LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 21 August 2022 Latest Update: मुंबईमधील खेतवाडीत गणपतीचे आगमन

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 21 August 2022 Latest Update
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 21, 2022  |  09:56 PM (IST)
समलिंगींना सेक्सची परवानगी पण लग्नासाठी मनाई, ३७७ ए रद्द
Aug 21, 2022  |  09:55 PM (IST)
यानम : भारताच्या मंगळ मोहिमेवरील पहिली संस्कृत डॉक्युमेंट्री
Aug 21, 2022  |  09:54 PM (IST)
बुलढाणा -  2024 चा बुलढाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच - चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल सायंकाळी बुलढाणा शहरात आले होते. त्यांनी भाजपची जिल्हा बैठक घेतली. यावेळी बावनकुळे यांनी 2024 चा बुलढाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणा केली. यामुळे नुकतेच शिंदे गटात गेलेले आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. भाजपने मिशन बुलढाणा लोकसभा चांगलेच मनावर घेतले. त्यामुळं 2024 मध्ये आपण भाजप-शिंदे सेना युतीचे उमेदवार राहू. या खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फेरले जाणार असल्याची शक्यता आहे.

यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हणाले की, बुलढाण्याचे खासदार हे प्रतापराव जाधव आहेत आणि एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेचे बारा खासदार खासदारांचा लोकसभेतील गट आहे त्यांची आणि आमदारांची भाजपासोबत युती आहे. काल बावनकुळे साहेब बुलढाण्यात येऊन गेले कदाचित ओघात त्यांनी बोलून गेले असतील, त्यांना असे बोलायचे असेल की शिवसेना भाजपचा खासदार या ठिकाणी असेल आणि त्यांनी जाणून-बुजून असे केला असेल तर भविष्यात त्यांच्याकडून असं काही होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांकडे केली आहे..

ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत आणि ते भाजप सेनेच्या युती सोबत आहेत त्याठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये. त्यांनी त्या ठिकाणी युतीची भाषा वापरावी अशा प्रकारची समज देण्यासंदर्भात मी वरिष्ठांना कळवलेले आहे. असं संजय गायकवाड यावेळी म्हणाले.

Aug 21, 2022  |  05:13 PM (IST)
झोमॅटोने मागितली माफी, हृतिकची जाहिरात मागे घेतली
Aug 21, 2022  |  05:12 PM (IST)
जयसूर्याने घेतली जय शहांची भेट
Aug 21, 2022  |  05:12 PM (IST)
इकबाल कासकर याला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले
Aug 21, 2022  |  04:24 PM (IST)
औरंगाबाद - आमदार संजय शिरसाठ यांना मंत्रिपद न मिळाले पुन्हा जाहीर केली नाराजी

आमदार संजय शिरसाठ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने त्यांची नाराजी ही अद्यापही कायम आहे,भाजप मंत्री अतुल सावेंच्या वडिलांसोबत संजय शिरसाठ यांनी काम केले मात्र,मंत्री अतुल सावे हा मागून आला काय,राज्य मंत्री झाला काय,कॅबिनेट मंत्री झाला काय,मात्र आता आमच्याकडे पन पहा ना,असे म्हणत संजय शिरसाठ यांनी मंत्री पद न दिल्याने नाराजी बोलून दाखवली.

भाजपचे अतुल सावे मागून आले आणि दोन वेळा मंत्री झाले तरी संजय शिरसाठ यांना मंत्री पद न मिळाल्याने आजकाल सिनेरीटीचे काही राहिलेच नाही की काय असं वाटू लागलं असल्याचे म्हणत आमदार संजय शिरसाठ यांनी नाराजी अप्रत्यक्षपणे भाजप मंत्र्यासमोर बोलून दाखवले दिली. आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Aug 21, 2022  |  02:34 PM (IST)
BULDHANA | भाजप सरकारची नियत साफ आहे असे दिसत नाही - अभियंता पांढरे

जलसंपदा विभागाच्या सिंचन प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर होता. याप्रकरणी पवार यांना क्लिनचीट मिळाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दहा वर्षात काहीही चौकशी झाली नाही. मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव घेतले नसले तरी त्याच अनुशंगाने सर्वकाही होते. 

