LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 23 July 2022 Latest Update: राज्यात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 23 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 23, 2022  |  04:12 PM (IST)
राज्यात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांना हा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासह राज्यात विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2022  |  01:12 PM (IST)
केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना १९३.९० कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना १९३.९० कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे. आजही राज्य आणि केंद्रस शासित प्रदेशांकडे ८ कोटींहून अधिक डोस उपलब्ध आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
Jul 23, 2022  |  01:06 PM (IST)
दिल्लीत दोन रेल्वे कर्मचाऱ्य़ांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
दिल्लीत दोन रेल्वे कर्मचाऱ्य़ांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Jul 23, 2022  |  01:04 PM (IST)
कावड यात्रेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत जाहीर
मध्य प्रदेशमध्ये कावड यात्रेत झालेल्या अपघातात सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश शासनाने १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Jul 23, 2022  |  01:00 PM (IST)
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा पुढील निवडणूक लढवणार नाही

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पुढील निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले आहे. तसेच या मतदारसंघातून आपला मुलगा विजयेंद्र निवडणूक लढेल असेही जाहीर केले आहे.

Jul 23, 2022  |  11:08 AM (IST)
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
Jul 23, 2022  |  11:07 AM (IST)
ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार
Jul 23, 2022  |  11:07 AM (IST)
महाराष्ट्रात पावसाचा कोणकोणत्या जिल्ह्यात यलो अलर्ट?
Jul 23, 2022  |  11:06 AM (IST)
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा
Jul 23, 2022  |  11:06 AM (IST)
चंद्रकांत खैरेंची आदित्य ठाकरेंसमोरचं एकनाथ शिदेंवर सडकून टीका
Jul 23, 2022  |  11:05 AM (IST)
आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढणार?

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे, बांगर यांना मजबूत विरोधक तयार करण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक करत आहेत.

Jul 23, 2022  |  07:04 AM (IST)
ओडिशात आढळला लाखो रुपयांचा मासा

ओडिशात मासेमारी करणार्‍या एका व्यक्तीला ३२ किलोंचा मासा आढळला आहे. हा मासा ३ लाख २० हजार रुपयांना विकला गेला असा दावा या व्यक्तीने केला आहे.

Jul 23, 2022  |  07:01 AM (IST)
उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये कावड यात्रेत भीषण अपघात झाला आहे. यात पाच भाविकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Jul 23, 2022  |  06:59 AM (IST)
दोन मुलांचा खून करून पती पत्नीची आत्महत्या

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीने आपल्या दोन मुलांचा खून करून आत्महत्या केली आहे. पती पत्नीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. कौटुंबिक कलहामुळे पती पत्नीने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.