LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 26 August 2022 Latest Update: 27 - 30 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेचा इशारा

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 26 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 26 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 26, 2022  |  09:50 PM (IST)
संभाजी ब्रिगेडची 'शिल्लक सेने'सोबतची युती सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनाला वेदना देणारी -  शीतल म्हात्रे

जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचं मत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे.शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा शिल्लक सेनेवर हल्लाबोल. संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे हे माहीत असूनही ही युती करणं हे अनाकलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

Aug 26, 2022  |  06:17 PM (IST)
मालाडच्या मढ परिसरात CRZ कायद्याचे उल्लंघन करून बांधलेल्या सर्व स्टुडिओंना मुंबई मनपाची नोटीस

मालाडच्या मढ परिसरात CRZ कायद्याचे उल्लंघन करून बांधलेल्या सर्व स्टुडिओंना मुंबई मनपाने नोटीस बजावण्याची कारवाई सुरू केली, सूत्रांची माहिती

Aug 26, 2022  |  06:12 PM (IST)
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात होणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाला सहा गावातील ग्रामस्थांचा विरोध

सातारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने उत्तर कोरेगाव मध्ये नव्याने होणाऱ्या औद्योगिक प्रकल्पाला त्या भागातील असणाऱ्या सहा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी आमदार जयकुमार गोरे आणि महेश शिंदे यांना देखील ह्या औद्योगिक प्रकल्पाला विरोध असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे..कोरेगाव तालुक्यातील सोळशी, नायगाव, नांदवळ,रंनदुल्लाबाद, करंजखोप, पिंपोडे, भावेनगर या ठिकाणी असणारे सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.. शेतकऱ्यांना अत्यल्प जमिनी असल्यामुळे ही नव्याने होणारा औद्योगिक प्रकल्प रद्द करून इतरत्र हलवावा अशी मागणी यावेळी सहा गावातील एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी केलीय.

Aug 26, 2022  |  05:52 PM (IST)
NASHIK | नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्याला अटक

नाशिक : नाशिकमध्ये CBI लाचलूपचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई करण्यात आली, आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईनंतर आता जीएसटी विभागातील उच्च पदस्थ अधिकारी रवींद्र चव्हाणके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतला आहे. लाचलुचपत विभागाने जीएसटी अधिकाऱ्यावर केलेल्या या कारवाईचं कारण लाच घेतल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या सिडको भागातील जीएसटी कार्यालयात सीबीआयने ही कारवाई केली आहे. दरम्यान जीएसटी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आदिवासी विभागातील अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लाचलुचपत विभागाची एक नवी कारवाई समोर येत आहे.कालच नाशिकच्या आदिवासी विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्याला  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होतं. सेंट्रल किचन बिल मंजूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं होतं. तर आज पुन्हा एक कारवाई समोर आली आहे.गेल्या काही दिवसांत नाशिकच्या विविध विभागातील लाच प्रकारणे समोर येत असून यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच निदर्शनास आले आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

Aug 26, 2022  |  03:59 PM (IST)
27 - 30 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेचा इशारा

27 - 30 ऑगस्ट, काही जिल्ह्यांसाठी काही - काही ठिकाणी मेघगर्जना, हवामान विभागाचा इशारा. 
इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता.
येत्या २४ तासांत राज्यात हवामानाचा कोणताही इशारा नाही

Aug 26, 2022  |  03:47 PM (IST)
आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. आज मुख्यमंत्री झालो आहे त्या मागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने झालो. तमाम जनतेच्या भावनांमुळे खुप मोठी जवाबदारी  पेलण्याची संधी मिळाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात अनेक वर्षे काम केले. त्यांचा आदर्श,शिकवण आणि कार्यपध्दती आज ही डोळ्यासमोर आहेत. आनंद दिघे यांची भावना होती की या पदावर ठाण्यामधील माणुस असावा.  जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. पद कोणते मिळाले हे बघण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. 

Aug 26, 2022  |  03:13 PM (IST)
मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार

राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली.
 

Aug 26, 2022  |  03:09 PM (IST)
विदयार्थ्यांनी बनवल्या पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती 

नाशिक -  चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्था संचलित श्री नेमिनाथ जैन विद्यालयात शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  विद्यालयाचे हे शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेची अकरावे वर्ष आहे. अशी माहिती विद्यालयाचे  उपक्रमशील कलाशिक्षक काशिनाथ व्हि यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना शाडू माती भिजविणे, गोळा करण्यापासून  पासून ते मातीच्या गोळ्याला आकार देऊन आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धन संस्कार व्हावेत या हेतुने शाडू मातीचे फायदे सांगून गणेश मूर्ती मध्ये तुळशी, कडुलिंब, सीताफळ इत्यादीच्या बियांची रुजवण करण्यास सांगितले. उत्सव काळात मूर्तीला अर्पण केलेले निर्माल्य झाडांना टाकून त्याचा खत म्हणून वापर करा. डेकोरेशन करताना कागद, कापड, पुठ्याचा वापर करा असे आवाहन कार्यशाळेत मार्गदर्शन करत असताना करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील उपशिक्षक आर. पी. चव्हाण, एस. एल. गुळेचा, एच. पी. पोलगीर, एन. जी. जामदार, डी. आर. नरोटे, ए. यु. सोनवणे, साईनाथ बिडगर आदी सर्वांनी सहकार्य करून कार्यशाळा यशस्वी केली. विद्यालयाच्या या उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, मानद सचिव जवाहरलाल आबड, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भन्साळी विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलीझाड, महावीर पारख, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर, प्राचार्य डॉ. संगीता बाफना, उपमुख्याध्यापक संदीप समदडिया, पर्यवेक्षक रविंद्र पवार यांनी  कौतुक केले.

Aug 26, 2022  |  01:03 PM (IST)
 आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे  - किशोरी पेडणेकर

 आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे  - किशोरी पेडणेकर (माजी महापौर)
- टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे
- कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही
- मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार
- मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी
- पण हे विसरू नये की २५ मधील २० वर्ष ते आमच्या सोबतच होते
- स्थायी समितीमध्ये भ्रष्टाचार होतो असं ते म्हणतात मग यशवंत जाधवांना सोबत का घेतलं ?
- भरत गोगावले तुम्हाला आठ माळ्यावरच्या मातोश्रीवर कोणी बोलावलं नाही आणि तुम्ही येऊ ही नका
- भाजपमध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेला आहे
- आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत
- नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही 

Aug 26, 2022  |  01:02 PM (IST)
सामना हे वर्तमानपत्र नसून ऐका पक्षाचे पॉम्पलेट आहे - मंत्री सुधीर मुनगंटीवार

अतिवृष्टीच्या संदर्भात सरकारच्या ज्याकाही योजना आहेत. ते जुने परिपत्रक आहेत. त्या परिपत्रका नुसार अतिवृष्टीने ज्यांच नुकसान झालं त्या सर्वांना मदत मिळणार. 

Aug 26, 2022  |  12:09 PM (IST)
बीड - ग्रामीण भागात बैलपोळाचा उत्साह; पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलांची खांदे मळणी
आज बैलपोळा शेतकरी आणि बैलातील नातं घट्ट करणारा सण... या सणाच्या पूर्वसंध्येला शेतकरी आपल्या सर्जा राजाची खांदे मळणी करतो. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदा बैलपोळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्षांमध्ये साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा करावा लागला. आज अखेर निर्बंध पूर्णपणे उठवले गेल्याने बैल पोळा उत्साहात साजरा होत आहे. आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील शेतकरी महादेव पोकळे यांच्याकडे अडीच लाखांची बैल जोडी आहे. आणि याच बैल जोडीला तुपात हळद खलवून बैलांची खांदे मळणी करण्यात आली. बैलांच्या खांद्यावर बाराही महिने कष्टाचे काम असते. म्हणून पोळ्याच्या पूर्वसंध्येला दोन दिवस ही खांदे मळणी केली जाते.
Aug 26, 2022  |  12:04 PM (IST)
टीईटी प्रकरणानंतर अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या; निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश

टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत.  पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे. 

Aug 26, 2022  |  11:36 AM (IST)
गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा

Aug 26, 2022  |  11:22 AM (IST)
महाराष्ट्रात आयकर विभागाचे धाडसत्र सुरू

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथे शिरोळ तालुका पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या पतीवर आयकर विभागाने टाकली धाड, सोलापूर आणि पंढरपूरसह अन्य ठिकाणी पडलेल्या साखर कारखान्यावरील धाडींनंतर पडली ही धाड

Aug 26, 2022  |  11:16 AM (IST)
सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नियुक्तीपत्र मिळालेल्या पदाधिकाऱ्यांचे सोलापुरात जंगी स्वागत
नुकतच सोलापूर शिवसेना शिंदे गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर हे पदाधिकारी सोलापुरात पोहंचले, तेव्हा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं, नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं.त्यानंतर कार्यकर्त्यांनी हार - तुरे देऊन नूतन जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांचा सत्कार केला.
Aug 26, 2022  |  11:00 AM (IST)
दहा सेकंदात नष्ट होणार भारतातील दोन सर्वात उंच इमारती
Aug 26, 2022  |  10:49 AM (IST)
BWC 2022: सात्विकसाईराज रँकीरेड्डी- चिराग शेट्टी जोडीनं इतिहास रचला; उपांत्य फेरीत धडक

बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत भारताच्या पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी चिराग शेट्टीनं इतिहास रचला. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीनं जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांचा 24-22, 15-21, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली

Aug 26, 2022  |  10:46 AM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, उरीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, उरीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

Aug 26, 2022  |  10:16 AM (IST)
दिल्ली पाठोपाठ पंजाबच्या दारू धोरणाच्या चौकशीची मागणी

आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील दारूवरील कराबाबतच्या सरकारी धोरणाची आणि निर्णयांची कसून चौकशी करा; शिरोमणी अकाली दलाची मागणी. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने दारू प्रकरणात किमान ५०० कोटींचा अबकारी कर घोटाळा केला आहे; शिरोमणी अकाली दलाच्या सुखबीर सिंह बादल यांचा आरोप.

Aug 26, 2022  |  10:12 AM (IST)
भारत : अग्निपथ योजनेत गोरखा जवानांची भरती होणार

भारत : अग्निपथ योजनेत गोरखा जवानांची भरती होणार, गोरखा जवानांची भरती भारत थांबवणार हे वृत्त म्हणजे निव्वळ अफवा; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती