Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मुंबई - अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही,असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे.
दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे हे आज महाविकास आघाडीच्या बैठकीकरीता विधान भवनात आले होते.त्यावेळी विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दानवे यांच्या खुर्चीवर बसायची विनंती केली. त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की मला दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही!
मोबाइल वापरापोटी दरमहा 1500 रुपये भत्ता मिळावा, या मागणीसाठी औरंगाबाद, जालना, बीड येथील कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. सध्या कृषी सहायकांना अनेक प्रकारची कामे करण्यास सांगितली जातात. त्या सर्व कामामध्ये मोबाइलचा प्रचंड वापर करावा लागतो. पण त्यासाठी डेटाचा खर्च सरकार करत नाही. इतर शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी दरमहा पुरेसा भत्ता घेतात. मग कृषी सहायकांवरच अन्याय कशासाठी, असा सवाल संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष बँक विठ्ठल गोराडे, कार्याध्यक्ष किशोर बोराडे, सचिव त्रिस्त रंगनाथ पिसाळ यांनी उपस्थित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही गाव मोबाईल नेटवर्क पासून वंचित राहू नये यासाठी खासदार विनायक राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या माध्यमातून नव्याने ८४ बीएसएनएलचे फोर जी टॉवर मंजूर झाले असून हे सर्व टॉवर दीड वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते व शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी आज संयुक्तरित्या ओरोस येथे पत्रकार परिषदेत दिली.
ठाण्यात नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाला शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती त्यानंतर आज ठाण्यामध्ये ठाण्यातील शिवसैनिक महिलांसाठी विशेष मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रश्मी उद्धव ठाकरे आल्या होत्या. सदर कार्यक्रम शिवसेना ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर ठाकरे कुटुंबाचे एकूणच दौरे हे शक्ती प्रदर्शनसारखे होऊ लागलेले दिसून येते. ह्या दौऱ्यांमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे हे वारंवार जुन्या शिवसैनिकांची संवाद साधत आहेत व चर्चा सुरू ठेवत आहेत. ठाण्यातील शिवसैनिक महिला शिवसैनिकांसाठी ह्या मंगळावर कार्यक्रम एका प्रकारे शक्ती प्रदर्शन दाखवणारा होता.
ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर ते लोढा स्प्लेंडर सोसायटी या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे कामामुळे दि. 23 ते 28 ऑगस्ट या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे ठाणे वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे
प्रवेशबंद - गुजरात महामार्गाने ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना चिंचोटी नाका येथे "प्रवेश बंद" करण्यात येणार आहे. मुंबई, वसई, विरारकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद आहे.
पर्यायीमार्ग - गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी वाहने चिंचोटीनाका येथून कामण अंजुरफाटा - माणकोली भिवडीमार्गे जातील.
अवजड वाहने सोडून इतर वाहने नागलाबंदर सिग्नल कट जवळून डावे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे लोढा स्प्लेंडर सोसायटीजवळ उजवीकडे वळून मुख्यरस्त्याने जातील.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर तसेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदा विधीमंडळात दाखल झाले आहेत. आज विधीमंडळात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, उद्धव ठाकरे या बैठकीला हजर राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल, मविआच्या बैठकीत होणार सामील#UddhavThackeray pic.twitter.com/hCPVSe9Hmy
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 23, 2022
नांदेड येथील वन विभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो (WCCB) आणि TRA FFIC INDI यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये वन्यजीव अवयवांचा साठा जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव अवयव साठा ही नांदेडमधील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार दि. 23ऑगस्ट रोजी पहाटे उपवनसंरक्षक केशव वाबळे व तेंदू व कम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक वी. एन. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतुलवार यांच्या पथकाने वन्यजीवाच्या अवयवाची विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई केली.वन विभागाच्या पथकातील एका सदस्याने बनावट (डमी) ग्राहक बनून संपर्क साधला असता आरोपीने साडेतीन हजार प्रति नग दराने हत्था जोडी विक्री करीत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सापळा रचून हत्था जोडीसहीत आरोपी स्वप्नील बाबुराव सूर्यवंशी (वय ३६) रा. आंबेडकरनगर, नांदेड यास हुजूर साहिब रेल्वे स्टेशन नांदेड येथून ताब्यात घेतले.
