Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून मुंबई कडे जाणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे शहराजवळील सरवड फाटा येथे जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 30 लाख 57 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून भिवंडी कडे स्विफ्ट एअर अँड ट्रेकिंग कंपनीच्या ट्रक मधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सरवड फाटा येथे सापळा रचून MP 09 GH 8691 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे 20 लाख 47 हजार दोनशे रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला प्रीमियम राज निवास सुगंधित पानमसाला आढळून आला. संबंधित गाडीसह गुटखा धुळे पथकाने ताब्यात घेतला आहे.
या कारवाईत वाहनाचा चालक बहादूर अंबाराम मावी आणि क्लीनर कमल रमेश डांगी वय 20 या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत दहा लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन तसेच दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा सुमारे 30 लाख 57 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा माल कोणाचा होता? आणि कुठे जात होता? याचा देखील सखोल तपास करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. आता येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात देखील गुटखा माफिया विरोधात कडक कारवाई करणार असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली. या संदर्भात कोणी गुटखा विक्री करत असेल त्याची माहिती पोलीस विभागाला कळवावे असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी केले आहे. आता यापुढे गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत , त्यामुळे धुळे जिल्हा पोलीस प्रशासन येणाऱ्या काळात महाराष्ट्रात असलेल्या गुटखा बंदी विरोधात काय कारवाई करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हॉस्पिटलमध्ये,, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी पुण्याच्या जेलमध्ये असलेले प्रदीप शर्मा पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल
स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या ठाणे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. तर गेल्या सहा वर्षात रस्त्यांवर केला गेलेला 1300 कोटींचा खर्च असो किंवा गेल्या दोन महिन्यांपासून 183 कोटींच्या रखडलेल्या कामामुळे रविवारी कोपरी पूल परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. खड्ड्यामुळे ठाण्यातील अनेकांचा जीव जाऊनही प्रशासन मात्र कुंभकर्णासारखे झोपी गेलेले आहे. ठाणेकरांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रास विरोधात सोमवारी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपाच्या नगर अभियतांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट देऊन अनोखे आंदेालन करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या वतीने ठाण्यातील खराब रस्त्यांबाबत आवाज उठविला जात आहे. वारंवार निवेदन देऊनही ठामपा प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. रविवारी 27 वर्षाच्या तरूणाचा कोपरी येथे झालेल्या अपघातात खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. तेव्हा अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे? असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने ठाणे महापालिकेला केला जात आहे.
एकीकडे स्मार्ट सिटीसाठी पुरस्कार मिळत असताना मात्र दुसरीकडे ठाण्यातील खराब रस्त्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. याचा जाब विचारून महाराष्ट्र सैनिकानी सोमवारी प्रशासनाचा निषेध केला. तसेच नगर अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट देत आंदोलन करण्यात आले.
भाजप विरोधी सर्व पक्षांनी एकत्र यावे, आगामी निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीवर पवार यांचे सूचक वक्तव्य
भाजपविरोधी पक्षांना एकत्र यावे असा माझा आग्रह आहे परंतु त्याचे नेतृत्व माझ्याकडेच असावे असे नाही, मी आता कुठलीही सक्तीची जबाबदारी घेणार नाही - शरद पवार
एखादी एसी लोकल रद्द करून हा प्रश्न मिटणार नाही, यासाठी आम्ही रेल्वेखात्याशी बोलू आणि ही समस्या सोडवू - पवार
भाजप विरोधकांमागे सीबीआय आणि ईडी लावून त्यांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे - शरद पवार
नवाब मलिक भाजपच्या विरोधात बोलत होते त्यांनाही तुरुंगात टाकले, संजय राऊत सामनामध्ये भाजपविरोधात लिहित होते त्यांच्याही मागे ईडी लावण्यात आली - शरद पवार
टीस्टा सेटलवाडवर झालेली कारवाईच बेकायदेशीर आहे - शरद पवार
राज्याचा दौरा ठाण्यापासून सुरू करणार - शरद पवार
लोकांनी जर सत्ता दिली नाही तर लोकांनी ज्यांना सत्ता दिली त्यांच्याकडून भाजप सत्ता बळकावतं.
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भाजपकडून प्रयत्न - शरद पवार
भाजपविरोधी पक्षांसोबत चर्चा करून लोकशाही मार्गाने भाजपशी लढणार - शरद पवार
ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे.
भाजपने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, शरद पवार यांची पत्रकार परिषदेत टीका
भाजपने दिलेल्या आश्वासनांची यादी पवारांनी वाचून दाखवली.
महाराष्ट्र दौऱ्याची आजपासून सुरूवात केली. २०१४ मध्ये भाजपने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. - शरद पवार
भाजपनं सांगितलेली एकही गोष्ट पूर्ण झाली नाही.
राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. परंतु पुढील पाच वर्षे कोर्टाचा निकालच लागणार नाही असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. तसेच धनुष्यबाण हे आपलेच चिन्ह असून पुढच्या वेळीही आपलाच विजय होईल असेही गोगावले म्हणाले.
अंजनेरी गडाच्या रस्त्यावर दरड कोसळण्याने रस्ता बंद, गिर्यारोहकांना वन विभागाने दिला अलर्ट…
मुंबईतील परळ सेंट झेवियर मार्गावर भागात एका पेट्रोल पंपाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठी गर्दी असते, त्यामुळे या भागातील संपूर्ण वाहतूक दुसर्या दिशेला वळवण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
मुंबई परळ भागात पेट्रोल पंपाला आग#mumbai #fire #PetrolPump pic.twitter.com/jd34RFEjwl
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 29, 2022
लासलगाव विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेस समोर एक अपघाताची घटना घडली. दोन मोटरसायकलच्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालायं. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालायं.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मुंबईत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली भेट
गणेशभक्तांना घेऊन मुंबईहून मोदी एक्सप्रेस कोकणसाठी रवाना
Happy to see this... Modi Express.. @NiteshNRane @MeNarayanRane @narendramodi pic.twitter.com/af2KZvJuvL
— Adv. Rakhi Barod ।।ॐ।। (@BarodRakhi) August 29, 2022
मोदी एक्स्प्रेस सज्ज
— nitesh rane (@NiteshNRane) August 29, 2022
गणेशभक्तांचा विनामूल्य कोकण प्रवास@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish pic.twitter.com/t4DK4euKGa
DRDOने केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी
DRDO-developed Enhanced Range Pinaka rockets' user trials conducted at Balasore&Pokhran in past few weeks. In success for Make in India in defence,manufacturers incl Munitions India Ltd&Economic Explosives Ltd met user requirements at trials' completion
— ANI (@ANI) August 29, 2022
(Video:Defence Officials) pic.twitter.com/Pl1U2MOJf0
कॅनडातील एका रस्त्याला दिले संगीतकार ए. आर. रेहमानचे नाव
City of Markham (in Canada) honours music maestro AR Rahman by naming a street after him.
— ANI (@ANI) August 29, 2022
"Honoured and grateful for this recognition from City of Markham and Mayor Frank Scarpitti and the people of Canada," AR Rahman tweets.
(Pic 1 - file pic of AR Rahman) pic.twitter.com/exwGnBZIhB
महाराष्ट्रात ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी विदर्भ, विदर्भाजवळचा मराठवाड्याचा भाग, द. मध्य महाराष्ट्र येथ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात १ आणि २ सप्टेंबर रोजी अशीच स्थिती राहण्याची शक्यता
30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, सलग्न मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम पावसांची शक्यता. IMD GFS मोडेल नुसार.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
1,2 ला पण अशीच स्थिती राहण्याची शक्यता. घाट भागात पण. pic.twitter.com/sQQoMiaSmQ
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होईल. त्यात शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेना नेमकी कुणाची आदी 8 कळीच्या प्रश्नांवर खल होणार आहे.
पुणे महापालिकेकडून पुण्यातील गणेश मंडळासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुका आणि रथाच्या देखाव्याची उंची याबाबत प्रशासनानं सूचना दिल्या आहेत. तर संभाजी पुलावर देखाव्यासह रथाची उंची 18 फूट ठेवण्याचे आवाहन करण्यात पालिकेनं गणेश मंडळांना केलं आहे. तर कर्वे रस्त्याकडून येणाऱ्या रथाची उंची 12 फूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
नाशकातील आर्टिलरी सेंटर परिसरात गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ८०० फूट उंचीवरून ड्राेन उडत असल्याचे दिसल्यानंतर खळबळ उडाली. अतिसंवेदनशील असलेला हा भाग ड्रोनसाठी प्रतिबंधित असल्याने अधिकाऱ्यांनी फायरिंग करून ड्रोन पाडण्याचे आदेश दिले. मात्र, काही मिनिटांतच हे ड्राेन गायब झाले. हेरगिरीच्या संशयावरून आर्टिलरीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास करून शनिवारी उपनगर पाेलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानमध्ये यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. पाकिस्तानमधील 110 जिल्ह्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान सरकारनं राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकांतील सलग दोन लाजीरवाणे पराभव, व गेल्या नऊ वर्षांत असंख्य निवडणुकांतील पराभवांचा सामना करणाऱ्या काँग्रेस पक्षासाठी पूर्ण वेळ अध्यक्षाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीने रविवारी घेतला. त्यामुळे ही निवडणूक पुढे जाण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.