LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 25 August 2022 Latest Update: विधानसभेत औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव संमत

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 25 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 25 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 25, 2022  |  07:09 PM (IST)
नागपुरातील बाप्पाच्या मूर्तीला परदेशातून मागणी 

नागपुरातील चितारोली मध्ये सर्व प्रकारच्या मूर्ती बनविले जातात ही वस्ती मध्यभारतमधील सर्वात मोठी मूर्ती बनवण्याची वस्ती आहे. चितारोलीमध्ये गणपतीची मूर्ती लहान असो की मोठ्या सर्वप्रकारच्या मूर्ती बनविले जातात. इथल्या मूर्ती देखण्या आणि सुंदर असतात म्हणून ह्या मूर्तींना इतर राज्यातूनच नाही तर परदेशातून पण मागणी असते. गेल्या 2 वर्षांच्या कोरोना काळ सोडला तर दरवर्षी इथून परदेशात मूर्ती जायची. यावर्षी राज्य शासनाने बंदी उठवल्यानंतर पुन्हा मूर्तिकारांना आता परदेशातून मूर्तीची मागणी येत आहे.

Aug 25, 2022  |  06:47 PM (IST)
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई. दि. २५ ऑगस्ट २०२२ : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ ( मुंबई दिशेने ) ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्यावतीने दिनांक २६.०८.२०२२ रोजी करण्यात येणार आहे. या कारणास्तव दुपारी १२.०० ते १४.००  या कालावधीत वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग ( राष्ट्रीय महामार्ग ४८ ) सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात येणार आहे.

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी  मार्गाचा वापर करावा तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई –पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा  दुरध्वनी  क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

Aug 25, 2022  |  04:59 PM (IST)
मुंबई : मानखुर्दमधून 2 कोटींहून अधिकचे ड्रग्ज जप्त

मुंबई : मानखुर्दमधून 2 कोटींहून अधिकचे ड्रग्ज जप्त

Aug 25, 2022  |  04:14 PM (IST)
बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखांत घरे दिली जाणार - मुख्यमंत्री

बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखांत घरे दिली जाणार 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा

Aug 25, 2022  |  04:08 PM (IST)
बीड - बैलपोळ्यानिमित्त बाजारपेठ सजली; 20 टक्क्यांनी वस्तूंचे दर वाढले

बीड जिल्ह्यात बैल पोळ्याची लगबग सुरू झाली आहे. आज बैलांची खांदा मळणी झाल्यानंतर उद्या बैलपोळा साजरा केला जातो. तत्पूर्वी बाजारात शेतकऱ्यांनी पोळ्यानिमित्त खरेदी करण्यास गर्दी केली आहे. 

मागील वर्षी कोव्हिडमुळे शेतकऱ्यांना पोळ्याचा सण साजरा करता आला नाही. यंदा मात्र निर्बंध उठले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाची ओळख आणि याच निमित्त आपल्या सर्जा-राजाला आकर्षक असे सजविले जाते.

ग्रामीण भागात पोळा सणाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान बैलांसाठी लागणारी मोरखी, येसन, घागर माळ, घुंगरू माळ, येसनजोड, गोंडे असे विविध वस्तू खरेदी केल्या जातात. दोन वर्षानंतर यंदा या सर्व वस्तूंमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Aug 25, 2022  |  03:09 PM (IST)
विधानसभेत औरंगाबाद आणि उस्नामानाबादच्या नामांतराचा ठराव संमत

विधानसभेत उस्मानाबादचे धाराशिव नामांतराचा ठराव संमत 

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतराचा ठराव संमत 

नवी मंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव

Aug 25, 2022  |  02:59 PM (IST)
जळगाव | ठिबक सिंचनच्या पाईपांमध्ये अटकून हरणाचा मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव शेत शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठिबकच्या नळ्यानमध्ये अटकून एका हरणाचा मृत्यू झाला तर नायगाव पोलीस पाटील योगेश देशमाने यांच्या सतर्कतेमुळे दुसऱ्या हरणाचा जीव वाचला योगेश देशमाने यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणी जाऊन ठिबकच्या नळ्यानमध्ये अडकलेल्या  दुसऱ्या हरणाला नागरिकांच्या मदतीने काढून त्या हरणाचा जीव वाचविला या कार्यामुळे नायगाव येथील पोलीस पाटील योगेश देशमाने यांचे व गावातील नागरिकांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

Aug 25, 2022  |  02:18 PM (IST)
चोपड्यात गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांवर खड्डेच खड्डे; नागरिकांची दुरुस्तीची मागणी 

चोपडा शहरात 45 ते 50 सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणपती मोठ्या प्रमाणावर स्थापन केले जातात.चोपडा शहरात गणेश उत्सव पाच दिवसाचा असतो.पाचव्या दिवशी गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व वाजत गाजत केली जाते. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता चोपडा शहरात विसर्जन मार्गासह इतर रस्त्यांवरील खड्ड्यांची अवस्था अतिशय भयानक आहे नगरपालिका प्रशासनाकडे व तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी लेखी व तोंडी स्वरूपाचे सूचना दिल्यावर देखील या रस्त्यांकडे पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती केली जात नाही पदाधिकारी व नागरिक यांनी निवेदन अथवा सूचना केल्या असता नगरपालिका प्रशासन खड्ड्यांमध्ये तात्पुरता स्वरूपात बारीक कच टाकली जाते परंतु त्या कच टाकल्यामुळे नागरिकांना मोटरसायकल व सायकल स्लिप होण्याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो व पायी चालणाऱ्यांना पायाला दुखापत होते तरी देखील नगरपालिका प्रशासन मुरूम अथवा पिवळी माती ज्याच्याने नागरिकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था नगरपालिका कडून होताना दिसत नाही गणेश उत्सव काही दिवसांवर आले आहे गणरायाची स्थापनेचा आधी नगरपालिका प्रशासनाने विसर्जन मार्गावरील सर्व रस्त्यांवर खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी गणेश मंडळाचे पदाधिकारी व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.