सदर आरोपीने दिलेल्या माहितीवरून त्यास वन्यजीवाच्या अवयवांचा पुरवठा करणारे व्यावसायिक आणखीन दोन जण असल्याचे समोर आले. त्यात आरोपी व्ही. व्ही. मोगडपल्ली, रा. वसंतप्रभा निवास, कैलाशनगर, नांदेड ( दुकान मालक) व दुकानातील नौकर कैलाश पुरभाजी कदम, रा. निळा, पो.मरळक (बु.), ता. जि. नांदेड यांना श्रीनगर नांदेडमधील मोगडपल्ली मेडीको अॅण्ड किराणा स्टोअर्स, या दुकानावर वन विभागाचे पथकातील सदस्यांना बनावट ग्राहक बनवून हत्था जोडी मागणी केली असता त्यांने ७०० रुपये प्रती नग हत्था पल्ली, लक) पो.जोडी दिली. त्याचवेळी दुकानात धाड टाकून त्याला पकडले व त्यांच्या दुकानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून ईतर तीन नग हत्था जोडी, पाया जोडी १५ नग व एक नग ब्लॅक कोरल हस्तगत केले.
घोरपड हे भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे परिशिष्ट I भाग II मधील वन्यप्राणी आहे. ब्लॅक कोरल हा परिशिष्ट I मधील भाग IV (अ) मधील प्राणी आहे. वरील तीनही आरोपीविरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९ कलम ४९ कलम ४९ ( ब ) व कलम ५२ नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. सदर कारवाईमध्ये बी. एन. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सी. जी. पोतुलवार, वन्य जीव रक्षक अतिंद्र कट्टी, एस. टी. आलोने, एस. बी. शिंदे, रमेश राठोड, नामदेव पंढरे, डी. एन. सोनकांबळे, तुळशीराम मुसांडे, पांडुरंग लव्हाळे यांचा समावेश होता.जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी हत्था जोडी घेवू नये. कारण हत्था जोडी ही घोरपड या वन्यप्राण्यास मारुन त्याचा काढलेला अवयव आहे. वन्यप्राण्यांची शिकार करणे तसेच त्यांचे अवयव वापरणे व बाळगणे हे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार अपराध असून सदर अपराध करणाऱ्यास तीन ते सात वर्षे कारावास व आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
शहापूरमधील खर्डी गावात राहत्या घरात बिबट्या शिरला, सात तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने केले जेरबंद
शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावातील लहु नारायण निमसे यांच्या राहते घरी सोमवार रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बिबट्या ने शिरकाव केला. यावेळी घराचे पाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर जोरात आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्य मधुकर लहु निमसे यांना जाग आली. बाजुच्या च घरात त्यांचा मुलगा झोपला होता. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्या शिरलेल्या रूमचा दरवाजा लावुन घेतला व वनविभागाला माहिती दिली. सकाळी 6 च्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानवन्य जीव बचाव पथक, वन विभाग आणि पोलिसांची रेस्क्यु टीम त्याठिकाणी रवाना झाली आणि बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केला. तब्बल सात तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये वन विभागाला यश आले आहे. पुढच्या काही तासात डॉक्टर कडे तपासणी करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप
राधाकृष्ण विखे पाटील - रॉयलस्टोन बंगला
सुधीर मुनगंटीवार - पर्णकुटी
चंद्रकांत पाटील - ब-१ (सिंहगड)
विययकुमार गावीत - चित्रकुट
गिरीश महाजन - सेवासदन
गुलाबराव पाटील - जेतवन
संजय राठोड - शिवनेरी
सुरेश खाडे - ज्ञानेश्वरी
संदिपानराव भुमरे - ब-२ (रत्नसिंधु)
उदय सामंत - मुक्तागिरी
रविंद्र चव्हाण - अ-६ (रायगड)
अब्दुल सत्तार - ब-७ (पन्हाळगड)
दीपक केसरकर - रामटेक
अतुल सावे - अ-३ (शिवगड)
शंभूराज देसाई - ब-४ (पावनगड)
मंगल प्रभात लोढा - ब-५ (विजयदुर्ग)
उमरखेड शहरातील बस स्टँड परिसरात एका कचऱ्याच्या ठिकाणी 11.30 वाजता सुमारास आग लागली. आग विझविण्याकरिता बस स्टँडचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी प्रयत्न सुरू केला आहे. बस स्टँडच्या एका कोपऱ्यात असलेल्या रिकाम्या जागेला ही आग लागली होती. तसेच ज्या ठिकाणी आग लागली आहे तिथेच कुलर आणि फ्रिजचे दुकान देखील आहे. सध्या आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 586 नवीन रुग्ण आढळले. तर, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 96 हजार 506 वर पोहोचली. देशातील रिकव्हरी रेट वाढला आहे.
