LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 27 October 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 27 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Oct 27, 2022  |  11:26 PM (IST)
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Oct 27, 2022  |  08:56 PM (IST)
ठाण्यातील मुंब्रा येथील खान कंपाउंडमधील एका गोदामाला आग
ठाण्यातील मुंब्रा येथील खान कंपाउंड मध्ये आज संध्याकाळच्या सुमारास एका गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आज विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही आग लागण्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून गोदाम जाळून मोठे नुकसान झाले आहे. सध्या आग विजवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Oct 27, 2022  |  07:14 PM (IST)
कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता

महागाई दर नियंत्रणात येत नसल्याने आरबीआयवरील दबाव वाढला
3 नोव्हेंबरला आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक
जानेवारीपासून महागाई दर सातत्याने 6 टक्क्यांच्यावर
पुन्हा एकदा बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा होऊ शकतो निर्णय
कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता

Oct 27, 2022  |  07:04 PM (IST)
आ.रवी राणा आणि आ.बच्चू कडू यांच्यातला वाद हा गैरसमजामुळे- चंद्रशेखर बावनकुळे

आ.रवी राणा आणि आ. बच्चू कडू यांना एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. रवी राणा आणि बच्चू कडू हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. दोघेही आपापल्या मतदार संघात प्रभावी आहेत. गैरसमजामुळे हा वाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे दोघांचे ही गैरसमज दूर करतील. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

Oct 27, 2022  |  06:42 PM (IST)
श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर आजपासून येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येणार

नाशिक - वणी येथील श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर आजपासून येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्यात येणार

Oct 27, 2022  |  05:07 PM (IST)
नागपूर : महापालिकेत प्रशासक बसल्याने विकासकामांच्या गतीला ब्रेक 

मागील फरवरी महिन्यात महापालिका निवडणूक होणार होती परंतू OBC राजकिय आरक्षण मुळे ह्या निवडणूक घेत्या आल्या नाही तेव्हा पासुन महापालिकेत प्रशासक बसविण्यात आले आहे.त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले त्यामुळे पण महापालिका निवडणूक समोर धकल्यानंत आल्या. तेव्हा पासून अनेक महापालिका निवडणुकीची वाट बघत आहे.नागपुर महापालिका मध्ये प्रशासक बसल्यानंतर विकास कामे ठप्प झाले आहे अशे आरोप सत्तापक्ष व विरोधक करीत आहे.नागपूर महापालिका मध्ये माघील 15 वर्षा पासून भाजप सत्ते मध्ये आहे.भाजपचे माजी नगरसेवक म्हणत आहे की प्रभागाचे अनेक कामे आहे ज्यांचा कडे महापालिका कर्मचारी लक्ष देत नाही त्यामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे.

नागपूर महापालिका निवडणूक सबोतच अनेक महापालिकाच्या निवडणुका लांबलीवर गेल्या आहेत.माघे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की दोन आढावाट निवडणूकघ्या परंतु ED सरकारला भीती वाटत आहे की निवडणूक घेतल्या तर पराभवचा सामना करावा लागेल अशी टीका विरोधक करत आहे. नागपुरातील जनतेला सध्याच्या परिस्थिती मध्ये महापालिका मधून होणारे अनेक कामांसाठी फिरावं लागत आहे त्याच कारण आहे की पाहिले लोक महापालिकेचा प्रत्येक कामांसाठी नगरसेवक कळे जात होते आणि नगरसेवक त्या कामासाठी महापालीकेतून फंड आणून त्याकामान वेडेवर पूर्ण करायचे परन्तु आता चित्र असा आहे की सर्व नगरसेवक माजी झाले आहे म्हणून आता महापालिकेत प्रशासक बसल्याने कामाची गती हळू झाली आहे.

Oct 27, 2022  |  04:39 PM (IST)
आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा

आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा
सपाचे आमदार आझम खान दोषी
चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी दोषी
लोकसभा निवडणुकीवेळी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
रामपूर कोर्टाचा निर्णय

Oct 27, 2022  |  04:31 PM (IST)
SOLAPUR | हॉटेलमध्ये वडे तळत असताना तरुणाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरातील एका सुप्रसिद्ध वडापाव सेंटरमध्ये वडे तळत असताना अचानक 28 वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. माढा शहरातील या वडापाव सेंटरवर 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी प्रकाश नानुराम कुमार हा तरुण वडे तळत असताना अचानक खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सध्या वाढत्या ताण-तणावामुळे अनेक तरुणांना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. मात्र, माढ्यात एका तरुणाच्या मृत्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने तरुणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे या उदाहरणावरून दिसून येत आहे. एका प्रकारे तरुणाईला या दुर्दैवी तरुणाच्या मृत्यूने आरोग्याबाबत काहीतरी धडा घेणे किती महत्वाचे आहे हे समजेल.

Oct 27, 2022  |  03:55 PM (IST)
बीड - तुकाराम मुंढे यांची बीडच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यात असलेल्या आपल्या गावी दिवाळीनिमित्त आले होते. त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेटी दिल्या. यावेळेस वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूसही केली.

Oct 27, 2022  |  02:07 PM (IST)
भेदभाव संपला, महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार : BCCI
Oct 27, 2022  |  08:49 AM (IST)
बँकांचा नोव्हेंबर महिन्यात लाक्षणिक संप
Oct 27, 2022  |  07:22 AM (IST)
मुंबईतील गिरगाव भागात आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील गिरगाव भागात बुधवारी रात्री भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

Oct 27, 2022  |  07:55 AM (IST)
डाबर कंपनी मसाला बाजारात प्रवेश करणार, 'बादशहा'चे 51 टक्के शेअर खरेदी करणार
Oct 27, 2022  |  06:46 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार 29 ऑक्टोबर 2022 पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार 29 ऑक्टोबर 2022 पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, काही भागांमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा संयुक्त दौरा तर काही भागांमध्ये स्वतंत्र दौरे

Oct 27, 2022  |  06:40 AM (IST)
रशियाने आण्विक युद्धाची केली मोठी लष्करी कवायत, पुतिन यांनी केली पाहणी

रशियाने आण्विक युद्धाची केली मोठी लष्करी कवायत, पुतिन यांनी केली पाहणी

Oct 27, 2022  |  06:37 AM (IST)
मध्य प्रदेश : भोपाळमध्ये पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन गॅसची गळती, जीवितहानी नाही

मध्य प्रदेश : भोपाळमध्ये पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन गॅसची गळती, जीवितहानी नाही

Oct 27, 2022  |  06:34 AM (IST)
ट्विटरची मालकी अॅलन मस्कच्या हाती जाणार, करार अंतिम टप्प्यात

ट्विटरची मालकी अॅलन मस्कच्या हाती जाणार, करार अंतिम टप्प्यात

Oct 27, 2022  |  06:32 AM (IST)
मुंबईत गिरगावमध्ये फटाक्यांमुळे लागलेली आग फायर ब्रिगेडच्या 5 गाड्यांनी विझवली, जीवितहानी नाही

मुंबईत गिरगावमध्ये फटाक्यांमुळे लागलेली आग फायर ब्रिगेडच्या 5 गाड्यांनी विझवली, जीवितहानी नाही

Oct 27, 2022  |  06:28 AM (IST)
रशियाने इराणचे 400 ड्रोन वापरून युक्रेनवर हल्ला केला, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली माहिती

रशियाने इराणचे 400 ड्रोन वापरून युक्रेनवर हल्ला केला, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली माहिती

Oct 27, 2022  |  10:49 AM (IST)
बिहारमध्ये गया-कोडरमा रेल्वे मार्गावर अपघात, गुरपा स्टेशन जवळ मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले