LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 22 July 2022 Latest Update: ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; "गोष्ट एका पैठणीची" उत्कृष्ट मराठी चित्रपट

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 22 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 22, 2022  |  06:15 PM (IST)
मुक्ताईनगरात रोहिणी खडसे यांचे पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन

जळगाव : समर्थकाला मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध मुलीचे सहलीचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मिडियावर व्हायरल केल्याने मुलीसह तिच्या आईने खडसे समर्थकाला भररस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. आता या घटनेवरुन मुक्ताईनगर शहरात खडसे समर्थकही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह खडसे समर्थक हे पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत. खडसे समर्थक नगरसेविका पूत्राला मारहाण केल्यावर मुक्ताईनगरात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे. तरुणीसह तिच्या आईने भररस्त्यात अशा पध्दतीने मारहाण करायला नको होती, ही चुकीची बाब आहे, न्याय व्यवस्थेवर प्रत्येकाचा विश्वास असायला हवा. त्यांनी कायदेशीरपध्दतीने न्याय मागायला हवा, असे यावेळी धरणे आंदोलन करणाऱ्या रोहिणी खडसे यांनी सांगितलं आहे.

Jul 22, 2022  |  04:56 PM (IST)
68th National Film Awards: ६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पुरस्कार विजेत्यांची घोषणा

68th National Film Awards: ६८वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पुरस्कार विजेत्यांची घोषणा

Jul 22, 2022  |  05:34 PM (IST)
६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; "गोष्ट एका पैठणीची" उत्कृष्ट मराठी चित्रपट
६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा उत्कृष्ट मराठी चित्रपट - गोष्ट एका पैठणीची पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार राहुल देशपांडे यांना किशोर कदम यांना स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार गोदाकाठ आणि अवांछितसाठी विशेष पुरस्कार सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटासाठी सुमी या मराठी चित्रपटाला पुरस्कार जाहीर फिचर फिल्म, विशेष उल्लेखनीय चित्रपट : अवांछित (मराठी), गोदाकाठ (मराठी) मराठी भाषेतील ‘कुंकुमार्चन’ या नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील चित्रपटाला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा मान 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीत सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार जाहीर
Jul 22, 2022  |  04:38 PM (IST)
बीड: उद्धव ठाकरेंवरील विघ्न दूर व्हावं; शिवसैनिकांची 150 किलोमीटर तुळजापूरला पायी दिंडी
Jul 22, 2022  |  03:08 PM (IST)
अंबरनाथ : अमित ठाकरे यांनी शिव मंदिरात दुग्धाभिषेक करत संवाद यात्रेला केली सुरुवात
मनसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा आज उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे संवाद दौरा आहे. या द्वारासाठी सर्वात प्रथम अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकल प्रवास केला. रस्त्यावरील ट्रॅफिक आणि खड्ड्यामुळे त्यांनी हा लोकलचा प्रवास केल्याचे बोलले जात आहे. अंबरनाथ स्टेशनवर त्यांनी उतरून सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत वंदन केले. नंतर अंबरनाथमधील ऐतिहासिक शिव मंदिर येथे जाऊन कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेत शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करुन संवाद यात्रेला सुरुवात केली.
Jul 22, 2022  |  03:01 PM (IST)
आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही: आमदार उदय सामंत
Jul 22, 2022  |  12:32 PM (IST)
ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापुरमधील मोहोळ तालुक्यातील वटवटे गावातील एका शेतात ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणलीय. पोलिसांच्या कारवाईत जवळपास ४ किलो वजनाचे गांजासह एकूण चार लाख ४१ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदाशिव दत्तू ढोबळे असे आरोपी शेतकऱ्याचे नाव असून कामाती पोलिसांना या संदर्भात खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती. पोलिसांनी या संदर्भात पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. या संदर्भात एनडिपीएस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 22, 2022  |  12:25 PM (IST)
NASHIK | 'कधीच कोणासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले नव्हते', आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना पुन्हा चुचकारलं
Jul 22, 2022  |  10:27 AM (IST)
नीरज चोप्रा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय
Jul 22, 2022  |  10:24 AM (IST)
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल

Jul 22, 2022  |  09:00 AM (IST)
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा निर्णय, सीमा भागातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा निर्णय, सीमा भागातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण; ८६५ गावांतील विद्यार्थ्यांना फायदा होणार.

Jul 22, 2022  |  08:58 AM (IST)
ओबीसी आरक्षण लागू होणार, निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण प्रक्रिया सुरू होणार

ओबीसी आरक्षण लागू होणार, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण प्रक्रिया सुरू होणार

Jul 22, 2022  |  08:56 AM (IST)
एकनाथ शिंदे समर्थक खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये मेळावा

एकनाथ शिंदे समर्थक खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिकमध्ये मेळावा

Jul 22, 2022  |  08:55 AM (IST)
खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तांवर ईडीची धाड

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तांवर ईडीची धाड

Jul 22, 2022  |  08:52 AM (IST)
परशुराम घाटात अपघात

मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात फरशी तिठ्याजवळ एसटी बस आणि खासगी बस यांचा अपघात. वाहतूक कोलमडली. 

Jul 22, 2022  |  08:51 AM (IST)
एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटणार, शिवसंवाद यात्रेत भेट होणार

एकनाथ शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरेंना भेटणार, शिवसंवाद यात्रेत भेट होणार

Jul 22, 2022  |  08:50 AM (IST)
हिंगोली जिल्ह्यात ५३५ मिलिमीटर पावसाची नोंद

हिंगोली जिल्ह्यात ५३५ मिलिमीटर पावसाची नोंद

Jul 22, 2022  |  08:49 AM (IST)
हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना

हिंगोली जिल्ह्यात आदिवासी शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने खोलीतच गळफास लावून घेतला, पोलीस तपास सुरू

Jul 22, 2022  |  08:47 AM (IST)
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या मेळाव्यात स्टेजवर आली दारूच्या नशेत धुंद असलेली व्यक्ती

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या मेळाव्यात स्टेजवर आली दारूच्या नशेत धुंद असलेली व्यक्ती

Jul 22, 2022  |  08:49 AM (IST)
पालघर जिल्ह्यात अपघात

पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील वाळवंडे येथे कार आणि दुचाकी यांचा अपघात. अपघातात दुचाकीवरील गणपत तुंबडा (वय २०) आणि संतोष वझरे (वय २३) यांचा मृत्यू. बांधकाम व्यावसायिक हर्षद मेघपुरीया जखमी. दुचाकीवरील तिसरी व्यक्ती आणि कार चालक पण जखमी. पोलीस तपास सुरू