#COVID19 | India reports 8,586 fresh cases and 9,680 recoveries, in the last 24 hours; Active cases 96,506 pic.twitter.com/NBW9FBjr3J
— ANI (@ANI) August 23, 2022
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 41 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोटी सापडल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही घटना ताजी असताना आता मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी अज्ञाताने दिली होती. धक्कादायक म्हणजे, मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेलाच याबद्दल धमकीचे मेसेज पाठवण्यात आला होता. यामुळे खळबळ उडाली आहे.
वारंवार पुढे ढकलण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेय. आपल्या सोयीनुसार पॅनल करण्याच्या पद्धती लोकशाहीला घातक आहेत. सत्तेत असलेल्यांना निवडणुका घ्यायची भीतीच वाटत असेल तर ही लोकशाहीची हत्या होतेय. जो पर्यंत नगरसेवक बसत नाही तोपर्यंत प्रशासनाची सत्ता आणि प्रशासनावर मंत्रालयाचा अंकुश असल्याने सत्ता मंत्रालयात. नवी मुंबईची फार वाईट अवस्था कारण सत्ता आयुक्तांच्या हातात स्थिरावलेय. आयुक्तांना लोकांशी काही घेणं देणं नसतं जे मतदानाने निवडून येतात त्या नगरसेवकांवरती एक सामाजिक जबाबदार असते. काम न केल्यास पुढच्यावेळी निवडणुकीत पराभव होईल या भीतीमुळे नगरसेवक काम करत असतात. मात्र या सरकारला हे पटत नाही त्यामुळे चालुद्या टोला माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावलाय.
आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. बैठकीला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. यासह अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ बैठकीत सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच बैठकीत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या 2 दिवसांच्या रणनीतीवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स पाठवले आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर रायगड जिल्ह्यात जमीन खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर यांनी राऊत यांच्यावर काही आरोपही केले आहेत.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढेल. राज्यात कोकणसह, पूर्व विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा आणि शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करा अशी मागणी केडीएमसीतील माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केली आहे. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत .याबाबत आज माजी नगरसेवकानी पालिका आयुक्तासोबत बैठक पार पडली या बैठकीस तीस माजी नगरसेवक उपस्थित होतें.यावेळी आयुक्तांनी पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे २४ तास खड्डे भरण्याच काम सुरू करण्यात येईल गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील अस आश्वासन दिले .
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज (23 ऑगस्ट, 2022) उझबेकिस्तानला भेट देणार आहेत, जिथे ते राजधानी ताश्कंदला तीन दिवसीय भेट देणार आहेत. सिंह यांना या कालावधीत शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) मध्ये सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी व्हायचे आहे.
ओडिशा भुवनेश्वर रेल्वे स्थानकाजवळ के पास सोमवारी रात्री एका दुर्घटनेत मालगाड़ी चे पाच डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणत्याच प्रकारची हानी झालेली नाही.