LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 23 September 2022 Latest Update: शिवसेनेचा मोठा विजय, दसरा मेळाव्यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळाली, शिंदे गटाला झटका

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 23 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 23 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Sep 23, 2022  |  10:18 PM (IST)
राज्यात 611 कोरोना रूग्णांची नोंद, दोन बाधितांचा मुत्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. राज्यात आज 611 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन बाधितांचा आज मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे आज नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 687 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

Sep 23, 2022  |  10:16 PM (IST)
कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी पेढे वाटले. तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. शिवसैनिकांकडून मातोश्रीवर देखील जल्लोष साजरा करण्यात आला. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.  उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केलं. आज रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली. 

Sep 23, 2022  |  04:37 PM (IST)
शिवसेनेचा मोठा विजय, दसरा मेळाव्यासाठी कोर्टाकडून परवानगी

मेळाव्याला शिवसेनेला अटी शर्तींसह परवानगी
दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दसरा मेळाव्यासाठी परवानगी

शिवसेनेचा मोठा विजय, दसरा मेळाव्यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळाली, शिंदे गटाला झटका

Sep 23, 2022  |  04:34 PM (IST)
कायदा सुव्यवस्था राखण्याची शिवसेनेकेकडून हमी 

अर्ज नाकारून पालिकेने अधिकारांचा दुरुपयोग  -कोर्ट 

गेल्या ७० वर्षात असे कधीही झालेले नाही - कोर्ट
जेव्हा  जेव्हा मेळावा झाला तेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
परवानगी मिळाल्यास कायदा सुव्यवस्था राखणार का ? कोर्टाचा ठाकरे गटाला सवाल
कायदा सुव्यवस्था राखण्याची शिवसेनेकेकडून हमी 

Sep 23, 2022  |  04:32 PM (IST)
कायदा सुव्यस्थेचे कारण देत अर्ज नाकारू शकत नाही - कोर्ट

कायदा सुव्यस्थेचे कारण देत अर्ज नाकारू शकत नाही - कोर्ट

मुंबई पालिकेला वस्तूस्थितीची जाणीव - कोर्ट

सर्वांनी दिलेले दाखले कोर्टाने नोंदवले

पालिकेचा निर्णय तथ्यात्मक आणि अंतिम नाही - कोर्ट

Sep 23, 2022  |  04:20 PM (IST)
दोन्ही गटाला परवानी नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य- कोर्टाचे मत

२१ सप्टेंबरला पोलिसांनी पालिकेला कायदा सुव्यवस्थेचा अहवाल सुपुर्द केला - कोर्ट
 

पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याने कोर्टात याचिका - कोर्ट
२२ आणि २६ तारखेला दोन्ही अर्ज पालिकेला मिळाले - कोर्ट
 

खरी शिवसेना कुणाची यात आम्हाल जायचे नाही - कोर्ट

कायदा सुव्यवस्थेचा विचार करून पालिकेने परवानगी नाकारली - कोर्ट

२०१७ साली शिवसेनेल कशी परवानगी दिली याचे कोर्टाकडून निरीक्षण सुरू

दोन्ही गटाला परवानी नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य- कोर्टाचे मत

Sep 23, 2022  |  04:10 PM (IST)
उच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

आम्हाला जुन्या निकालांच्या आधारावर निर्णय द्यावा लागेल - कोर्ट

मेळावा घेण्याचा अधिकार कुणालाही नाही असा युक्तिवाद पालिकेने केला होत.

पालिकेने जुन्या निकालाकडे आमचे लक्ष वेधले - कोर्ट

ठाकरे गटाच्या युक्तिवादाला उच्च न्यायालयाचे समर्थन

सदा सरवणकरांना याबद्दल याचिका करण्याचा हक्क नाही - मुंबई उच्च न्यायालय

शिवसेनेच्या ठाकरे गटाला विरोध करणारी याचिका शिंदे गटाच्या सरवणकरांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

उच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या सदा सरवणकरांची अंतरिम याचिका फेटाळली

Sep 23, 2022  |  03:58 PM (IST)
शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही - उच्च न्यायालय

शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही - उच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रलंबित आहे - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाकडून निकाल वाचनास सुरूवात

Sep 23, 2022  |  03:49 PM (IST)
तिनही बाजूंचा युक्तिवाद संपला

तिनही बाजूंचा युक्तिवाद संपला

नैतिकदृष्ट्या मैदान आम्हाला मिळावे - ठाकरे गटाचा युक्तिवाद

Sep 23, 2022  |  03:48 PM (IST)
ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू

 मी कोर्टाचा वेळ घालवू इच्छित नाही - ठाकरे गटाचे वकील

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची विचारणा करण्यात आली होती - ठाकरे गट

ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू 

आम्ही पालिकेच्या निर्णयाला आव्हान दिले आहे - शिंदे गट
फेटाळलेल्या अर्जावर आमची याचिका नाही - शिंदे गट
 

Sep 23, 2022  |  03:43 PM (IST)
सध्या फक्त शिवाजी पार्क आणि दसरा मेळाव्याबद्दल बोला - उच्च न्यायालय 

आम्ही ठाकरे गटाकडून आलेल्या अर्जाबद्दल बोलत आहोत - शिंदे गट

आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मुद्दे उपस्थित केले नाहीत - शिंदे गट

मेळावाव्यतिरिक्त इतर मुद्दे उपस्थित करू नका - उच्च न्यायालय

शिंदे गटाचे वकील निवडणूक आयोगाचा अहवाल वाचून दाखवत दाखवत आहेत. 

बीकेसीसाठी अर्जानुसार आम्हाला परवानगी मिळाली - शिंदे गट

शिंदे गटाला एमएमआरडीएची परवानगी कशी मिळाली हे पहावं लागेल- कोर्ट

सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात काय प्रकरण सुरू आहे हे ऐकण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीत - उच्च न्यायालय

याचिकेचा विस्तार वाढवू नका - उच्च न्यायालय
सध्या फक्त शिवाजी पार्क आणि दसरा मेळाव्याबद्दल बोला - उच्च न्यायालय 

Sep 23, 2022  |  03:32 PM (IST)
सरवणकर हे शिवसेनेत असून शिवसेनेची राज्यात सत्ता आहे - शिंदे गट

अनिल देसाई यांचा अर्ज हा पक्षविरोधात - शिंदे गट

आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने अर्ज केला आहे - शिंदे गट

सदा सरवणकरांनी शिवसेना सोडलेली नाही - शिंदे गट

सरवणकर हे शिवसेनेत असून शिवसेनेची राज्यात सत्ता आहे - शिंदे गट

खरी शिवसेना कुणाची हे आम्ही सांगू शकतो - शिंदे गट

अनिल देसाई यांनी ज्या पक्षाची भूमिका मांडली आहे त्या पक्षाची सत्ता गेली आहे - शिंदे गट
उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले आहे - शिंदे गट

अनिल देसाई हे दादरचे रहिवासीसुद्धा नाही त्यामुळे देसाईंचा अर्ज फेटाळून लावावा, शिंदे गटाची मागणी

खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित - शिंदे गट

सरवणकर हे स्थानिक आमदार म्हणून त्यांनी मेळाव्यासाठी अर्ज केला.  - शिंदे गट

याचिकाकर्ते मूळ शिवसेना आहे का ? शिंदे गटाचा सवाल

Sep 23, 2022  |  03:20 PM (IST)
आमची याचिका समजून घेणे गरजेचे -शिंदे गटाचे वकील

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्काची परवानगी मिळाली असे कधीच झाले नाही - शिंदे गट
दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक स्वतःहून हजर राहतात - शिंदे गट
 

शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित केला जातो - शिंदे गट
याचिकाकर्ता म्हणून शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष - शिंदे गट
 

आमच्या अर्जाला अर्थ नाही असा ठाकरे गटाचा दावा परंतु आमची याचिका समजून घेणे गरजेचे -शिंदे गटाचे वकील

शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू

पालिकेच्या वकिलांचा युक्तिवाद संपला
 

Sep 23, 2022  |  03:06 PM (IST)
हे क्षेत्र संवेदनशील आहे, त्यामुळे परवानगी नाकारली - पालिका

हे क्षेत्र संवेदनशील आहे, त्यामुळे परवानगी नाकारली - पालिका

गेल्या काही वर्षात जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा दोन्ही गट एकत्र होते, आता एक गट विभक्त झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो- पालिका

एकापेक्षा अधिक अर्ज असल्याने छानणी होणं आवश्यक- वकील

त्याच दिवशी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली - शिवसेना
२१ सप्टेंबरला दोन्ही गटांना परवानगी नाकारली - पालिका
१४ सप्टेंबर रोजी ठाकरे आणि शिंदे गटा तणाव निर्माण झाला होता.
गणेश विसर्जनाच्या दिवशी होर्डिंग्सवरून तणाव निर्माण झाला होता.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून कायदा सुव्यस्थेचा निर्माण होऊ शकतो असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. 

पालिकेच्या वकीलांकडून अहवाल वाचन सुरू.

नियमांप्रमाणे पोलिसांकडून अहवाल मागितल होता -पालिका

२०१७ साली दसरा मेळाव्यासाठी तीन अर्ज आले होते - पालिका

Sep 23, 2022  |  02:52 PM (IST)
दसरा मेळावा शिवाजी पार्क परवानगीप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

२०१७ साली शिवसेना भवनमधून फोन आला होता, दसरा मेळाव्यासाठी परवानी देण्यात यावी असे पालिकेला सांगण्यात आले होते - पालिका

गणेशोत्सवादरम्यान दोन गटांमध्ये राडा झाला होता, त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. 

दसर्‍या दिवशी शिवाजी पार्क राखीव आहे- पालिका 
मात्र मैदान कुणाला मिळेल याबद्दल निर्णयाय उल्लेख नाही - पालिका

बालमोहन विद्यामंदिर शाळेलाच हे मैदान वापरण्याचा हक्का -पालिका

ठाकरे गटाच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण

२०१७ साली शिवसेनेकडून वेगवेगळ्या लोकांनी अर्ज केला होता. - पालिका

२०१३ च्या जनहित याचिकेत दुसर्‍या मैदाना उल्लेख - पालिका

२०१२ साली शिवसेनेने शिवाजी पार्कवरील हक्का सोडला होता, त्यांनी पर्यायी मैदानासाठी अर्ज केला होता -पालिका

परवानगी न देण्याच्या निर्णयावर पालिका ठाम - पालिका

शिवाजी पार्कची परवानगी देण्याचे सर्व अधिकार पालिकेकडे - पालिका

कोर्टाने इतर केसेसच्या सुनावण्या पुढे ढकलल्या आहेत. 

दसरा मेळावा शिवाजी पार्क परवानगीप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Sep 23, 2022  |  01:32 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयात लंच ब्रेक, अडीच वाजल्यानंतर पुढील सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयात लंच ब्रेक, अडीच वाजल्यानंतर पुढील सुनावणी

२०१५ ला विशेष अधिकार वापरून पालिकेची परवानगी दिली होती -पालिका
याचा अर्थ असा होत नाही दरवेळी ही परवानगी देता येणारच असे नाही -पालिका

२०१३ साली शिवसेनेने निर्णयाला आव्हान दिले नव्हते - पालिका

कुणालाही शिवाजी पार्क देण्यास पालिकेचा विरोध - पालिका

२०१३ पासून शिवसेनेने राजकीय सभा घेण्याचा अधिकार गमावला आहे - पालिकेचा युक्तिवाद

परवानगी नसताना मेळावा घेणारच असा दावा करणे अयोग्य - पालिका

२०१२ साली एमएमआरडीए मैदानावार मेळावा घेतला होता. -पालिका 

त्यामुळे दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क असा अधिकार नाही - पालिका
 

Sep 23, 2022  |  01:20 PM (IST)
दसरा मेळावा ही परंपरा असेल परंतु अधिकार नाही - पालिका

२०१३ साली शिवसेनेने असाच एक दावा शिवसेनेने केला होता - पालिका 
शिवाजी पार्कवर जमण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही - पालिका
पालिकेचे वकील साठ्ये हे जुन्या निर्णयाचा हवाला देत आहेत - शिवसेना
 

दसरा मेळावा ही परंपरा असेल परंतु अधिकार नाही - पालिका

सभा, रॅली घेऊन घोषणाबाजी करू नये असा नियम -पालिका
ज्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाते, ते कार्यक्रम शांततेत पार पडतात - पालिका

