Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
भारताने झिम्बाब्वे विरुद्धची तीन वन डे मॅचची सीरिज ३-० अशी जिंकली
That's that from the final ODI.
— BCCI (@BCCI) August 22, 2022
A close game, but it was #TeamIndia who win by 13 runs and take the series 3-0 #ZIMvIND pic.twitter.com/3VavgKJNsS
केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या 'भारत के अग्निवीर' या चित्रपटाचा मुहूर्त तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार होणार आहे
केंद्र शासनाच्या #अग्निपथ योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तयार होत असलेल्या 'भारत के अग्निवीर' या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा तसेच पोस्टरचे प्रकाशन राज्यपाल @BSKoshyari यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. हा चित्रपट विविध भारतीय भाषांमध्ये तयार होईल.#Agniveer pic.twitter.com/IDtJwFDQzo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 22, 2022
६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून वृध्देची हत्या नात्यामधील अल्पवयीन मुलाने केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. हत्येसाठी अल्पवयीन मित्राचीच मदत घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. खामगाव तालुक्यातील उमरा लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळा दाबून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी हा नात्यातील असावा असे काही पुरावे खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या हाती लागले. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असता वृध्द महिलेच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या सहाय्याने आजीचे हत्याकांड घडविल्याचे समोर आले. दोन्ही आरोपी अल्पवयीन असून त्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.
डिस्काउंट दिलं नाही म्हणून कल्याणमध्ये एका कपड्याच्या दुकानात काही जणांनी राडा केल्याची घटना काल कल्याणमध्ये घडली. हा राडा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीनुसार कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपड्यांवर डिस्काउंट देत नाही म्हणून गावगुंडांचा हैदोस, दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण pic.twitter.com/mR4dPBUMF2
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 22, 2022
दरम्यान घडलं असं की, भिवंडीमध्ये कोन गावमध्ये राहणाऱ्या काही तरुणांनी कल्याणच्या रंगोली या कपड्याच्या दुकानातून साड्या व ड्रेस घेतले होते. त्यानंतर त्यांनी दुकानदाराकडे डिस्काउंट मागितलं. दुकानदाराने डिस्काउंट देण्यास नकार दिल्याने या तरुणांनी दुकानातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत वाद घातला व कर्मचाऱ्यांना मारहाण करत दुकानातील खुर्च्याची मोडतोड केली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाद घालणाऱ्या ८ आरोपींपैकी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चारचाकी वाहनचोराला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. चोराने वाहन चोरण्याचा हेतू सांगितल्यावर पोलिसांनी देखील कपाळावर हात मारला. हा चोर चक्क गुजरातमध्ये दारू तस्करीसाठी चंद्रपूरातील वाहने चोरायाचा असं यावेळी समोर आलं आहे. सतनाम सिंग प्रतापसिंग बावरी असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गुजरात राज्यातील वडनगर येथील लखनसिंह त्रिपालसिंह सरदार हा फरार आहे. आरोपीकडून 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 20 ऑगस्टला शास्त्रीनगर व भवानजी भाई हायस्कूलजवळ राहणारे पंकज मिश्रा व मानविर सिंग ठिल्लर यांनी चारचाकी वाहन चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्याआधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा पाठलाग केला. चोरी केल्या गेलेली वाहने शहरातील जुनोना रोड बाबूपेठ परिसरात आढळून आले. बुलढाणा जिल्ह्यातील सतनाम सिंग प्रतापसिंग बावरी यास पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने वाहन चोरी केली केल्याची कबुली दिली.
भारत ५० ओव्हरमध्ये ८ बाद २८९ धावा. शुभमन गिल १३०, ईशान किशन ५०, शिखर धवन ४०, केएल राहुल ३०, संजू सॅमसन १५ धावा. झिम्बाब्वे ४.२ ओव्हरमध्ये १ बाद १८ धावा. (खेळ सुरू आहे) । भारताकडे ३ वन डे मॅचच्या सिरिजमध्ये २-० अशी विजयी आघाडी आहे, आज शेवटची मॅच आहे
काळी जादू करण्यासाठी ७० लाखांचा मांडूळ साप विकणाऱ्या टोळीला कल्याणच्या DCP स्कॉडने अटक केली आहे. मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली तसेच मांडूळ साप ताब्यात घेतला. या टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकलाय याचा तपास आता पोलीस करत आहेत.
काळ्या जादूसाठी ७० लाखांचा मांडूळ सापाची तस्करीच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या... pic.twitter.com/bhdHQHlbGZ
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 22, 2022
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली की पालघर येथे राहणारे काही लोक मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार आहेत. डीसीपी स्कॉडचे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरेसह पथकाने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अग्रावाल कॉलेजजवळ सापळा रचला. तीन दुचाकीवरून सहा लोक येताना पोलिसाना दिसले. डीसीपी स्कॉडच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी या सहा जणांना थांबवलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मांडूळ साप आढळला.
आज सकाळी 10 वाजता अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाली. तेव्हा विधानसभेचे तालिका सभापती आ. संजय शिरसाट यांची सभागृहात एन्ट्री होताच उपस्थित आमदारांनी संजय शिरसाट यांचे स्वागत करत 'चला काही तरी मिळाल', असा टोमणा मारला. त्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला.
संजय राऊत यांची 5 सप्टेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी वाढवली
आज पहाटेपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची रिपरिप सुरू आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक आणि सातारा जिल्ह्यात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. पुण्यात पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.