LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 25 July 2022 Latest Update : Droupadi Murmu : Highest Tax Payer: थलैवा रजनीकांत यांचा कर विभागाकडून सन्मान

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 25 July 2022 Latest Updat
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 25 July 2022 Latest Updat

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 25, 2022  |  08:17 PM (IST)
अमित ठाकरेंनी घेतला कोथिंबीर वडी आणि वडापावचा आस्वाद
नवी मुंबई : अमित ठाकरेंनी घेतला कोथिंबीर वडी आणि वडापाव चा आस्वाद... बेलापूरमधील इंदू वडापाव सेंटरला अमित ठाकरे यांनी दिली भेट
Jul 25, 2022  |  06:15 PM (IST)
ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण

पावसाळ्याच्या दिवसात विविध आजर आणि साथीचे रोग डोकी वर काढत असतात. त्यात डेंग्यू, मलेरिया स्वाईन फ्ल्यू सारख्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळते. ठाण्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या २० वर गेली आहे तर डेंग्यूचे १४ रुग्ण सक्रीय असल्याने चिंतेच वातावरण तयार झाले आहे. यासाठी महापालिका उपाययोजना करत असून नागरिकांनी देखील आपली स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिका आयुक्तांनी केली आहे.

ठाणे महानगर पालिकेत स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्ल्यूचे २० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ रुग्ण दगावले आहेत. तर डेंग्यूचे १४ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासाठी ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून महापालिका स्तरावरून फवारणी आणि फोगिंग सारखे उपक्रम हाती घेऊन बळकट करण्यात आले आहेत. तसेच डेंग्यूचे रुग्ण ज्या परिसरात आढळतात त्या परिसरात ठाणे महानगरपालिका कडून पथक रवाना केले जाते हे पथक ठिकाणी मच्छर उत्पत्ती होणारे ठिकाण शोधून उद्ध्वस्थ करण्याचे काम करते. तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून उघड्या पाण्याचा साठा म्हणजेच जुने टायर, कुलर, बदल्या, ड्रममध्ये पाणी साचवून ठेवू नये अशा सूचना देत फवारणी केली जाते.

Jul 25, 2022  |  05:31 PM (IST)
पिकांवर फवारणी करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन

नागपूर : खरीप हंगामात पिकांवर फवारणी करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे फवारणी करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सूचना करीत काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. खरीप हंगामात कपाशी, तूर यांसह फळपिकांव फवारणी करण्यात येत आहे. मात्र, फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने मागील दोन चार वर्षात अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सूचना केल्या असून, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Jul 25, 2022  |  04:29 PM (IST)
अर्जुन खोतकरांनी सेना सोडलेली नसून वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली: जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

अर्जुन खोतकर यांनी शिवसेना सोडलेली नसून वैयक्तिक कामानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असून त्यांची शिवसेनेवर प्रचंड निष्ठा आहे. त्यामुळे खोतकर यांनी शिवसेनेतच राहावे त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिलीय. खोतकर यांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिंदे गटाने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला असला तरी जोपर्यंत स्वतःहून खोतकर शिवसेनेचा त्याग केला असं म्हणत नाही तोपर्यंत त्यांनी शिवसेना सोडली असं म्हणता येणार नाही असंही आंबेकर यांनी म्हटलं आहे.

Jul 25, 2022  |  02:48 PM (IST)
DELHI : छत्रपती संभाजीराजे आणि खासदार धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
DELHI : छत्रपती संभाजीराजे आणि खासदार धैर्यशील माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
Jul 25, 2022  |  02:44 PM (IST)
Highest Tax Payer: थलैवा रजनीकांत यांचा कर विभागाकडून सन्मान
तामिळ चित्रपटांचे सुपरस्टार रजनीकांत सर्वाधिक आयकर भरतात, यामुळे आयकर दिनानिमित्त आयकर विभागाने थलैवा रजनीकांत यांचा गौरव केला. ही माहिती रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने तिच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 
Jul 25, 2022  |  12:29 PM (IST)
Big News : Katrina kaif, Vicky kaushal ला जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचं स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती, अभिनेता विकी कौशलच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या लोकप्रिय जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Jul 25, 2022  |  12:27 PM (IST)
SANGLI : होड्यांच्या रोमहर्षक स्पर्धेत अखंड बोट बुडाली ; मात्र पट्टीतल्या पोहणाऱ्यांमुळे सर्वजण सुखरूप
सांगलीच्या कृष्णा नदीकाठी रविवारच्या सायंकाळी होड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या रोमहर्षक स्पर्धेत १० होड्यांनी सहभाग नोंदविला होता. सध्या पावसाळा असल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशातच प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी होड्यांमध्ये चढाओढ लागली होती. स्पर्धेची दुसरी फेरी सुरू होती. आयर्विन पुलाजवळ तरुण मराठा बोट क्लब या मंडळाची होडी आली. यावेळी या होडीच्या मागे एक होडी होती. अचानकपणे सदरची होडी बुडाली. कृष्णेकाठी असणाऱ्या प्रेक्षकांना काहीच कळेना. बोट कुठे गेली असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, या होडीत असणाऱ्या पट्टीतल्या पोहणाऱ्यांमुळे होडीसह सर्वजण सुखरूप बाहेर आले.
Jul 25, 2022  |  12:22 PM (IST)
Coronavirus : दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे, पण तुलनेन मृत्यूची संख्या वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 

Jul 25, 2022  |  11:30 AM (IST)
President Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मू झाल्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती, CJI यांनी त्यांना शपथ दिली

द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यानंतर देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळाल्या. CJI NV Ramanna यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, त्यांच्यासाठी देशातील तरुण आणि महिलांचे हित सर्वोपरी असेल. त्यांना स्वतःचा अभिमान वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. 

