LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 27 July 2022 Latest Update : सर्वोच्च न्यायालयाचा विरोधकांना मोठा झटका, अटक करण्याचा आणि समन्स देण्याचा ईडीला अधिकार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 27 July 2022 Latest Update :  दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 27 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 27, 2022  |  05:56 PM (IST)
राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स.

महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजना (Revamped Distribution Sector Scheme Reforms-Based and Results-Linked) 
 (उर्जा विभाग)
 
अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना  वीज दरात सवलत देणार. 
(उर्जा विभाग)

दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती 
 (विधि व न्याय विभाग)
 
विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार
 (विधि व न्याय विभाग)

लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता. (वन विभाग)

१५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढलेल्या ५० अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा

राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर ३ नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार
 (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. 
(जलसंपदा विभाग)

जळगांव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास २ हजार २८८.३१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
 (जलसंपदा विभाग)

ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्प १ हजार ४९१.९५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.
 (जलसंपदा विभाग)
 
हिंगोली जिल्ह्यात 
'मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र'
 (कृषि विभाग)

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ 
 (सहकार विभाग)
ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्याबाबत विविध सवलती
(ग्राम विकास विभाग)

राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही 
(गृह विभाग )

Jul 27, 2022  |  04:02 PM (IST)
बुलडाणा - प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत 28 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांचे अनुदान वाटप

बुलडाणा :  कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी, गर्भवती महिलांसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो,या योजनेसाठी जिल्ह्यातील 70 हजार 282 गर्भवती महिलांनी नोंदणी केली आहे.

गर्भवती मातांसह मुलांचे आरोग्य सुधारावे, या उदात्त हेतूने केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबवण्यात येत आहे, या योजनेचा जिल्ह्यातील गर्भवती महिलांना मोठा आधार मिळत असल्याचे चित्र आहे, या योजनेची अंमलबजावणी 2017 पासून सुरू झाली आहे.

 जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत 28 कोटी 30 लाख 49 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत 72 हजार 312 गर्भवती महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 70 हजार 282 महिलांनी नोंदणी केली आहे. चालू वर्षांमध्ये 48 लाख 24 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.  

या योजनेचा लाभ शासकीय किंवा खासगी रुग्णालयातही प्रसूती केल्यास मिळतो. जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांनी केले आहे. 

Jul 27, 2022  |  04:02 PM (IST)
PUNE | पुण्यात उद्धव ठाकरेंच्या दीर्घआयुष्यासाठी शिवसेनेची आरती
Jul 27, 2022  |  01:43 PM (IST)
नाशिक : येवल्यातील जुनी माळी गल्लीतील महिलांची पाण्यासाठी वणवण

नाशिक - येवला शहरातील जुनी नगरपालिका लगत असलेल्या जुन्या माळी गल्लीतील महिलांना गेल्या आठ दिवसापासून नळाला पाणी न आल्याने अक्षरशः हातपंपाचे पाणी या महिलांना आणण्याची वेळ येत असल्याने येथील रहिवासी महिलांची पाण्याकरता वणवण करण्याची वेळ आली असून वारंवार नगरपालिका सांगून देखील नगरपालिकेने दखल घेतली नसल्याची संतप्त भावना या महिलांनी व्यक्त केली आहे. शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा चालू असून या जुनी माळी गल्लीमध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी न आल्याने येथील महिला संतप्त झाल्या असून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

Jul 27, 2022  |  01:00 PM (IST)
MUMBAI | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Jul 27, 2022  |  12:17 PM (IST)
अमरावती हत्याकांडातील आरोपी शाहरुख पठाणवर मुंबई कारागृहात हल्ला

अमरावती हत्याकांडातील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे. या खून प्रकरणातील आरोपी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. पाच कैद्यांनी शाहरुखवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आरोपी कैद्यांना वेगवेगळ्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले आहे.
 

Jul 27, 2022  |  12:09 PM (IST)
AHMEDNAGAR | खरवंडी कासार ग्रामपंचायत समोर महिलांचे ठिय्या आंदोलन
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी महसुलीची ग्रामपंचायत असलेल्या खरवंडी कासार ग्रामपंचायतचा कार्यकाळ अडीच वर्षे उलटून गेला तरी जैसे थे परिस्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरवंडी कासार गावातील प्राथमिक सोयी सुविधा आरोग्य,शिक्षण,आणि रस्ते यावर एक रुपया निधी खर्च केला गेला नाही. एवढेच नाही तर खरवंडी कासार गावातील गावअंतर्गत रस्ते पानंद रस्ते जागोजागी उखडुन ठेवले असून या रस्त्यांची दुरवस्था करून ठेवली आहे.दहा हजार लोक वस्ती व लोकसंख्या असलेल्या खरवंडी कासार ग्रामपंचायत अंतर्गत भूमिगत गटारीचे काम झाले नसल्याने प्रत्येक गल्लोगल्लीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नाल्यांमधून दुर्गंधी पसरली आहे. परंतु खरवंडी कासार ग्रामपंचायत सरपंचाचे कमालीचे दुर्लक्ष गावच्या विकासाकडे झाल्याने खरवंडी कासार गावातील महिलांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले आहे.
Jul 27, 2022  |  11:30 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयाचा विरोधकांना मोठा झटका, अटक करण्याचा आणि समन्स देण्याचा ईडीला अधिकार

सर्वोच्च न्यायालयाकडून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. बुधवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, ईडीला अटक करण्याचा आणि समन्स बजावण्याचा अधिकार पूर्णपणे योग्य आहे. यासोबतच पीएमएलए कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिकाही फेटाळण्यात आली आहे.

Jul 27, 2022  |  10:27 AM (IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 62वा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी
Jul 27, 2022  |  09:32 AM (IST)
Gadchiroli : आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदीत मोठा गैरव्यवहार, दोघांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान्य खरेदीत गैरव्यवहार आढळून आल्याने मोठी खळबळ उडालीयं. आता याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेयं. धान्य खरेदीवर आदिवासी विकास महामंडळाकडून आलेल्या पैशात मोठी अफरातफर आढळून आली होती. एटापल्ली व उडेरा दोन सोसायटी मार्फत संतोष पुल्लुवार व देवानंद हिचामी हे दोन सचिव असून या सचिवांनी खरेदी प्रकरणात मोठा गैरव्यवहार केला आहे. 
 

Jul 27, 2022  |  09:21 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

Jul 27, 2022  |  09:09 AM (IST)
औरंगाबाद : पूल वाहून गेल्याने सहा गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद जिल्ह्यातील कसाब खेडा या गावाला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे तब्बल सहा गावांचा संपर्क तुटला आहे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या संततदार पावसामुळे हा पूल वाहून गेला आहे. नागरिकांनी अनेक वेळेला हा रस्ता बनवण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी कमकुवत झालेला पूल वाहून गेला आहे. परिणामी सहा गावातील शेकडो लोकांचा संपर्क तुटला आहे.

Jul 27, 2022  |  09:09 AM (IST)
शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात धक्का; माजी आमदार काशिनाथ मेंगाळ शिंदे गटात सामील

 शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात धक्का; माजी आमदार काशिनाथ मेंगाळ शिंदे गटात सामील

Jul 27, 2022  |  09:08 AM (IST)
राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी येत्या काळात आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बुधवारसाठी पुण्यासह राज्यातील 18 जिल्ह्यांना IMD कडून इशारा देण्यात आलाय. 
 

Jul 27, 2022  |  09:08 AM (IST)
BJP Yuva Morcha worker Killed: भाजप नेत्याची हत्या; दुकान बंद करताना तलवार, कुऱ्हाडीनं वार

एका भाजप नेत्याची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. प्रवीण नेत्तरू असं मृत भाजप नेत्याचं  नाव आहे. नेत्तरू हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. 

Jul 27, 2022  |  09:07 AM (IST)
अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला विरोधी पक्षनेते हे नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. आपल्या या दौऱ्यात अजित पवार स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत.