Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी Good News
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 22 हजार 500 रुपये बोनस जाहीर
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत बोनसचा निर्णय
घरपोच खाद्यपदार्थ पोहचविणा-या एका कंपनीच्या डीलेव्हरी बॉयने खाद्यपदार्थ घरपोच केल्यावर रक्कम स्वीकारली. यावेळी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉय ने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची छेड काढली आणि डिलिव्हरी बॉयने पळ काढला. पनवेल मधील कोन गावानजीक असलेल्या इंडीयाबुल्स या इमारतीमध्ये सदर घटना घडली आहे. विनयभंग झालेली तरुणी ही शिक्षण घेत असून तरुणीने तात्काळ घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहम्मद रिजवान शेख असे या डिलिव्हरी बॉय चे नाव असून पोलीस या डिलिव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे
रश्मी ठाकरेंकडून आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनिषा कायंदे, किशोरी पेडणेकर उपस्थित
थोड्याच वेळात रश्मीठाकरे टेंभी नाक्याच्या देवीचं घेणार दर्शन
उरण पनवेल मार्गावर गव्हाण फाटा जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 21 वर्षीय महिला बाईक रायडरचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि कंटेनरचा हा अपघात झाला असून यात तरुण बाईक रायडर सेजल अंबेटकर हिचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर एमजीएम रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते, मात्र रुग्णालयात उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. सेजल अंबेटकर उरण मध्ये आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास असून तीच मुळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसळा मध्ये आहे. या दुर्घटनेत एक तरुण महिला बाईक रायडरचा मृत्यू झाल्याने रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
शिरूर मधील काही माणसं `ढळळी´ पण, खरी `अढळ´ माणस माझ्यासोबत - उद्धव ठाकरे
- 'जिथे शिवनेरी तिथे गद्दार आढळली नाही पाहिजेत'
- माझ्यासोबत जुनी माणस आहेत, त्यात नवी माणसं जोडली जात आहेत .
- या मतदारसंघात शिवनेरी आहे. त्या मतदारसंघात गद्दार माणसे आढळली नाही पाहिजेत.
- खर, हिंदुत्व वाढवण्याची देवाने आपल्याला एक संधी दिली आहे .
- मध्यंतरी, हिंदुत्वाचा तोतयागिरी करणाऱ्यांचा कळस गाठला गेला.
- इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल
अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य कर्मचाऱ्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने ऑर्गनायझेशन फॉर ऑफ ह्यूमन संघटनेच्यावतीने महाराष्ट्र भर अधिसंख्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण नागपुरातील संविधान चौकात सुरू आहे. आज उपोषणकर्त्यांचा चौथा दिवस असून काल 3 उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलेली होती. आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. एकनाथ शिंदे या बाबतीत अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्त्यावर बावनकुळे म्हणाले की, संपर्क उद्धव ठाकरे यांनी केला होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन आता संभ्रम निर्माण करत आहेत.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबतच नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. स्थानकांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
WARDHA : राष्ट्रवादचे नेते आ. छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा फोटो लावण्या संदर्भात केलेल्या विधानावरून भारतीय जनता युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. वर्धा येथील बजाज चौक स्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजयुमो कडून सरस्वतीपूजन करत भुजबळांचा निषेध करण्यात आला. यावेळी भुजबळ विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सरस्वती पूजन करून निषेध करण्यात आला. यावेळी गौरव गावंडे,कृष्णा जोशी,पृथ्वीराज शिंदे,वैभव श्यामकुवर,प्रिया ओझा,शुभम खंडारे,करण गेलानी,अक्षय बैस्वार,गौरव शर्मा,बादल झामरे,रवी खंडारे,विशाल कुमरे, दिनेश जयस्वाल, सिद्देश् फाये,आदित्य खंडारे,रोशन खिरकर उपस्थित होते.
बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशल वॉरबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केलं. जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, आताच्या काळातले युद्ध वेगळे आहेत. आताचे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते. त्यासाठी तलवारी भाले याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर अफवा पसरवते तू माझ्यावर अफवा पसरव असं म्हणत पंकजांनी सोशल वॉर बद्दलआपले मत मांडले आहे. नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहूयात.
ज्येष्ठ वकील आर व्यंकटरामानी हे देशाचे नवे अॅटर्नी जनरल
अहमदाबाद शहरातील गरबा मैदानावर मंगळवारी रात्री दोन मुस्लीम तरुणांना हिंदू संघटनांनी पकडल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, चौकशी सुरु असताना काही तरुणांनी त्यांना बेदम मारहाण करुन मैदानाबाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.
मराठवाड्यात काल झालेल्या पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे् मोठे नुकसान झाले. हिंगोलीत फूलशेती उद्ध्वस्त झाली आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, शंख गोगलगाय, रोगराई असे संकट सुरु होते. यातून जी पिके वाचली त्यांना या पावसाचा फटका बसला आहे.
घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही.
नाशिकमध्ये कोथिंबिरी भाव खात असून ती सोन्याच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट 200 रुपयांना विकली जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला आहे. आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास 160 रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात 200 रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत.
मुंबईतील धकाधकीच्या जीवनात देखील लोक सण-उत्सवांसाठी खास वेळ काढतात. त्यासाठी अमूक एका ठिकाणीच जायला हवं आणि एन्जॉय करायला हवं असं काही किमान मुंबईकरांसाठी नसतं. मुंबईकर जिथे कुठे संधी मिळेल तिथे मस्त एन्जॉय करुन घेतात आणि आपल्या या धावपळीच्या जीवनात काही क्षण आनंदात घालवतात. यंदाच्या नवरात्रीत असेच काही क्षण पाहायला मिळाले. ते देखील चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये. एका लोकल ट्रेनमध्ये महिलांचा एक ग्रुप गरबा खेळत असल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.