Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.
मुंबई - सकिनाका परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती नसीम शेख याची बायको रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांचे प्रेमसंबंध होते असा संशय नसीमला होता. म्हणून, नसीम ने रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने नसीम याचा गळा दाबून हत्या केली.
साकीनाका पोलीस ठाणेत अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीनी तक्रारी दाखल केली. सुन रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तीक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवुन ठेवला. या तक्रारी नंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू विजयी; पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा जल्लोष
फटाके फोडून तसेच एकमेकांना लाडू भरवून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात जल्लोष केला
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, पुण्यात पेढे वाटून, ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करत विद्यार्थ्यांचा जल्लोष
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या वाटचालीत द्रौपदी मुर्मू यांच्या रुपानं पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. त्यानिमित्ताने पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 400 आदिवासी विद्यार्थी आणि ईश्वर पूरम प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेश व नागालँडमधील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, ढोल-ताश्याच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून आणि पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रपती झाल्यानिमित्त अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या पत्रात मुर्मू यांच्याकडे भेटीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरचे घर जप्त, ईडीची कारवाई. इक्बाल मिर्ची प्रकरणात कारवाई.
धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मूळ शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांसह साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी बंड करीत नवी चूल मांडल्याने आता धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्षप्रमुखांविषयी व मूळ शिवसेनेविषयी निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आमदारांच्या बंडखोरी केली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांकडून आपण उद्धव ठाकरे गटातील मूळ शिवसैनिक असल्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्याचे आदेश राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार धुळे शहरातील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी व शिवसैनिकांकडून ही स्टॅम्प भरून घेतले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार २२ जुलै २०२२ रोजी दिल्ली दौरा करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सल्लामसलत करणार. महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार; सूत्रांची माहिती.
Presidential Election Result 2022 LIVE: द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दुसऱ्या फेरीनंतर १३४९ मतांची आघाडी (मतमूल्य: ४ लाख ८३ हजार २९९), यशवंत सिन्हा यांना मिळाली ५३७ मते (मतमूल्य: १ लाख ८९ हजार ८७६)
राज्यात नवे सरकार स्थापन होऊन केवळ 15 दिवस झाले आहेत, अद्याप ही नवीन सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही तरी देखील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावा करत आहेत यावर माजी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. बांठीया आयोग आमच्या सरकारने नेमला होता, आयोगाला ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश आमच्या सरकारने दिले, न्यायालयात वकील आम्ही नेमले, आयोगाचा अहवाल आम्ही सत्तेत असताना आला तर मग हे सरकार आमच्या मेहनतीचे श्रेय कसे घेऊ शकतं असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
नागपुरचे माजी काँग्रेस शहरअध्यक्ष शेख हुसेन ह्यांनी जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते त्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शेख हुसेन, माजी पालकमंत्री नितीन राऊत, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, नागपूर ग्रामीणअध्यक्ष राजेन्द्र मुळक असे अनेक काँग्रेसचे नेत्यांची नावे याचिकेत आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी आहे.
सोनिया गांधींची आजची ED चौकशी संपली पुढील चौकशी सोमवार २५ जुलै २०२२ रोजी होणार. आज सुमारे दोन तास झाली सोनिया गांधी यांची चौकशी.
संसदेतील (राज्यसभा आणि लोकसभा) ७४८ खासदारांपैकी ५४० (मतमूल्य ३ लाख ७८ हजार) मते एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळाली. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ (मतमूल्य १ लाख ४५ हजार ६००) मते मिळाली. १५ खासदारांची मते अमान्य झाली. राज्यांच्या आमदारांच्या मतांची मोजणी सुरू आहे.