Aug 25, 2022  |  12:43 PM (IST)
सार्वजनिक नळ बंद करण्याविरोधात माकपची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - माजी आमदार कॉ.नरसय्या आडम

सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक नळ बंद करणे, घरपट्टीत पाच टक्के करवाढ तसेच सोलापुरातील फेरीवाल्यांना लावलेल्या जाचक अटी विरुध्द माकपने आक्रमक भूमिका घेतलीय. या निर्णयाविरुद्ध माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकारी यांच्यासमवेत लवकरच संयुक्त बैठक लावून हा आदेश रद्द करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी दिली. याबाबत काल त्यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.

Aug 25, 2022  |  12:39 PM (IST)
शिंदे-ठाकरे संघर्ष, सर्वोच्च न्यायालयात आज ऐवजी सोमवार २९ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होण्याची शक्यता

शिंदे-ठाकरे संघर्ष, सर्वोच्च न्यायालयात आज ऐवजी सोमवार २९ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

Aug 25, 2022  |  10:41 AM (IST)
दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, २५ प्रवासी जखमी

रत्नागिरीमधील दापोलीमध्ये दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसचं स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 

Aug 25, 2022  |  10:29 AM (IST)
अकोला - अकोल्यात मिटकरींच्या ग्राम स्वराज्य पॅनल चा पॅनलचा दारुण पराभव 

 अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील रोहनखेड सेवा सहकारी सोसायटी मध्ये कास्तकार पॅनलचा दणदणीत विजय.  कास्तकार पॅनलचे 13 पैकी 13 ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी. आ.अमोल मिटकरी यांच्या ग्राम स्वराज्य पॅनल चा लाजिरवाणे दारुण पराभव

Aug 25, 2022  |  08:45 AM (IST)
दुरांतो एक्सप्रेस बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Aug 25, 2022  |  08:42 AM (IST)
राज्य सरकारची कर्मचाऱ्यांना खुशखबर, 29 ऑगस्टलाच पगार होणार 

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिल्याने आनंदाचे वातावरण आहे. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणार आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणार आहे. शासनाने यासंदर्भात काल परिपत्रक काढले आहे.
 

Aug 25, 2022  |  07:39 AM (IST)
  Monsoon Assembly Session : अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस;कालच्या राड्यानंतर आज काय होणार याकडे लक्ष

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) शेवटाकडे येताना जोरदार तापलं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या जोरदार राड्यानंतर वातावरण अजूनच जास्त तापलेलं आहे.
 

Aug 25, 2022  |  06:46 AM (IST)
भुसावळ- मारहाण व ठार मारण्याची धमकी:तलवारीने दहशत; महिलेस केली मारहाण

जुन्या भांडणाच्या वादातून घरात घुसून महिलेस मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी राहूल पाटील व विष्णू पथरोड या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना २३ ऑगस्टला रात्री ८.३० वाजता भारत नगरमध्ये घडली. राहूल पाटील व विष्णू पथराेड (रा. वाल्मीक नगर, ३२ खाेली, भुसावळ) हे मंगळवारी रात्री भारत नगरातील एका कुटुंबावर हल्ला करण्यासाठी गेले होते. हातात तलवार घेऊन ते फिर्यादी महिलेच्या घरात शिरले. नंतर महिलेस मारहाण व विनयभंग केला. 
 

Aug 25, 2022  |  06:44 AM (IST)
Nagpur accident : मौद्यात स्वीफ्ट कारने दुचाकीला चिरडले

 नागपूर जिल्ह्यातील मौद्यात मोठा अपघात झाला. मौदा पुलावर स्वीफ्ट कारने दुचाकीला उडविलं. हा अपघात अतिशय भीषण होता. स्वीफ्टनं धडक देताच बाईकवरून दोघेही सरळ पुलाच्या खाली कोसळले. ते दोघेही नदीपात्रात पडले. त्यात एक महिला व पुरुष असल्याचं सांगण्यात आले. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजता घडली. स्वीफ्ट कारमधील तिघे जखमी झाले आहेत. ही घटना मौदा पुलावर घडली. अपघात इतका भयानक होता की, पुलावरील कठड्याला आदळून स्वीफ्टवरील कार तसेच बाईक चेंदामेंदा झाल्या
 

Aug 25, 2022  |  06:42 AM (IST)
Mumbai Municipal: मुंबई महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

विधानसभेत मुंबई महापालिका वॉर्ड रचना सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. यावेळीही विरोधक आणि सत्ताधारी पक्षात जोरदार वाद झाला. महत्त्वाचे म्हणजे या सुधारणा विधेयकाला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता ठाकरे गटाची शिवसेना आता एकटी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले.
 

Aug 25, 2022  |  06:40 AM (IST)
शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करुन धावत्या कारमध्ये बलात्कार

शाळकरी मुलीवर झालेल्या बलात्कराच्या घटनेने वर्धा जिल्हा हादरला आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पुलगाव शहरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाविरोधात आणि त्याला मदत करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 

Aug 25, 2022  |  06:39 AM (IST)
पुण्यात पोलिसांच्या धाडीत लॉजवर मिळाल्या 3 बंगाली तरुणी

पुणे पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन बुकिग घेऊन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंडवडमधील वाकड येथील रांजना लॉजवर धाड टाकून सामाजिक सुरक्षा पथकाने ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तीन मुलींची सुटका केली आहे.