LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 27 August 2022 Latest Update: उमेश लळीत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 27 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 27 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Aug 27, 2022  |  06:58 PM (IST)
 एपीएमसी घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक झाली कमी, भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

मागील काही दिवस ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे  भाज्यांचे पीक जागीच खराब झाले होते. यामुळे एपीएमसी खाऊक भाजीपाला मार्केट मध्ये भाज्यांची आवक कमी झालेय. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. ऐन गणेशोत्सवात आवक कमी होत असल्याने भाज्या आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. आवक वाढण्यासाठी अद्याप महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्याने आणखी महिनाभर सामान्य नागरिकांचा बजेट बिघडणार आहे.

Aug 27, 2022  |  06:24 PM (IST)
महिनाभरात परबांचे रिसॉर्ट पडले असेल, दापोलीत सोमय्यांचा दावा

शिंदे फडणवीस सरकार भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करत आहेत तर आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र करत आहेत, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी दापोलीत कॉर्नर सभेत बोलताना केला. आता अनिल परबांना कळेल कायदा सगळ्यांना सारखाच असतो. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वाचवायला येणार नाही. आज हातोडा पडणार अशी गर्जना त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने यासाठी मला टाईम टेबल दिले आहे. यासाठी खर्च करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. पर्यावरण उल्लंघन दंड वसुल करण्यात येईल, यामुळे आता हा हातोडा मी मुरूड ग्रामपंचायतीकडे सुपुर्द करतो, असे त्यांनी सांगितले. रिसॉर्ट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महिनाभरात एजन्सी ठरली असेल व रिसॉर्ट पडले असेल, अशी ग्वाही किरीट सोमय्या यांनी दिली.   

Aug 27, 2022  |  05:58 PM (IST)
10 वर्षाच्या बालकावर कुत्र्यांचा हल्ला

बुलढाणा : उघड्यावर शौचास बसलेल्या 10 वर्षाच्या चिमुरड्यावर रस्त्यावरील कुत्र्यांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुलडाणा शहरातील इंदिरा नगर भागातील आहे.

Aug 27, 2022  |  04:36 PM (IST)
राज्यपाल भगतसिंह केशारी यांच्या हस्ते विजयालक्ष्मी विशवनाथ दळवी मॉडेल कॉलेजचा उदघाट्न सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तळेरे येथे विजयालक्ष्मी विशवनाथ दळवी महाविद्यालयच्या मॉडेल कॉलेजचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री आणि मराठा भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आदी उपस्थित होते.

Aug 27, 2022  |  02:37 PM (IST)
मुंबई : सणांच्या मुहूर्तावर कंत्राटी बेस्ट कामगार संकटात

सणांच्या मुहूर्तावर कंत्राटी बेस्ट कामगार हताश झालेला दिसत आहे. बेस्टचे कंत्राटी कामगार यांच्या डिसेंबर २०२१ पासून समस्या सुरु झाल्या आहेत. वेतन संदर्भात काही शास्वती दिली जात नाही. कधी ५ हजार कधी ६ हजार असे वेतन देण्यात येत आहे. कोणताच बेस्ट चा अधिकारी यामध्ये बोलत नाही आणि आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तर कोणी फोन उचलत नाही. सन तोंडावर आले असताना घरी जाताना काय घेऊन जाऊ असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूण पगार एकोणीस हजार एकशे चौवेचाळीस असा सांगितलं आहे. डिसेंबर पासून सॅल्लरी स्लीप दिली नाही. अशा व्यथा बेस्टच्या कंत्राटी कामगार यांनी माडल्या. 

Aug 27, 2022  |  01:10 PM (IST)
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, एक जण ठार; एक जखमी

आज सकाळी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला. आयशर टेम्पोने कंटेरनला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला.

