LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 28 July 2022 Latest Update : NAGPUR | आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जवाबदार आहे - विजय वडेट्टीवार

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

 Breaking News 28 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 28 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 28, 2022  |  08:44 PM (IST)
सत्तांतर कधीही होऊ शकते, मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल - सुधीर मुनगंटीवार 

संजय राऊत सत्तांतर होईल, असे म्हणत आहेत  त्यात तथ्य आहे. सत्तांतर कधीही होऊ शकते. मात्र हे सत्तांतर त्यांच्या नव्हे तर आमच्या बाजूने होईल, असे प्रत्युत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. आघाडी सरकार लवकर जाईल, असे जेव्हा आम्ही सांगत होतो, तेव्हा हेच संजय राऊत म्हणायचे की, भाजपवाले जोतिषी आहेत काय, कुंडल्या घेऊन बसतात काय? मग आता राऊत जोतिषी झाले काय, असा प्रतिप्रश्न करीत मुनगंटीवार म्हणाले, शिवसेना आता दोन तृतीयांश संपलेली आहे आणि उर्वरित लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी राऊत असे वक्तव्य करीत आहेत.विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात केलेल्या मदतीच्या मागणीसंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सरकार सर्व मदत करीत आहे. 

Jul 28, 2022  |  08:22 PM (IST)
NAGPUR | आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जवाबदार आहे - विजय वडेट्टीवार 

नागपूर  : राज्यातील विद्यमान शिंदे - भाजप सरकार ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असून सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या मेहनतीचे फलित आहे. उगाच आरक्षण मिळवून दिल्याचा डंका न पिटता ओबीसी आरक्षणाच्या वाटेत नेहमीच अडसर ठरणाऱ्या भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबावदार आहे. 

Jul 28, 2022  |  08:21 PM (IST)
SATARA | सातारा पोलिसांनी सापळा रचून जप्त केल्या दोन पिस्तूल : एक जण ताब्यात 

सातारा शहराच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर रीत्या शास्त्र बाळगून शहरात फिरत असलेल्या एका संशयित आरोपीला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून एक पिस्टन आणि एक गावठी कट्टा अशा दोन प्राणघातक शस्त्र जप्त केले आहेत तर एका संशयिताला अटक करण्यामध्ये देखील सातारा सर पोलिसांना यश आला आहे या बद्दलचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करत आहेत

Jul 28, 2022  |  08:18 PM (IST)
THANE | हजारो दिवे लावून साजरी झाली दीप अमावस्या
Jul 28, 2022  |  06:30 PM (IST)
शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही - अमोल मिटकरी 

शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्यास जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यानी दिला आहे. शिंदे गटाने भाजपाच्या नावाचं कुंकु लावले तर महाराष्ट्रातली जनता त्यांना मतदार संघात पाय ठेवू देणार नाही. आगामी काळात महाभारत होणार असंही मिटकरी म्हणाले.

Jul 28, 2022  |  06:12 PM (IST)
PUNE | ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच - प्रकाश आंबेडकर
Jul 28, 2022  |  05:11 PM (IST)
सातारा पोलिसांनी सापळा रचून जप्त केल्या दोन पिस्तूल, एक जण ताब्यात

सातारा शहराच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर रीत्या शास्त्र बाळगून शहरात फिरत असलेल्या एका संशयित आरोपीला सातारा शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून एक पिस्टन आणि एक गावठी कट्टा अशा दोन प्राणघातक शस्त्र जप्त केले आहेत तर एका संशयिताला अटक करण्यामध्ये देखील सातारा सर पोलिसांना यश आला आहे या बद्दलचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करत आहेत

Jul 28, 2022  |  04:37 PM (IST)
NASHIK | नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षणाची सोडत जाहीर
Jul 28, 2022  |  03:22 PM (IST)
JALGAON | शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन
Jul 28, 2022  |  02:22 PM (IST)
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश 
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
लढाई सुरू असताना सैनिक मिळाले - उद्धव ठाकरे
लोकशाही टिकवणं अतिशय महत्त्वाचं - उद्धव ठाकरे

Jul 28, 2022  |  02:20 PM (IST)
जळगाव : रावेर पंचायतीची  समिती आरक्षण सोडत संपन्न 

जळगाव : रावेर तहसिल कार्यालयात आज पंचायात समिती आरक्षण सोडत विशेष सभा प्रांतअधिकारी कडलग तहसिलदार उषाराणी देवगुणे नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या उपस्थित संपन्न झाली. तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी रावेर पंचायत समितीच्या 14 जागांपैकी 7 जागा या आरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. पाल- सर्वसाधारण, खिरोदा प्र - सर्वसाधारण ( महिला, ) रसलपुर - सर्वसाधारण, के -हाडे ॥ बु ॥ सर्वसाधारण , वाघोड - नामाप्र, खिरवड - नामाप्र महिला , ऐनपुर - अनुसुचित जमाती, निंभोरा ॥बु ॥ - अनुसूचित जमाती महिला, चिनावल - सर्वसाधारण, तांदलवाडी - अनुसूचित जाती महिला, थोरगव्हाण - सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण सोडती द्वारे काढण्यात आले. 

Jul 28, 2022  |  02:10 PM (IST)
अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट
विदर्भ, मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गावांना भेट दिल्यानंतर चंद्रपूर शहरात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. @AjitPawarSpeaks #ncpspeaks @NCPspeaks #AjitPawar
Jul 28, 2022  |  01:40 PM (IST)
औरंगाबाद : शेतकऱ्याने पिकविलेल्या मिरचीची थेट विक्री होत असल्याने शेतकरी आनंदी

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना शेतकऱ्याने पिकविलेल्या मिरचीची देखील थेट जागेवरच विक्री होत असल्यामुळे तालुक्याची आता हिरव्या मिरचीचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. पारंपरिक पद्धतीने उत्पादन होणाऱ्या मिरचीचे आता आधुनिकतेची कास धरून वेगळ्या धाटणीचे प्रयोग शेतकरी करू लागले आहे. यामध्ये मलचींग पेपर सूक्ष्म सिंचनासह आवश्यक असलेल्या खताची पुरेपूर मात्रा देऊन तालुक्यात हजारो हेक्टरवर मिरची उत्पादन घेतले जात असून यातून शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृध्द झाला आहे. जून महिन्यापासून तालुक्यातील गोळेगाव, शिवणा, आमठणा, भराडी, म्हासला फाटा येथे मिरची बाजार भरत असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. हंगामामध्ये तालुक्यातील मिरची दिल्ली, कोलकाता, बंगळूर, मुंबई, नागपूर सह विदेशात विक्री होऊ लागली आहे. मिरची खरेदी साठी देशभरातून व्यापारी येथे येत असून मिरची ची प्रतवारी करून यातून निर्यातक्षम मिरची भारता बाहेर पाठविण्यात येत आहे. परिणामी नगदीचे पीक म्हणून शेतकरी मिरची लागवडीकडे कल वाढल्याने यातून तालुक्यात मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे.

Jul 28, 2022  |  01:19 PM (IST)
मुख्यमंत्री शिंदे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची आज त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Jul 28, 2022  |  09:38 AM (IST)
Arpita Mukharjee ED raid : अर्पिता मुखर्जींच्या घरी पुन्हा ईडीची धाड,20 कोटींची कॅश आणि तीन किलो सोनं जप्त

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकऱणात पुन्हा एकदा अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीकडून धाड टाकण्यात आली. गेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांची कॅश ईडीला मिळाली होती. यावेळी ईडीनं तब्बल तीन किलो सोनं जप्त केलं आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 20 कोटींची कॅशही ईडीला मिळाली आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर ही धाड टाकण्यात आली होती. ही अमाप संपत्ती पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावून गेल्याचं सांगितलं जातंय. 
 

Jul 28, 2022  |  09:36 AM (IST)
Nagpur Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 9 जणांना अटक

एका अल्पवयीन अकरा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकते. यातील एका आरोपीला ती ओळखत होती. एक काम आहे, असे सांगतून या आरोपीने तिला घरी नेले. यावेळी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
 

Jul 28, 2022  |  09:35 AM (IST)
राज्यात १ ऑगस्टला टॅक्सी-ऑटो चालकांचा संप

सरकार भाडेवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मुंबई टॅक्सीमन युनियनने १ ऑगस्ट रोजी टॅक्सी संपाची हाक दिली आहे. पण या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

Jul 28, 2022  |  09:35 AM (IST)
सोलापूरातील सिद्धेश्वर पॉलिटेक्निकल हॉस्टेलमधील 14 विद्यार्थिनींना विषबाधा

सिद्धेश्वर पॉलिटेक्निकल हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. हॉस्टेलच्या मेस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Jul 28, 2022  |  09:34 AM (IST)
मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार

मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिकेत 5 हजार पदांची भरती होणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. कामगार संघटना आणि पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे. पण, नेमक्या किती जागा भरल्या जाणार याचा निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.
 

Jul 28, 2022  |  09:34 AM (IST)
IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजवर 119 धावांनी सर्वात मोठा विजय

भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजसमोर 35 षटकांत 257 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 26 षटकांत 137 धावांत गारद झाला.