हीच जागा हवी असा अधिकार कुणालाही गाजवता येणार नाही - पालिका
शिवाजी पार्क ही सायलंट झोन - पालिका

Sep 23, 2022  |  01:12 PM (IST)
शिंदे गटाची याचिका फेटाळून लावा, शिवसेनेची मागणी

झालेल्या घटनांनंतर पोलिसांनी अहवाल दिला, या अहवालावरच दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आली - पालिका

पोलिसांचा अभिप्राय घेतल्यानंतर दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आली - पालिका

कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचे काम, पोलिसांनीच परवानगी देण्यास नकार दिला - पालिकेचा युक्तिवाद

दोन्ही गटांना याचिका हक्क नाही - पालिका वकीलांचा युक्तिवाद
या मुळे कुणाच्याही अधिकाराचा भंग होत नाही - पालिका वकीलांचा युक्तिवाद
 

शिंदे गटाची याचिका फेटाळून लावा, शिवसेनेची मागणी

शिवाजी पार्क पालिकेच्या ताब्यात - पालिकेच्या वकीलांचा युक्तिवाद

दोन्ही गटाला परवानगी मिळू नये- पालिकेच्या वकीलांचा युक्तिवाद

शिवाजी पार्क हे कुठल्याही व्यक्तीचे नाही - पालिकेच्या वकीलांचा युक्तिवाद

Sep 23, 2022  |  01:04 PM (IST)
२०१६ च्या आदेशानुसार इतर कुणी परवानगी मागू नये असे म्हटले आहे का ? - कोर्टाचा सवाल

शिवाजी पार्क हा सायलंट झोन आहे, पालिकेचा दावा

पूर्वी ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा होता - शिवसेना 
परंतु २०१६ नंतर हा मुद्दा निकाली निघाला - शिवसेना

२०१६ च्या आदेशानुसार इतर कुणी परवानगी मागू नये असे म्हटले आहे का ? - कोर्टाचा सवाल

दसरा मेळाव्यासाठी अनिल देसाईंचे पालिकेकडे दोन अर्ज - शिवसेना

सदा सरवणकर यांना पोलीस आवरू शकत नाही -शिवसेना
आमदार सदा सरवणाकर यांनी गणेश विसर्जनावेळी गोळीबार केला होता - शिवसेना 
 

Sep 23, 2022  |  12:58 PM (IST)
शिवाजी पार्कसाठी पहिल्यांदा अर्ज कुणी केला? कोर्टाचा सवाल

आतापर्यंत अनेक दसरा मेळावा होत आहे, परंतु कधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता - शिवसेना
हा संपूर्ण प्रकार चालढकल करण्यासाठी- शिवसेनेचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या नियमांच्या चौकटीतच आतापर्यंत दसरा मेळावा पार पाडला आहे. 
 

शिवाजी पार्कसाठी पहिल्यांदा अर्ज कुणी केला? कोर्टाचा सवाल
२२ आणि २६ ऑगस्टला आम्ही अर्ज केला आहे - शिवसेना
सरवणकर यांनी ३० ऑगस्टला अर्ज केल्याचा शिवसेनेचा दावा 
 

शिवाजी पार्कसाठी पहिल्यांदा अर्ज कुणी केला? कोर्टाचा सवाल

दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास- शिवसेना वकीलांचा युक्तिवाद

अचानक कुणीही परवानगी मागणे हे अयोग्य - शिवसेना

दसरा मेळाव्यासाठी आधी आम्हीच परवानगी मागितली होती- शिवसेना

कोरोना काळात आम्ही मैदान मागितले नव्हते, शिवसेनेची कोर्टात युक्तिवाद

शिवाजी पार्कसाठी मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू

शिवसेना कुणाची हा मूळ मुद्दा नाही - शिवसेना

सदा सरवणकर यांचा अर्ज वैयक्तिक-  शिवसेना
 उद्या कोणीही वैयक्तिक अर्ज करून परवानगी मागेल - शिवसेना

मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं  का ? कोर्टाचा सवाल
मैदानातील कार्यक्रमासाठी कुणीही अर्ज करू शकतं- शिवसेनेच्या वकीलांचे उत्तर

कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पालिकेने परावनगी नाकारली हे हास्यास्प- शिवसेना वकीलाचा दावा