LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 26 July 2022 Latest Update : 'या' राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, IMD ने जारी केला Alert

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 26 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 26 July 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 26, 2022  |  08:54 PM (IST)
MUMBAI | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
Jul 26, 2022  |  05:30 PM (IST)
कोपरी आणि वागळे पाठोपाठ दिव्यात वाढीव पाणी पुरवठा सुरु

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट भागाला २० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून त्यापाठोपाठ आता गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या दिवेकरांना साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्यात आले आहे. यामुळे दिव्यातील पाणी टंचाईची समस्या सुटेल, असा दावा पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. संपुर्ण शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश दिले. यामुळे ठाणे शहराला एकूण १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळणार आहे.

Jul 26, 2022  |  05:26 PM (IST)
नागपूर - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान एका वाहनाची केली जाळपोळ

नागपूर - सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून राज्यभर काँग्रेसचे आंदोलन असतांना नागपुरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला गालबोट लावले. आंदोलनादरम्यान एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नागपूरच्या जीपीओ चौकात सुरू होते त्यावेळी ही घटना घडली.

Jul 26, 2022  |  05:05 PM (IST)
THANE | गणोशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणार महापालिका आयुक्तांचा दावा

महाराष्ट्राताील सर्वात मोठा समजला जाणारा गणोशोत्सव सण हा आता अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यंदा उत्सवावरील र्निबध हटविण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा गणरायाचे आगमन हे खड्डेमुक्त रस्त्यांवरुन होईल असा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केला आहे. तसेच इतर सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी महापालिका मुख्यालयात सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे, पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यंदाचा गणोशोत्सव देखील पर्यावरणपूरक साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवडय़ात काही निर्देश दिले होते. त्यानुसार आता विनाशुल्क मंडळांना परवानगी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंडळांनी काही सूचना दिल्या. त्यावर संबधींत यंत्रणांनी चर्चा करुन योग्य ती उत्तरे दिली आहेत. तर हा गणोशोत्सव शांततेत साजरा करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. विसजर्न रस्ता, रस्त्यांवरील खड्डे बुजविणो, ओव्हरहेड वायरकडे लक्ष देणो, गणोश विसजर्न मार्गावर कुठे झाडाच्या फांद्या आड येत असतील अशा ठिकाणच्या फांद्या कटींग करणो आदी कामे केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर न्यायालयाच्या निर्णयानुसार जे काही नियम असतील त्याचे पालन गणोशोत्सव मंडळांनी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यंदा देखील एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु मंडप परवानगी व इतर परवानग्या वेळेत मिळाव्यात अशी मागणी यावेळी गणोशोत्सव मंडळांच्या वतीने करण्यात आली. आरतीसाठीच्या वेळा वाढवून देण्यात याव्यात, रस्ते खड्डे मुक्त असावेत, विसजर्न रात्री उशिरार्पयत सुरु असेत. परंतु काही वेळेनंतर पालिका किंवा इतर मनुष्यबळ त्याठिकाणी उपलब्ध नसते, ते उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Jul 26, 2022  |  03:17 PM (IST)
कृष्णा नदीत सातत्यानं होणाऱ्या माशांच्या मृत्यू प्रकरणी हरित लवादात याचिका

सांगली : कृष्णा नदीत सातत्यानं होणाऱ्या माशांच्या मृत्यू प्रकरणी हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य शासनासह विविध विभागांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. लाखो संख्येनं मासे मरण्यास कारणीभूत हे साखर कारखान्यांनी सोडलेले मळीमिश्रित घातक रसायनंच ठरत आहेत. दरवर्षी हा प्रकार घडतो. मात्र, त्याकडे फारसे यंत्रणा गांभीर्यानं पाहत नाही. नदीत मृत्यूमुखी पडलेले हेच मासे लोक नेऊन खातात आणि विकतात देखील. यातून विषबाधा होण्याच्या घटना घडू शकतात. तरी देखील सर्व शासकीय यंत्रणा कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाकडे आणि लाखोंच्या संख्येनं मरणाऱ्या माशांच्या घटनेकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहेत. यंदा मात्र या सर्व घातक खेळ करणाऱ्यां विरोधात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी राज्य शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदलाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रदुषण नियंत्रण मंडळाची सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील जबाबदार अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे कृष्णा नदीतील मासे वारंवार मृत होण्याच्या घटना होत आहेत, त्यामुळे नदी मधील माशांच्या जाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेळीच याबाबत ठोस उपाययोजना झाल्या नाही तर काही मासे नावापुरतेच शिल्लक राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

Jul 26, 2022  |  01:50 PM (IST)
भंडारदरा धरण 90 % भरले; पाण्याचा विसर्ग प्रवारा नदीपात्रात सुरु

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. धो धो पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. धरणाच्या पातळीत वाढ होत असुन आज धरण 90 % भरले आहे. भंडारदरा धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी भंडारदरा जलाशयातून 3500 क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्राव्दारे निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील भंडरदरा धरणे हे 11 टीएमसीचे धरण असुन परिसरात जोरदार वारे वाहत असल्याने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. घाटघर,रतनवाडी, वाकी या लाभधारक परिसरातही अधुनमधुन पाऊस हजेरी लावत आहे. भंडारदरा धरणातुन सोडलेल पाणी ही प्रवरानदीपात्रा द्वारे निळवंडे धरणात जात असते आणि निळवंडे धरण ही 82.44 टक्के भरले आहे. यातुनही प्रवारा नदिमार्गे हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपवलेले आहे. त्यामुळे यंदा भंडारदरा धरण हे दरवर्षी प्रमाने १५ ऑगस्टला न भरता अगोदरच जुलै महिन्याच्या शेवटी भरण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रवरा नदीपात्राच्या आसपासच्या गावांनी काळजी घ्यावी असे आव्हान जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

Jul 26, 2022  |  01:48 PM (IST)
राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
कॉंग्रेसचं आंदोलन संसद ते राष्ट्रपती भवनावर राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या खासदारांचं आंदोलन कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं संसदेत आणि रस्त्यावर देखील आम्हाला बोलू दिलं जात नाही, राहुल गांधी यांचा आरोप - कालच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॉंग्रेसच्या ४ खासदारांना संसदेच्या पावसाळी अधिवेशन होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे
Jul 26, 2022  |  11:12 AM (IST)
Mumbai Local Derailment at CSTM : सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. 

Jul 26, 2022  |  11:08 AM (IST)
बुलडाणा : विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले - रविकांत तुपकर
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, सरकारकडून पंचनामे नाही मदत नाही, शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा असतांना सर्व सत्तेच्या नादात मग्न आहेत. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
Jul 26, 2022  |  11:03 AM (IST)
AMRAVATI : खड्ड्या विरोधात काँग्रेस आक्रमक; खड्डया समोर केलं भजन व डफली बजाव आंदोलन
अमरावती शहरात ठीक-ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहन त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे अमरावतीत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे, अमरावतीच्या काली माता मंदिर ते गडगेश्वर रोडवर काँग्रेसच्या वतीने खड्ड्यासमोर डफली बजाव आंदोलन करत भजनही केलं. त्यामुळे तातडीने रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसने केली.
Jul 26, 2022  |  09:17 AM (IST)
Weather Update: 'या' राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता, IMD ने जारी केला Alert

मुसळधार पावसामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान विभागानं ट्विट करून माहिती दिली आहे. IMDनं ट्वीटमध्ये लिहिलं की,  25 ते 29 जुलै दरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात मुसळधार पावसासह हलका पाऊस पडू शकतो.  

Jul 26, 2022  |  08:57 AM (IST)
न्यूड फोटोशूटमुळे दुखावल्या महिलांच्या भावना; रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

बॉलिवूडचा  स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंग  सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे चर्चेत आला आहे. रणवीरने 'पेपर' या मासिकासाठी केलेलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. परंतु अभिनेता रणवीर सिंग याला न्यूड फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. रणवीरविरुद्ध एका सेवाभावी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jul 26, 2022  |  08:56 AM (IST)
राज्यसभेचं सीट शंभर कोटीला विकणारे गजाआड, चौघा आरोपीपैकी एकजण महाराष्ट्रातला

राज्यसभा सीट (Rajya Sabha Seat)  आणि राज्यपालाच्या (Governor) पदासाठी कोट्यवधी रुपयांची डील करणारे चौघेजण गजाआड झाले आहेत. राज्यसभा सीट आणि राज्यपालाच्या पदासाठी काही भामट्यांनी थेट बोली सुरू केल्याचं निदर्शनात आल्यानंतर यंत्रणा जागी होत या भामट्यांना अटक केली आहे. सीबीआयने (CBI) 100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट तसंच राज्यपाल करण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना अटक केली असून यातील एक आरोपी महाराष्ट्रातील आहे.

Jul 26, 2022  |  08:56 AM (IST)
Mumbai Murder : चक्क पेव्हर ब्लॉकने ठेचलं! गिटारीस्ट तरुणाची बेस्ट बस डेपोत हत्या, अंधेरीत खळबळ

एका 25 वर्षांच्या तरुणाची मुंबईत हत्या करण्यात आली. अंधेरीत घडलेल्या या हत्येनं खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. अंधेरी पश्चिमेच्या सात बंगला येथील बस डेपोमध्ये हे थरारक हत्याकांड घडलं. 

Jul 26, 2022  |  08:55 AM (IST)
Sonia Gandhi ED Enquiry : ईडीच्या चौकशीचा फेरा; नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी केली जाणार आहे. काँग्रेस देशभर निदर्शनं करणार असून मुंबईत मंत्रालयाच्या गांधी पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलं गेलं आहे.