Aug 27, 2022  |  01:07 PM (IST)
दिल्लीत भाजप कार्यालयाबाहेर आपचे आंदोलन
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआय धाड टाकल्याप्रकरणी आम आदमी पक्षाने भाजपच्या विरोधात कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.
Aug 27, 2022  |  01:03 PM (IST)
रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराने शेतकऱ्यांच्या खरिपाचे पीक पाण्यात

बीड :  रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा नाहक त्रास बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. रेल्वे प्रशासनाने भरावाच्या कडीने नाली काढणं अपेक्षित होतं. मात्र हे काम जैसे थेच आहे. आता पावसाळ्यात या ठिकाणचे सर्व पाणी गावात शिरत आहे. परिणामी मागील महिनाभरापासून खरिपाची पिकं पाण्यात आहे. यामध्ये उडीद, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय. चिंचाळा गावातील 200 एकर जमिनीचे रेल्वेकडून भूसंपादन करण्यात आलं. आता उर्वरित जमिनीवर शेती केली जातेय. मात्र रेल्वेच अर्धवट काम झाल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. रेल्वे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन सदरील प्रश्न मार्गी लावावा. त्याबरोबरच शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत द्यावी. अशी मागणी स्थानिक शेतकरी करीत आहेत.

Aug 27, 2022  |  12:06 PM (IST)
भुस्खलन झाल्याने घर 60 ते 80 फुट गेले खड्यात, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी
वेकोलिच्या खाणी लगत असलेल्या घुग्गुस येथील अमराई वार्डात भूस्खलन झाल्याने गजानण मडावी यांचे घर चक्क 60 ते 80 फुट आत गेल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्य़ांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्य़ांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मडावी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्यात गेले आहे. पाहणी दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी जवळपासचा परिसर रिकामा करण्याचे निर्देश प्रशासनाला केले आहे. सदर नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.
Aug 27, 2022  |  11:20 AM (IST)
उमेश लळीत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
उमेश लळीत यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
Aug 27, 2022  |  10:56 AM (IST)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. बोरघाटात वाहनांची लांबच्या लांब रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याच चित्र आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळतेय.

Aug 27, 2022  |  10:33 AM (IST)
महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Aug 27, 2022  |  10:02 AM (IST)
बुलढाण्यात पोळा सणाच्या दिवशी दोन गटांत वाद, एकमेकांवर दगडफेक
राज्यात सर्वत्र पोळा सण साजरा होत आहे. परंतु बुलढाण्यात या सणाला गालबोट लागली आहे. खामगावमध्ये शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोर पोळा भरलेला असताना दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी वेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि या भागात तगडा बंदोबस्त लावला आहे.
Aug 27, 2022  |  09:23 AM (IST)
पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक नाही

येत्या रविवारी (28 ऑगस्ट) पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी, वांद्रे हार्बर आणि ठाणे-वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बरवर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. 

Aug 27, 2022  |  08:25 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून गुजरात दौरा, दोन दिवसांच्या दौऱ्यात करणार अनेक योजनांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या योजनांच्या घोषणा तसेच महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.  दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी आज अहमदाबादमध्ये साबरमती नदीवरील पादचाऱ्यांसाठी असलेल्या अटल पुलाचे उद्घाटन करतील.

Aug 27, 2022  |  08:02 AM (IST)
Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी युपीएची बैठक
Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी युपीएची बैठक
Aug 27, 2022  |  07:26 AM (IST)
सरसंघचालक मोहन भागवत त्रिपुरा दौऱ्य़ावर
सरसंघचालक मोहन भागवत त्रिपुरा दौऱ्य़ावर
Aug 27, 2022  |  06:32 AM (IST)
येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवल्या इको फ्रेंडली गणेश मुर्ती
येरवडा कारागृहातील १० कैद्यांनी २५० इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनवल्या आहेत. त्यांन यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते.
Aug 27, 2022  |  06:28 AM (IST)
दिल्लीच्या कमरुद्दीन भागात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही.
दिल्लीच्या कमरुद्दीन भागात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही.