LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 22 September 2022 Latest Update: महाराष्ट्रातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 22 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 22 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Sep 22, 2022  |  10:38 PM (IST)
खारेपाटण येथील वीज केंद्राला अचानक आग, परिसरातील बत्ती गुल

SINDHUDURG | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांना वीज पुरवठा होणाऱ्या खारेपाटण येथील वीज केंद्राला आज सायंकाळी अचानक आग लागली. वीज केंद्र परिसरात असलेल्‍या डीपींमधून आगीच्या ज्‍वाळा उठत आहेत. येथील आग विझवण्याचे प्रयत्‍न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. दरम्‍यान, घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे. तसेच महावितरणचे वरिष्‍ठ अधिकारी देखील खारेपाटणला रवाना झाले आहेत. खारेपाटण येथील वीज केंद्राला आग लागल्‍याने अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

Sep 22, 2022  |  07:06 PM (IST)
महाराष्ट्रातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द
महाराष्ट्रातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द 99 टक्के खातेदारांना त्यांच्या सर्व ठेवी परत मिळणार 13 सप्टेंबरपर्यंत 198 कटी रुपये ठेवीदारांचे परत
Sep 22, 2022  |  06:49 PM (IST)
AMRAVATI | मेळघाटात विविध आजाराने पाच महिन्यात 110  बालकांचा मृत्यू 

कुपोषणासह विविध आजाराने अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दोन माता सह शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 77 व 33 उपजत अशा 110 बालकांचा मृत्यू झाला. पाच महिन्यात 2525 बालकांचा जन्म मेळघाटात झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 36 बालकांचा मृत्यू झाला असून यात 19 बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आदिवासींनी बालकांचा उपचार कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कुपोषणाच्या तीव्र श्रेणीत 232 बालके आहेत, असे असताना 14 ब गट डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचा संताप जनक प्रकार आहे. मेळघाटातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा गंभीर प्रश्न असताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, न्यायालयाचे ताशेरे, पाहता मृत्यूची आकडेवारी कमी होण्याचा नाव घेत नसल्याचे चित्र आहे एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या 150 दिवसात एकूण 110 मृत्यू पैकी सर्वाधिक  36बालकांचा मृत्यू ऑगस्ट महिन्यात झाला आहे, जिल्हा आरोग्य विभागाकडे आहे पावसाळ्यात जलजन्य रोगाचा प्रादुर्भाव मेळघाटात होतो त्याचा फटका  कमी वजनाच्या कुपोषित बालकांना बसतो.

Sep 22, 2022  |  05:59 PM (IST)
मुंबई : जलवाहिनी फुटल्यामुळे भांडुपच्या काही परिसरात पाणीपुरवठा खंडित

भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरामध्ये 900 एम एम जलवाहिनी फुटल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून विक्रोळी कांजूरमार्ग आणि भांडुप च्या काही परिसरात पाणीपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित आहे अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा मुंबई महानगरपालिकेकडून करावा अशा सूचना नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्या परंतु गेले तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून पाण्याचे टँकर्स उपलब्ध नाहीत अशी जुजबी माहिती दिली जाते पालिका प्रशासनाच्या अशा संवेदनशील कारभाराचा फटका मात्र नागरिकांना बसतोय. काल दुपारपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालं होतं परंतु आज सकाळी पहाटे पुन्हा ही जलवाहिनी फुटली गेल्या दोन महिन्यांमध्ये तब्बल सात वेळा ही जलवाहिनी फुटल्याचं नागरिक सांगत आहेत. 

Sep 22, 2022  |  05:00 PM (IST)
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा ताफा अडवला

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा ताफा अडवला
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवला ताफा
आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 
पुण्यातील वारजे परिसरात अडवला ताफा 
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात आपच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

Sep 22, 2022  |  04:28 PM (IST)
बुलढाणा - उपवासाची भगर खाल्ल्याने 20 जणांना विषबाधा

बुलढाणा - उपवासाची भगर खाल्ल्याने 20 जणांना विषबाधा
दोन गावातील भाविकांनी खाल्ली होती भगर 
बुलढाण्यातील चिखली येथील घटना 

Sep 22, 2022  |  03:24 PM (IST)
MUMBAI | आनंद दिघे असते तर यांच काय झालं असत, विचार करा- अरविंद सावंत

