LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 24 September 2022 Latest Update: महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 24 September 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 24 September 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Sep 24, 2022  |  08:51 PM (IST)
महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद
Sep 24, 2022  |  08:19 PM (IST)
NSE Phone Tapping Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे CBI कोठडीत
Sep 24, 2022  |  08:18 PM (IST)
नोटेचा खरेखोटेपणा तपासणारे 11 भाषेत काम करणारे MANI APP
Sep 24, 2022  |  08:12 PM (IST)
OSMANABAD | शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

Sep 24, 2022  |  08:05 PM (IST)
भाजपला धक्का, मुंबईतील नगरसेविकेने बांधले शिवबंधन

मुंबई : भाजपच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेविका जोत्सना दिघे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश केला.जोत्सना दिघे यांच्या सोबत भाजप कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला.

Sep 24, 2022  |  08:03 PM (IST)
वन कर्मचाऱ्यावर रेती माफियांचा हल्ला

BULDHANA :  संरक्षित जंगलातून अवैधरित्य रेतीचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून कारवाई करत असताना वन कर्मचाऱ्यावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे, यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे, या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील पिंपळगाव नाथ बीट मध्ये घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे, या ठिकाणी वन्यजीव विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय जाता येत नाही, असे असले तरीही अभयारण्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्या मधून अवैधरित्या रेती तस्करी केली जाते.दरम्यान वनरक्षक सिद्धेश्वर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह खामगाव रेंज मधील पिंपळगाव नाथ बीट मध्ये गस्त घालीत असताना, लोखंडा भागातील नदीतून काही लोक ट्रॅक्टर द्वारे रेतीचा उपसा करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता काही लोक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याचे त्यांना दिसून आले, त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत पुढील कारवाई करत असतानाच, कोथळी येथील युसुफ डॉन म्हणून ट्रॅक्टर मालक त्या ठिकाणी पोहोचला व त्याच्यासह इतर व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला, यामध्ये वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील, वनमजुर ज्ञानेश्वर पुंजाजी सोनूने व ज्ञानसिंग मोहन सिंग पडवाल हे तिघे यात जखमी झाले, त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून याप्रकरणी वन गुन्हा दाखल करून बोराखेडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी दिली आहे.

Sep 24, 2022  |  05:57 PM (IST)
AMRAVATI | अल्पवयीन मुलीचा अपहरण करून पळून नेणाऱ्या आरोपीची हत्या

चाकूचा धाक दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला नवीन नावाच्या आरोपीने 21 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता अपहरण केले होते. त्यानंतर पीडितेचा कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनवर आक्रोश करीत, आरोपींना फाशीची शिक्षा द्या असा टाहो फोडला होता. २२ सप्टेंबरला रात्री दरम्यान आरोपी नहीमने अल्पवयीन मुलीला सुखरूप घरी सोडून दिले. त्यानंतर त्याने परिसरातील नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवत भीतीमय वातावरण निर्माण केले. कंटाळलेल्या जमावाने आरोपी नहीमची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचलेत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा चांदूर पोलिसांनी नोंदविला आहे. दरम्यान, गारोडीपुरा परिसरात सद्या भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील या परिसरात ठेवण्यात आला आहे. आरोपीं नहीम हा कुख्यात गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sep 24, 2022  |  03:26 PM (IST)
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी शेलगावच्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

SOLAPUR : बार्शी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीला मोठा फटका बसला. तालुक्यातील जवळपास सर्वच मंडलात अतिवृष्टी झाल्याचं दिसून आले. 
मात्र प्रशासनेने फक्त दोनच मंडलांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर केली होती. त्यामुळे आठ मंडलातील शेतकरी लाभापासून वंचित आहेत. उर्वरित मंडलांतील शेतकऱ्यांना  नुकसानभरपाई न मिळाल्याने शेलगाव येथील तलावात तब्बल 3 तास शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.

Sep 24, 2022  |  02:58 PM (IST)
CHANDRAPUR | कोर्टावर नेहमीच अविश्वास दाखवणाऱ्या लोकांना कोर्टावर विश्वास बसेल अशी अपेक्षा - मुनगंटीवार

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दिली. यावर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत, 'आतातरी न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास बसेल.  न्यायव्यवस्थेच्या निर्णयामुळे अविश्वास दाखवणाऱ्या लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास बसेल अशी अपेक्षा. नेहमीच न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे लोक या निर्णयामुळे तरी न्यायालयावर विश्वास दाखवतील, अशी अपेक्षा करूया.' असेही ते म्हणाले.

Sep 24, 2022  |  01:15 PM (IST)
SATARA | राष्ट्रवादीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात- मंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आता जिल्ह्यात आठ पैकी चार राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार शिल्लक राहिले आहेत.  विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात 2024 मध्ये दूध का दूध पानी का पानी झाल्याचे दिसेल. आमदार शशिकांत शिंदेंना खोके घेऊनच पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाला सांगावे आणि 50 खोके घ्यावे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसवर शंभूराज देसाई यांनी हल्लाबोल केला.

Sep 24, 2022  |  12:00 PM (IST)
Crude Oil Price Falling: तीन महिन्यात 30 डॉलरहून अधिक घट

मागील काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रति डॉलर इतके होते. त्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दर घसरू लागले आहेत. साधारणपणे कच्च्या तेलाच्या दरात मागील तीन महिन्यात 30 डॉलरची घसरण दिसून येत आहे.
 

Sep 24, 2022  |  11:46 AM (IST)
गेल्या 24 तासांत देशात 4912 नवीन कोरोनाबाधित

गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 44 हजार 436 सक्रिय रुग्ण आहेत.

Sep 24, 2022  |  11:08 AM (IST)
Bullet Train : देशातील समुद्राखालचा पहिला भुयारी मार्ग मुंबईत

देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन  धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदा समुद्रतळाशी बोगदा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडने यासाठी निविदा मागवल्या आहेत. 

Sep 24, 2022  |  10:38 AM (IST)
राजू श्रीवास्तवच्या स्मरणार्थ रविवारी मुंबईत शोकसभा

राजू श्रीवास्तवच्या स्मरणार्थ रविवारी (25 सप्टेंबर 2022) मुंबईत शोकसभा, जुहूच्या इस्कॉन टेम्पलमध्ये संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत होणार शोकसभा

Sep 24, 2022  |  10:37 AM (IST)
PFI विरोधात भारतात 'ऑपरेशन ऑक्टोपस'

PFI विरोधात भारतात 'ऑपरेशन ऑक्टोपस', 11 राज्यात 22 सप्टेंबर 2022 रोजी मोठी कारवाई; 106 PFI सदस्यांना अटक

Sep 24, 2022  |  10:35 AM (IST)
भारतात 44 हजार 436 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण, मागील 24 तासांत 4912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतात 44 हजार 436 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण, मागील 24 तासांत 4912 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. देशात 217 कोटी 41 लाख 4 हजार 791 कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचले

Sep 24, 2022  |  10:32 AM (IST)
पुण्यात PFI विरोधात FIR

पुण्यात PFI विरोधात FIR

Sep 24, 2022  |  10:29 AM (IST)
राज्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

Sep 24, 2022  |  09:44 AM (IST)
मुंबई गोवा महामार्ग मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू

तब्बल 36  तासांनंतर मुंबई-गोवा हायवे सुरू झाला आहे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस काढण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हायवे सुरू झाला आहे. बुधवार दुपारपासून टँकर अपघातामुळे मुंबई गोवा महामार्ग बंद झाला होता. आता मुंबई गोवा महामार्ग मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झाला आहे. 

Sep 24, 2022  |  08:23 AM (IST)
आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा Yellow अलर्ट 

पहाटेपासून पुन्हा मुंबईत बऱ्याच ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान राज्यातील पावसाचा जोर कमी होत चालला आहे. मात्र आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.