Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
- अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे बोर गावातील अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले
- दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या अक्कलकोट मध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
- दोन तास झालेल्या पावसाने बोरगावच्या आसपासच्या अनेक ओढ्याना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालेय
पिंपरी चिंचवड : रफीउद्दीन उर्फ रफिक अब्दुल ललित चौधरी आणि मोहम्मद फिरोज हे दोन तरुण मुंबईच्या कुरार पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी पाडा झोपडपट्टीमध्ये झी 24 /07 सेवन नावाने बनावट कस्टमर केअर सेंटर चालवत होते. या कस्टमर केअर सेंटरच्या माध्यमातून ते नामांकित कंपनीचे फ्रिज, वाशीग मशीन आणि टीव्हीचे रिपेरिंग ऑर्डर स्वीकारत होते. झी 24 /07 सेवनचे मेकॅनिक लोकांच्या घरी येऊन त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये थोडफार थातुर मातुर काम करून लोकांची फसवणूक करत होते. एका नागरिकाने तक्रार दिल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला.
मावळातील विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून किल्ल्याच्या पावित्र्याचा भंग झाल्याने त्यांना शिवभक्तांनी चोप देत, उठाबशा काढण्याची शिक्षा दिली
-किल्ल्यावर पर्यटक गुटखा, सिगारेट आणि दारू सेवन करताना आढळल्याने शिवभक्तांच्या राग अनावर झाला होता
-काही जणांना चोप दिल्यानंतर त्यांना उठाबशा काढण्यास लावल्या
-अनेकदा किल्ल्यावर पर्यटक किल्ल्यांच पावित्र्य विसरून मद्यपान करतात, त्यामुळं त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे, परंतु, शिवभक्तांनी असा कायदा हातात घेऊ नये हे ही तितकंच खरं आहे.
शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांची पत्रकार परिषद
- सुनावणी आणि युक्तिवाद केला आहे उद्या सकाळी सुनावणी होईल
- कायदेशीर बाजू मांडू
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय न्याय मिळेल
- सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर चर्चा करणे योग्य नाही।
- मत व्यक्त केले, सुनावणी नंतर बोलू
ठाणे - कळवा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या तिसऱ्या पुलाच्या पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांना दिले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी आज ठाणे - कळवा दरम्यान ठाणे महापालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या पूलाच्या कामाची पाहणी केली. एकूण २.४० किमी लांबीच्या या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्या कामाचा आढावा माळवी यांनी अधिकाऱ्यांसह घेतला. त्यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पाफळकर, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, उप अभियंता आसावरी सोरटे आदी उपस्थित होते. पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक आणि ठाणे बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम २५ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही संदीप माळवी यांनी दिला. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर ती वाहतुकीस खुली केल्यावर ठाणे - कळवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास माळवी यांनी व्यक्त केला. पुलाच्या कामाच्या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी तांत्रिक माहिती घेतली. तसेच संबंधित अडचणींवर मात करून एक मार्गिका काहीही करून पूर्ण करा असे निर्देश दिले.
बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मोरांनी फुलवला पिसारा
बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात मोरांनी फुलवला पिसारा pic.twitter.com/N64HEMnELe
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 3, 2022
यस बँक - डीएचएफएल घोटाळा, ४१५ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई
शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संदर्भातील फैसला गुरुवार ४ ऑगस्ट रोजी होणार, सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता सुनावणी
नवे सरकार आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे आले, मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे जात नसतील तर त्यांच्याकडे बहुमत नाही असे स्पष्ट होते. आधीच्या सरकारने एक वर्ष विधानसभाध्यक्ष निवडला नाही. संविधानानुसार नव्या सरकारला विधानसभाध्यक्षांची निवड करणे बंधनकारक होते, त्यांनी बहुमताने अध्यक्ष निवडला. कायद्याने नियुक्त विधानसभाध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार. : महेश जेठमलानी
मुख्यमंत्री बदलाची मागणी पक्षविरोधी नाही, मुख्यमंत्री भेटत नसल्यामुळे त्यांना बदलण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली, ही बाब पक्षविरोधी नाही : साळवे
पक्षांतर्गत लोकशाही दाबून टाकण्यासाठी दहाव्या सुचीचा गैरवापर कोणी करू शकत नाही : तुषार मेहता
राज्यपाल अनंत काळ वाट बघू शकत नाहीत : तुषार मेहता
महाधिवक्ता तुषार मेहता सर्वोच्च न्यायालात युक्तिवाद करत आहेत
साळवे सुधारित याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करणार
आम्ही पक्ष सोडलेला नाही आणि पक्ष सोडल्याचे सिद्ध होत नसल्यास पक्षाकडून अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही : साळवे
आम्ही इथे आलो कारण धमकी हा गंभीर मुद्दा होता. आमदारांच्या जीवाला धोका होता, आमदारांना धमक्या येत होत्या म्हणून सर्वोच्च न्यायालयात आलो : नीरज कौल
शिंदे गटासाटी नीरज कौल यांच्या युक्तिवाद
विधानसभाध्यक्षांची निवड बहुमताने झाली आहे, त्यात कोर्ट काय करणार? : साळवे
उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली म्हणून सर्वप्रथम कोर्टात आलो : साळवे