- आनंद दिघे असते तर या गद्दारांचं काय झालं असतं, विचार करा
- यांची स्क्रीप्ट दिल्ली वरुन येते
- महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे ठरले आहेत
- यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

Sep 22, 2022  |  03:15 PM (IST)
दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवासाठी शिंदे गटाला परवानगी 

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा वादात सापडला होता. दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी शिंदे गट उद्धव ठाकरे दोन्ही गटांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष होतं. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटातले शहर प्रमुख सचिन बासरे यांनी मात्र नाराजी व्यक्त करत आमची परवानगी का नाकारली, याचं कारण स्पष्ट करायला हवं होतं अशी मागणी केली आहे. तसेच आम्हाला नाकारण्याचं पत्र जर मिळालं तर याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहोत, अशी बासरे म्हणाले. 

Sep 22, 2022  |  03:05 PM (IST)
नवी मुंबईत एनआयए ने टाकलेल्या धाडीत पीएफआयच्या सेक्रेटरीची 8 तास चौकशी

NAVI MUMBAI : नवी मुंबईत एनआयए ने टाकलेल्या धाडीत पीएफआयचे सेक्रेटरी असिफ शेख यांना 8 तासांच्या चौकशी नंतर सोडण्यात आले आहे. मात्र पीएफआयच्या कार्यालयातून अनेक कागदपत्रे एनआयएने ताब्यात घेतले आहे.

Sep 22, 2022  |  12:31 PM (IST)
 उध्दव ठाकरे यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई शहरात लोकांना खड्ड्यांशी सामना करावा लागत आहे -  राम कदम

मुंबई शहरात जे खड्डे पडले आहेत त्याचे कारण हे उध्दव ठाकरे यांच्या भ्रष्टाचार आहे. मुंबईतील लोकांना आजही खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. 30 वर्षांपासून मुंबई शहरात तुमचीच सत्ता असूनही खड्डे आहेत. उध्दव ठाकरे यांच्या सेनेला पेंग्विन सेना म्हणून ओळखला जात आहे. हे अपयश त्यांचे मानसिक संतुलन गमावण्याचे कारण आहे.

Sep 22, 2022  |  12:28 PM (IST)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावरच म्हणजेच शिवाजी पार्क घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली असून त्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील शिवाजी पार्कसाठी आग्रही आहे. याच याचिकेवर आज (22 सप्टेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे.

Sep 22, 2022  |  11:42 AM (IST)
जळगाव जिल्ह्यात नदीला पूर, दोन्ही गावांचा संपर्क तुटला

जळगाव जिल्ह्यातील  पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्प हा 100% भरून ओसांडून वाहत आहे. त्यामुळे खडकदेवळा खुर्द व खडकदेवळा बुद्रुक या दोन्ही गावासाठी ये जा करण्यासाठी असलेल्या फरशी पूल हा पाण्याखाली गेला आहे आणि  दोन्ही गावांचा संपर्क हा तुटला आहे. यामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसला आहे, खडकदेवळा खुर्द व खडकदेवळा बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी साचल्याने डोंगरगाव वाघुलखेडा व खडकदेवळा येथील शालेय विद्यार्थ्यांना आपली शाळा पुराच्या पाण्याअभावी बंद करावी लागली होती.  खडकदेवळा ,डोंगरगाव, वाघुलखेडा येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी त्वरित खडकदेवळा खुर्द व खडकदेवळा बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाची त्वरित उभारणी करावी अशी मागणी केली आहे.

Sep 22, 2022  |  08:25 AM (IST)
भारताचा इंग्लंडवर ३३ धावांनी दणदणीत विजय

भारतीय महिला क्रिकेट टीमचा इंग्लड टीमवर ३३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हरमनप्रीतने १४३ धावा काढून दमदार कामगिरी बजावली आहे. 

Sep 22, 2022  |  07:20 AM (IST)
सकाळीच दादरच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकल उशीरा धावत आहेत

दादरमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वेच्या लोकल उशीरा धावत आहेत. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली असून रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी युद्धपातळीवर ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. 

Sep 22, 2022  |  06:29 AM (IST)
अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे, गेहलोत यांनी नुकतीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

Sep 22, 2022  |  06:27 AM (IST)
दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट

गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली, अमित शहा लवकरच मुंबईचा दौरा करतील अशी प्राथमिक माहिती आहे. 

Sep 22, 2022  |  06:24 AM (IST)
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये एका बसचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.