेळी वाहन येत असताना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता त्यात एकूण एक लाख 44 हजारांचा गुटखा आढळून आला. दोघांवरही यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
भारतात शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नव्या आकडेवारी जारी केली आहे.
#COVID19 | India reports 13,272 fresh cases and 13,900 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 20, 2022
Active cases 1,01,166
Daily positivity rate 4.21% pic.twitter.com/tZJumfGmBl
देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला, ८ ठार
#BreakingNow: सोमालिया की राजधानी मोगादिशू के एक होटल में आतंकी हमला, 8 लोगों की मौत@iamdeepikayadav #Mogadishu #Somalia pic.twitter.com/NFY6n30PCd
— Times Now Navbharat (@TNNavbharat) August 20, 2022
भारत वि. झिम्बाब्वे दुसरी वन डे आज होणार, भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता हरारे येथे मॅच सुरू होणार, तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिली वन डे जिंकल्यामुळे भारत १-० असा आघाडीवर
मुंबईत आज स्टार्टअप यात्रा, सकाळी १० ते संध्याकाळी ६ मुंबई विद्यापीठ, फोर्ट तसेच एच.आर.कॉलेज, चर्चगेट आणि हिंदुजा कॉलेज, चर्नीरोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्टार्टअप सादरीकरण. स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या तिघांना पुरस्कार देणार. जिल्हास्तरिय पुरस्कार. पहिला पुरस्कार २५ हजार रुपये, दुसरा पुरस्कार १५ हजार रुपये आणि तिसरा पुरस्कार १० हजार रुपये. पुरस्कार विजेते ३ तसेच सर्वोत्तम ठरलेल्या आणखी ७ अशा दहा जणांना राज्य पातळीवर सादरीकरणाची संधी मिळणार. आणखी माहिती msins.in आणि 022-22626303 येथे उपलब्ध.
रायगडमध्ये दोन बोटी मिळाल्यापासून तर मुंबईत पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला भारताबाहेरच्या एका नंबरवरून दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आल्यापासून हाय अलर्ट, रायगड जिल्ह्यात आणि मुंबईत हाय अलर्ट
आज पुन्हा एकदा कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून 32 हजार क्यूसेकनं विसर्ग करण्यात येणार आहे. 4 फूट 6 इंचाने धरणाचे दरवाजे उघडले जातील. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे लखनऊ आणि आसपासच्या परिसरात भूकंप झाला आहे. 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडल्याचं वृत्त आहे.
An earthquake of magnitude 5.2 occurred at 139km north-northeast of Lucknow, Uttar Pradesh at around 1.12 am, today. The depth of the earthquake was 82 km below the ground: National Center for Seismology
— ANI (@ANI) August 19, 2022
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळपासून चीनपर्यंत हे धक्के जाणवले.
गणेशोत्सव आणि दहीहंडीदरम्यान कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल झालेले गुन्हे मागे घेणार. गुन्ह्यात जीवितहानी झाली नसेल, खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे पाच लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले नसेल तरच गुन्हे मागे घेणार. लोकप्रतिनिधींवर गुन्ह्यासंदर्भात न्यायालयाची परवानगी आवश्यक. विद्यमान व माजी खासदार, आमदार यांचा समावेश असेल, तर हे गुन्हे मागे घेताना उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेतले जाणार नाही.