LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 26 October 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 26 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 26 October 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Oct 26, 2022  |  03:41 PM (IST)
मध्य प्रदेशमध्ये इंधनाच्या ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये इंधनाच्या ट्रकलचा भीषण अपघात झाला आहे, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. 

Oct 26, 2022  |  03:38 PM (IST)
मुंबईच्या आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, बिबट्याला पकडण्यात यश

मुंबईच्या आरे  कॉलनीत बिबट्याने एका दीड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. 
 

Oct 26, 2022  |  03:19 PM (IST)
2010चा चॅम्पियन इंग्लंडचा आयर्लंडकडून पराभव

2010 च्या चॅम्पियन इंग्लंड संघाला आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. 12व्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार त्याचा 5 धावांनी पराभव केला. पाऊस आला तेव्हा इंग्लंडने 14.3 षटकांत 105 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. 

Oct 26, 2022  |  01:19 PM (IST)
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत राज ठाकरेंनी साजरी केली दिवाळी

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी त्या लहान मुलांना खाऊ वाटप करुन, त्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

Oct 26, 2022  |  08:14 AM (IST)
बांगलादेशात सितरंग चक्रीवादळामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू

 बांगलादेशात सितरंग चक्रीवादळामुळे किमान 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टी आणि मध्य भागात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. राजधानी ढाका येथील हवामान विभागाने सोमवारी संध्याकाळी 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची नोंद केली होती. 

Oct 26, 2022  |  07:02 AM (IST)
जळगाव : फटाके फोडण्यावरून आदल्या दिवशी वाद; दुसऱ्या दिवशी तरुणाचा खून

 जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवार २५ ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. संजयसिंग प्रदीपसिंग टाक ,असे मृत तरुणाचे नाव आहे.
 

Oct 26, 2022  |  06:05 AM (IST)
 गुगलला 936 कोटींचा दंड, एकाच महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई

सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचा मनमानी कारभार रोखण्यासाठी  कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने  पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. 

Oct 26, 2022  |  06:04 AM (IST)
 भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याच्या सूचना, रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत? 

कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. मागील 10 दिवसात कीव्हमधील भारतीय दूतावासाकडून तिसरी ॲडव्हायजरी जारी करून नागरिकांना हे आवाहन केले आहे. मोठ्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. 

Oct 26, 2022  |  06:04 AM (IST)
कार्यभार हाती येताच ऋषी सुनक यांनी जुन्या मंत्र्यांना घरी पाठवलं, तात्काळ राजीनामे देण्याचे आदेश

लिझ ट्रस यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटनच्या किंग चार्ल्स यांची भेट घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी हे पाऊल उचललं आहे.

Oct 26, 2022  |  06:01 AM (IST)
मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांसोबत 'वर्षा'वर दिवाळी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूही दिल्या. 

Oct 26, 2022  |  05:58 AM (IST)
 शारीरिक शिक्षण संचालकांसह 302 ग्रंथपालांची भरती रखडली

 अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया ही विविध कारणांनी रेंगाळली आहे. या पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी यासाठी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुणे विद्यापीठात नुकतीच महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

Oct 26, 2022  |  05:58 AM (IST)
 साताऱ्यात आणखी 10 अवैध फटाके विकणाऱ्यांचा माल जप्त; गुन्हे दाखल

 सातारा व आसपासच्या परिसरात कुठलाही परवाना न घेत नागरी वसाहतीमध्ये बिनधास्त फटाके विक्री करणाऱ्या आणखी दहा विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकट्या साताऱ्यात 13 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.