Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा स्त्री, इर्विन रुग्णालयात '१०२' क्रमांक रुग्णवाहिका चालक १४ वर्षापासून कार्यरत आहे. अश्कोण मेडिया प्रा. लिमिटेड कंपनी कडून कंत्राटी पध्दतीवर जवळपास ४० चालक आहेत. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपसमारीची वेळ आल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रलंबित वेतन तत्काळ द्यावे, अन्यथा १० सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा बुधवारी लोकसेवा वाहन चालक संघटनेच्या नेतृवात रुग्णवाहिका चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आपल्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
चोपडा तालुक्यातील साखर कारखाना गेल्या वर्षापासून सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली आहे. मात्र यावर्षी चोपडा तालुक्यात उसावर पांढरी माशीच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे जर या पांढरी माशीच्या प्रादुर्भावर वेळेवर अटकाव केला नाही तर शेतकऱ्यांचं उसाचे पीक हातातून जाईल या भीतीने शेतकरी व्याकुळ झालेला आहे.
2002 च्या गुजरात दंग्यातील पिड़ीता बिलकिस बानो ज्यांच्यावर पाच महिन्याच्या गर्भवती असतांना 12 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यांच्या तीन वर्षाच्या मुली सह परिवारातील सात जणांची हत्या केली गेली. अशा आरोपींची 15 ऑगस्ट रोजी भाजपा शासित गुजरात राज्य सरकार द्वारे सुटका करण्यात आली. सोबतच त्यांच्या सुटके नंतर विवीध हिंदुत्ववादी संघठना तर्फे आरोपींचा सत्कार करण्यात आला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याला RSS च्या हिंदुत्ववादी मानसिकतेने प्रेरित हे सरकार अपराधींना क्षमाच करत नाही तर त्याचा उत्सव साजरा करुन या राक्षसांना मानवते वर हल्ला करण्यास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे.
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) गुजरात सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात विरोध प्रदर्शन करीत आहे. त्याच प्रमाणे औरंगाबाद शहरात ही जिल्हाधिकारी कार्यालया समोर पक्षाच्या वतीने विरोध प्रदर्शन व गुजरात सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना जिल्हा अध्यक्ष मोहसीन खान यांनी सांगीतले की या घटनेचा फक्त निषेध केल्याने समाधान होणार नाही , तर या नीच मानसिकतेला ठेचून काढणे ही काळाची गरज आहे. जो पर्यंत हा निर्णय परत घेतला जात नाही व आरोपींना दिली गेलेली माफी रद्द करुन त्यांना अटक करण्यात येत नाही तो पर्यंत SDPI संवैधानिक मार्गाने याचा विरोध करेल. 'विरोध प्रदर्शनात पक्षा तर्फे जिल्हा समितिचे पदाधिकारी, मोहसीन खान (अध्यक्ष), जब्बार खान (उपाध्यक्ष), मुबश्शिर फारुनी (सरचिटणीस), नदीम शेख (सचिव), महेजबीन बानों (सदस्य) पक्षाचे कार्यकर्ता तसेच नागरीक विशेष करुन स्थानीय महीला मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
Floor test to prove the majority of Nitish Kumar led govt begins in Bihar Legislative Assembly pic.twitter.com/XqOiL4kHLC
— ANI (@ANI) August 24, 2022
कोरोनामुळे दोन वर्ष खसला गणेशोत्सव यावर्षी जोरात साजरा होत आहे. मात्र गणेशोत्सवात लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉलही उभे महागाईचे सावट आहे.गणेशोत्सवासाठी मूर्तीसह सजावटीचे साहित्य दरात किमान २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. याची सामान्यांना झळ बसणार आहे.कोरोनामुळे सण, उत्सवावर निर्बंध होते. यावर्षी सणावरील सर्व निर्बंध शासनाने उठविले आहेत. यामुळे गणेशोत्सव धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीस सुरुवात केली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र शासनाने सर्वच वस्तूंवर जीएसटी लादल्याने महागाईत वाढ झाली आहे.
विधीमंडळाबाहेर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट तसेच विरोधक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. यावेळी भाजपने ५० खोके बारामाती ओके, तसेच महानगरपालिकेचे खोके मातोश्री ओके अशा घोषणा दिल्या. या वेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गाजर दाखवून भाजपचा निषेध केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच मेडिकल चेकअपसाठी आणि उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा देखील सोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Sharing a statement I have just issued to the media pic.twitter.com/TgeF4U4feP
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 23, 2022
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. अशफाक करीम आण सुनील सिंग यांच्या घरांसह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले असून तपास सुरु आहे.
बेनामी संपत्तीसाठी असलेली तीन वर्षांच्या तुंरुगवासाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. बेनामी संपत्तीसंबंधी 1988 च्या कायद्यात तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरदूद असलेलं कलम 3(2) हे घनाबाह्य आणि मनमानी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत न्यायालयाने हे कलम रद्द केले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
15 सप्टेंबरपासून मुंबईकरांना टॅक्सी मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. कारण वाढीव भाडेवाढीसाठी टॅक्सी चालकांनी (Mumbai Taxi Strike) संपाचा बडगा उगारला आहे. वाढत्या सीएनजीच्या (CNG) किंमती पाहता टॅक्सी चालकांकडून सातत्याने भाडेवाढीबाबत मागणी केली जात आहे. सरकार भाडेवाढीविषयी कोणताही निर्णय घेत नाहीये. याचा निशेष म्हणून मुंबई टॅक्सीमन युनियनने 15 सप्टेंबरला टॅक्सीच्या संपाचा इशारा दिला आहे.
डोंबिवली पश्चिमेला घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. पारसनाथ सोसायटी, गायकवाडी डोंबिवली पश्चिम येथे ही घटना घडली आहे. मनीषा मुर्वेकरकर (वय 60 ), वृसला लोढाया (वय 40), रियांश लोढाया अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावं आहेत.
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आता अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. आज पाचवा दिवस असून उद्या अधिवेशनाची सांगता होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज हरियाणा आणि पंजाबचा दौऱ्यावर असणार आहेत. आजच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
T 4388 - I have just tested CoViD + positive .. all those that have been in my vicinity and around me, please get yourself checked and tested also ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2022