ट्विटमुळे राज्याचे राजकारण हे ढवळून निघाले होते. बीजेपी सरकारची नियत साफ आहे असं दिसून येत नाहीये. कंबोज यांनी केलेले ट्विट किती प्रामाणिक आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय करतात व मोदींनी जर काही केले नाही तर मोदींवरचाही विश्वास उडणार आहे. असं वक्तव्य माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले आहे.

Aug 21, 2022  |  12:01 PM (IST)
बुलढाणा - 'त्या' दहीहंडीला गालबोट लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला- आमदार श्वेता महाले

तुफानी जल्लोषात चिखलीत शुक्रवारी सायंकाळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड मोठ्या संख्येने गोविंदांची लाट उसळली. डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचणाऱ्या तरुणाईचे दृश्य चिखलीकरांनी अनुभवले. निमित्त होते श्वेता महाले यांच्यावतीने भाजपा युवा मोर्चाद्वारे आयोजित दहीहंडी उत्सवाचे. विदभार्तील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन आ. महाले यांच्या पुढाकाराने चिखलीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेन हिने हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या दहीहंडी उत्सवासाठी जिल्हाभरातून तरुणांनी हजेरी नोंदविली होती. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

या उत्सवासाठी 2 लाख 51 हजार रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करण्यात आली.  मात्र दोन गटात हाणामारी झाली अशी कुठलीही तक्रार पोलिसात आलेली नाही. ग्रामीण भागात किंवा ग्रामीण महाराष्ट्रात सेलिब्रिटी पोहोचत नाही. तरुणांमध्ये एक उत्साह सेलेब्रिटीला पाहण्यासाठी होता. तीस ते चाळीस हजाराचा मॉब या ठिकाणी होता. त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या घटना घडतात. मोठी जर घटना असती तर कुठेतरी तक्रार झाली असती. मात्र गोविंदा पथकामध्ये अशी काही घटना घडलेली नाही. कुठेतरी विरोधकांमध्ये पोटशूळ उठलं आणि राजकीय गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते असल्याची प्रतिक्रिया आ. श्वेता महाले यांनी केला आहे.

Aug 21, 2022  |  11:36 AM (IST)
माता वैष्णोदेवी यात्रा तुर्तास स्थगित, श्राइन बोर्डाचा निर्णय

जम्मू-काश्मीरमध्ये  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णोदेवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या श्राइन बोर्डाकडून भाविकांना खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा तुर्तास स्थगित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Aug 21, 2022  |  09:18 AM (IST)
दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात लूक आउट नोटीस

दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सिसोदिया यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सीबीआयनंही लूक आऊट नोटीस जारी केली आहे. सिसोदिया यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. 

Aug 21, 2022  |  08:33 AM (IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती  दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. तसेच फडणवीस आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाहाला ही उपस्थित राहणार आहेत.

Aug 21, 2022  |  07:00 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर आज काँग्रेस करणार आंदोलन

मुंबई मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी काँग्रेस आज आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

Aug 21, 2022  |  06:10 AM (IST)
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये पावसाचं थैमान सुरू आहे.हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी दरड कोसळल्याने एकूण २२ नागरिक मृत्युमुखी पडले

Aug 21, 2022  |  06:09 AM (IST)
आज मुंबई हाफ मॅरेथॉन, सचिन तेंडुलकर दाखवणार हिरवा झेंडा

आज मुंबई हाफ मॅरेथॉन आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज मुंबई हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवेल. हाफ मॅरेथॉन जिओ गार्डन, बीकेसी येथे सुरू होईल. 

Aug 21, 2022  |  06:08 AM (IST)
उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज होणार पत्रकार परिषद

 उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद  दुपारी साडेबारा वाजता एमसीए, बीकेसी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Aug 21, 2022  |  06:06 AM (IST)
ताम्हिणी घाटात भीषण अपघात; तीन जण ठार, चार जखमी

ताम्हिणी घाटात शनिवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.