LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 28 October 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 28 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  BCCL
Breaking News 28 October 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Oct 28, 2022  |  01:05 PM (IST)
KALYAN | डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकत्र फोटो

डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे साधारण अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा फोटो उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी काढला होता त्यावरूनच ठिणगी पेटली होती  त्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शाखेवर ताबा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले होते मात्र वाढता तणाव पाहत पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यालय दिले होते त्यानंतर हा वाद काही काळासाठी थांबला होता मात्र आज सकाळी हा वाद पुन्हा पेटला असून शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करत शाखेचा करारनामा आपल्या नावावरती असल्याचे सांगत आज या शाखेवरती ताबा घेतला मात्र ताबा घेतल्यानंतर ही उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि खासदार श्रीकांत शिंदे असतील यांचे  फोटो मध्यवर्ती शाखेवर  लावले असल्याचे  दिसून आल्याने राजकीय वर्तुळत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Oct 28, 2022  |  11:47 AM (IST)
कोयना परिसरात भूकंपाचे झटके, सुदैवाने जीवितहानी नाही

आज कोयना परिसरात सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर इतकी होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. 

Oct 28, 2022  |  07:42 AM (IST)
मुंबईत एसी बसला आग

मुंबईत अंधेरीतील लोखंडवाला भागात एसी बसला आग लागली. वेळीच ही आग विझवण्या आली, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. 

Oct 28, 2022  |  07:38 AM (IST)
दिवाळी आणि छट पूजेसाठी  अडीचशे ट्रेन - मध्य रेल्वे

दिवाळी आणि छट पूजेसाठी महाराष्ट्रातून २५६ ट्रेनची सोय करण्यात आली आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांचे दरही वाढवण्यात आल्याचे सुतार यांनी नमूद केले. 

Oct 28, 2022  |  07:35 AM (IST)
कुर्ल्यात गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

कुर्ल्यात एका गोडाऊनला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल्याच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.