Jul 25, 2022  |  11:30 AM (IST)
राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं- जितेंद्र आव्हाड

राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसत काल जे नितीन गडकरी आपल्या भाषणात बोलले कि आता राजकारण्यांचा आणि राजकारणाचा कंटाळा यायला लागला आहे. ते म्हणाले आता फक्त सत्ताकारणाच राजकारण होत ते बोलले ते सत्य आहे. सत्ता हा लोकशाही कल्याणकारी मार्गाचा मार्ग दाखवतो त्याच्यात लोककल्याणाची भाषा असली पाहिजे. सत्ता सत्तेसाठी नसावी. त्यामुळे राजकारणाचा खरा अर्थ हा आहे कि जिथे जिथे आपले हाथ गरिबांचे आश्रू पुसण्यासाठी जातात ज्याला ज्याला मदत हवी असते तिथे तिथे आपला हाथ आधारासाठी मदतीसाठी जातो गोरगरीब शोषितांना जिथे गरज असते तिथे आपण धावून जातो सत्ता हि त्यासाठी दुय्यम आहे मनात ती भावना असावी आणि मला वाटत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही भावना आम्हाला दिसतेय आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्व ठिकाणी आम्ही असे कॅम्प आयोजित केले कुठल्या भागातून किती मत मिळतात कुणाला मिळतात हा प्रश्न गौण आहे पण कुठलाही भाग असो तेथील नागरिकांना मदत झाली पाहिजे. असे माजी मंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Jul 25, 2022  |  10:32 AM (IST)
SOLAPUR - विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग वागदारी परिसरातील गावाकऱ्यांनी पावसाचा घेतला आनंद खरीप पिकांना पुन्हा आलेल्या पावसामुळे मिळाले जीवदान
Jul 25, 2022  |  10:09 AM (IST)
बीड - धनंजय मुंडे यांचा भाजप खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा; केंद्राच्या विकास निधीवरून टीकास्त्र

बीडच्या परळी येथील वैजनाथ मंदिराच्या निधीवरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला आहे. छत्तीसगड इथल्या वैद्यनाथ मंदिराला केंद्र सरकार 1600 कोटी रुपये देतं, त्यावेळी आपल्या भागातील प्रतिनिधी काय करतात? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. परळीच्या विद्यानगर भागात निर्माण करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात मुंडे बोलत होते. 

Jul 25, 2022  |  09:41 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30, 31 जुलै रोजी करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30, 31 जुलै रोजी करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा 

Jul 25, 2022  |  09:24 AM (IST)
चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, आई सरस्वती पाटील यांचं निधन

महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 25, 2022  |  09:22 AM (IST)
Akshay Kumar Income Tax: एका वर्षात 5-6 चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारने भरला सर्वाधिक आयकर

सुपरस्टार अक्षय कुमार चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा स्टार बनला आहे. यासाठी आयकर विभागाने अक्षयला 'सन्मान पत्र'ही दिले आहे. अभिनेते वर्षभरात फक्त 5-6 चित्रपट करतात आणि ते इतके भरमसाठ फी घेतात की ते इंडस्ट्रीतील सर्वाधिक कर भरणारे स्टार बनले आहेत.

Jul 25, 2022  |  09:20 AM (IST)
पिंपरीत गुप्तधनाच्या हव्यासातून नरबळीसाठी ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण

नरबळी देण्याच्या उद्देशाने चिखली येथून पळवलेल्या ४ वर्षीय मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या काही तासांतच सदर मुलीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जुन्नर येथून चौघांना अटक केली असून आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Jul 25, 2022  |  09:16 AM (IST)
Maharashtra Rains : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 3 दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.  पुढचे 3 दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Jul 25, 2022  |  09:14 AM (IST)
भाजप उपाध्यक्षांनी फार्महाऊसवरच थाटला वेश्या व्यवसाय; ५०० कंडोम सापडले, ७३ जण अटकेत

मेघालयमधील तुरा येथील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही सेक्स रॅकेट भाजपच्या नेत्याच्या फॉर्महाऊसवर सुरू असल्यानं भाजपला टीकेला सामोरे जावे लागणार आहे. याप्रकरणी मेघालय राज्य भाजपचे उपाध्यक्ष बेर्नार्ड एन. मरक यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आरोप झाला आहे. 

Jul 25, 2022  |  09:13 AM (IST)
Shivsena : इंदापूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

इंदापूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याप्रकरणी विशाल बोंद्रे यांनी गटबाजीतून हा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप संबंधित महिलेवर केला आहे.  जर 14 जुलै रोजी हा प्रकार झाला होता, तर ही महिला इतक्या दिवस शांत का बसली? असा देखील सवाल बोन्द्रे यांनी केला आहे. त्यामुळे इंदापूरमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.