LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 24 July 2022 Latest Update: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 24 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 24 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 24, 2022  |  07:09 PM (IST)
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला टीझर संजय राऊत यांनी शेअर केला आहे.
Jul 24, 2022  |  05:54 PM (IST)
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना मातृशोक 

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना मातृशोक 
सरस्वती पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन 
वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jul 24, 2022  |  05:11 PM (IST)
मालवणात अतिउत्साही पर्यटकांची स्टंटबाजी
मालवण शहरात पुन्हा एकदा पर्यटकांची स्टंटबाजी किनारपट्टीवर पहायला मिळाली. आज सकाळी बंदरजेटी परिसरात पर्यटकांची एक गाडी समुद्र किनारी स्टंट करताना दिसून आली. स्थानिकांनी त्याला सूचना करूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत आपली स्टंटबाजी सुरूच ठेवली होती. यापूर्वी अशाच प्रकारच्या दोन घटनांमध्ये समुद्रात गाड्या फसण्याचे प्रकार घडला होता.
Jul 24, 2022  |  04:02 PM (IST)
खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी

खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी 

शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख पदावरुन हकालपट्टी

शिंदे गटाला पाठिंबा दिल्यावर प्रतापराव जाधव यांच्यावर कारवाई

पक्षविरोधी कारवाई केल्याने झाली कारवाई 

Jul 24, 2022  |  03:45 PM (IST)
दिल्लीत भाजपची मुख्यमंत्री परिषद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री परिषद सुरू झाली आहे. या परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत.
Jul 24, 2022  |  03:38 PM (IST)
सांगली : वाकाईवाडी ओढ्यावरील साकव धोकादायक, जीव धोक्यात घालून ग्रामस्थांचा प्रवास
सांगली: शिराळा तालुक्यात सर्वत्र रस्त्याच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र अद्याप डफळेवाडी ता. शिराळा येथील लोकांना अजूनही जीव धोक्यात घालून मोडकळीस आलेल्या लाकडी साकवावरून प्रवास करावा लागत आहे. येथील धोकादायक स्थितीमुळे ग्रामस्थांवर एक किलोमीटरच्या अंतरासाठी चार किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ येत आहे. डफळेवाडी ते वाकाईवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील लाकडी साकव मोडकळीस आला आहे. यामुळे शालेय मुलांना एक किलोमीटरवरील वाकाईवाडी येथील जवळची शाळा सोडून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पनुंबरे वारूण येथील शाळेत जावे लागत आहे. डफळेवाडी डोंगराच्या पायथ्याशी ही दीडशे लोक वस्तीची वाडी आहे. येथे शाळा दुकान गिरण दूध संस्था नसल्याने येथील लोकांना साधी काडीपेटीही खरेदीसाठी एक किलोमीटर अंतरावरील वाकाईवाडी येथे जावे लागते. पायवाटेने डोंगरातून चालत जावे लागते. वाटेतील ओढ्यावर ग्रामस्थांनी स्वखर्चाने लाकडी साकव केला आहे. सध्या तो मोडकळीस आला आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. सध्या पावसामुळे ओड्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्यातून जाता येत नाही. यामुळे जीवनावश्यक वस्तूसाठी चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पणुंब्रेवारूण पर्यंत पायपीट करावी लागते. मुलांना शाळेसाठी किराणामाल व दूध घालण्यासाठी दररोज जावे लागते. सध्या पाऊस व साकवच्या दुरावस्थेमुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोखंडी साकव बसवावा अशी मागणी होत आहे.
Jul 24, 2022  |  02:48 PM (IST)
नंदुरबार: शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
सेंधवा ते विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील कॉंक्रिटीकरणचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या महामार्गावरील तापी आणि गोमाई नदीवरील पूलांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर गेल्या आठ महिन्यात झालेल्या विविध अपघातात 18 जणांना आपला जीव गमावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी वारंवार रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित ठेकेदारांना निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. नागरिकांनी निवेदन देऊनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने आज गोमाई नदी पुलावर शहादा तालुक्यातील सर्व पक्ष नेते आणि प्रकाशा परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. भर पावसात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक आमदार व खासदार यांच्या विरोधातही नागरिकांनी रोष व्यक्त केला. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला व संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Jul 24, 2022  |  02:19 PM (IST)
सोलापुरात गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात
सोलापुरात गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे. अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस उलटली आहे. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
Jul 24, 2022  |  01:16 PM (IST)
औरंगाबाद : सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा

औरंगाबाद : शहरातील पैठण गेट परिसरातून सकल हिंदू समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा देशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला असून, गेल्या काही दिवसांमध्ये इस्लामी जिहादच्या नावाखाली हिंदूंची हत्या करण्यात येत आहत. यात विदर्भातील उमेश कोल्हे, उदयपूरचा टेलर, यांच्या गळा चिरून हत्या करण्यात आले असून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी करण्यात आली आहे. मूक मोर्चा च्या माध्यमातून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला आहे. औरंगाबाद शहराचे नामांतरची घोषणा होताच औरंगाबाद शहरात सुद्धा हिंदूंवरती हल्ले होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या सर्व घटना थांबवण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी मूक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हा मोर्चा पैठण गेट येथुन औरंगपुरा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत येऊन तेथे सभेत रूपांतर झाले. सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, हा मोर्चा आज रोजी शहरात संपन्न झाला आहे.

Jul 24, 2022  |  09:49 AM (IST)
नीरज चोप्राने रचला इतिहास, 19 वर्षांनी भारताला पदक

भारताच्या नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात त्याने 88.13 मीटर भाला फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देत नीरज चोप्रानं इतिहास रचला आहे.

Jul 24, 2022  |  07:44 AM (IST)
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, पहिली लोकल अजूनही सुटली नाही

मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, पहिली लोकल अजूनही सुटली नाही
 

Jul 24, 2022  |  07:43 AM (IST)
पुणे-बंगळुरू मार्गावर केमिकल टँकर उलटला

सातारा-कराडच्या मायणी गावाजवळ हा अपघात झाला आहे. 
टँकरमधून गळती होत नसल्यानं धोका टळला.
 

Jul 24, 2022  |  07:43 AM (IST)
Monkeypox : मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.  जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 
 

Jul 24, 2022  |  07:43 AM (IST)
Neeraj Chopra : नीरज चोप्रा इतिहास रचण्यासाठी सज्ज, वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल फेरी

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर जगभरात भारताचं आणि नीरजचं नाव झालं. आता नीरज आणखी एक मोठी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरज चोप्रानं अमेरिकेतल्या जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेतही कमाल कामगिरी करत अंतिम फेरी गाठली असून आता फायनलमध्ये जिंकून पदकाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे आहे. नीरजनं प्राथमिक फेरीतल्या पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतराची नोंद केली. याच कामगिरीनं त्याला फायनलचं तिकीट मिळवून दिलं.