LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 30 August 2022 Latest Update: जळगाव - वीज कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 30 August 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 30 August 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Aug 30, 2022  |  09:11 PM (IST)
सिडकोकडून गणेशोत्सवानिमित्त लॉटरी जाहीर

सिडकोकडून गणेशोत्सवानिमित्त लॉटरी जाहीर
उद्या 4 हजार 158 घरांची आणि 245 वाणिज्यिक गाळ्यांसाठी लॉटरी 

Aug 30, 2022  |  08:33 PM (IST)
पुणे महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षापासून अनेक अनियमित कारभार व भ्रष्टाचार झाले आहेत. त्या संदर्भात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. त्याविषयी मीडिया व अनेक वृत्तपत्राने देखील दखल घेतली. परंतु त्या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात आली नाही. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सदर भ्रष्टाचाराची CAG मार्फत  चौकशी करावी. अशी मागणी सदर निवेदनात करण्यात येत आहे 

Aug 30, 2022  |  07:46 PM (IST)
वीज कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जखमी केले आहे. पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन , पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम राबवीत होते. दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
Aug 30, 2022  |  07:41 PM (IST)
पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, कुटुंबियांचे आझाद मैदानात आंदोलन

नगरमधील जामखेड मध्ये धक्कादायक घटना घडली होती. नागेश रामदास पवार नामक तरुणाचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला. जामखेड येथील आरोळे वस्ती येथे स्थित या तरुणाचा अवघ्या 27 व्या वर्षी मृत्यू झाला. तरुण पुणे येथे राखी बांधण्यासाठी आपल्या बहिणीच्या घरी गेला असता लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्याच्या बहिणीला सांगितले की, आम्हाला सोनार दाखव आणि सोने काढून दे नाहीतर कठोर पाऊल उचलू. पोलीस कास्टडीमध्ये असताना सोने उकळून घेण्यासाठी आणि खोटा गुन्हा कबुल करण्यासाठी तरुणाला मारहाण केली. त्यामध्ये तरुणाला आपला जीव गमावावा लागला. असे आरोप कुटुंबियांनी केले आहेत

Aug 30, 2022  |  06:53 PM (IST)
ठाणे : दिव्यांग कला केंद्रात बनविले गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचं झाड
दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांच्या सन्कल्पनेतुन गेली पाच वर्षे विशेष मुलांसाठी विशेष गणेशोत्सव साजरा केला जातो.पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिने झाडें लावा व झाडे जगवा हा संदेश देत विविध फुलांची व इतर कलमं सभोवतली मांडून याच मुलांनी याची आरास केली. सर्व मुलांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती केली जाते. तसेंच बाप्पाची मूर्ती लाल मातीची असून त्यात तुळशीच्या बियांचं समावेश असतो.या मूर्तीचे विसर्जन शेजारी असलेल्या उद्यानात एका मोठ्या कुंडीत करून त्याची माती अकरा विविध छोट्या कुंडीत लावून त्यात काही दिवसात तुळशीचे रोप उगवते त्याला बाप्पाचं झाड संबोधले जाते.या गणेशोत्सवात दिव्यांग कला केंद्रातील विजय जोशी, अन्मय मेत्री,गौरव राणे, संकेत भोसले, पार्थ खडकबान्, आरती गोडबोले, रेश्मा जेठरा यांनी सहभाग घेतला.संचालिका संध्या नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली परेश दळवी ,माधुरी चव्हाण व इतर सहकारी यांनी उत्सवाची तयारी विशेष मुलांकडून करून घेतली.
Aug 30, 2022  |  06:42 PM (IST)
MUMBAI | सेक्स चॅटींग तसेच अश्लिल व्हिडीओ करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कॉल सेंटरचा पोलीसांनी केला पदार्फाश 

मुंबईच्या कांदिवली गुन्हे शाखा ११ ने मोठी कारवाई केली आहे....

'मुलींना अमिष दाखवून “चामेट" या ऑनलाईन चॅटींग अॅप्लीकेशनद्वारे, त्यांच्याकडुन व्हिडीओ सेक्स चॅट करवून घेणाऱ्या १२ मुलींची आणि ऑफीसमध्ये इतर काम करणाऱ्या ५ अश्या एकूण १७ मुलींची सुटका करुन व्हिडीओ कॉलद्वारे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या आरोपींचा पदार्फाश करण्यात आला आहे. 

मुंबई शहरातमध्ये बऱ्याच ऑनलाईन चॅटींग अॅप्लीकेशनव्दारे स्त्रियांना अश्लिल सेक्स चॅटींग तसेच अश्लिल व्हिडीओ सेक्स चॅटींग करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कॉल सेंटरचा शोध घेवून या युनिट 11 ने  कॉल सेंटर चालविणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई केली आहे.... आरोपी ब्रिजेश शोन विल्यम्स याला पोलीसांनी अटक केली आहे....

Aug 30, 2022  |  06:29 PM (IST)
जम्मू कश्मीरमध्ये दरीत कोसळली बस, ७ जणांचा मृत्यू

जम्मू कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दरीत बस कोसळली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू आहे. 

Aug 30, 2022  |  06:21 PM (IST)
अमरावती: घर टॅक्स वाढी विरोधात शहर काँग्रेसचे महानगरपालिकेत आंदोलन

२०१४ नंतर, सातत्याने उत्पन्नात घट आणि, महागाई,बेरोजगारी, यामध्ये वाढ होत असतांनाच कोरोना नंतरच्या काळात तर या समस्या अधिक वेगाने वाढीवर आहेत.अशातच अमरावती मनपा प्रशासनाने बेमालूमपणे  केलेली ४० % घर टॅक्स वाढ रद्द करण्यात यावी.आजचे काळात सर्वस्तरीय उत्पन्न घटत असतांना अमरावती मनपाने मात्र, स्वच्छता कराची वसुली सुरू केली आहे.त्याशिवाय असिसमेंट नंतरच्या म्हणजे नजीकच्या काळात आणखी एकदा घर टॅक्स वाढ होणारच आहे.कुठल्या कायदेशिर,नियमानुकुल बाबींचा आधार घेत ४०% कर-वाढ करण्यात आली ते जाहिर करण्यात यावे. घर टॅक्स वाढ करतेवेळी नेमका कशाचा आधार घेण्यात आला? याचे लेखी स्वरुपात प्रशासनाने कळवावे अशी मागणी अमरावती शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री.बबलू शेखावत,माजी महापौर श्री.विलास इंगोले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Aug 30, 2022  |  05:29 PM (IST)
बुलढाणा : बदलीसाठी चुकीची माहिती देणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई-किशोर पागोरे

शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या बदली प्रक्रियेदरम्यान ऑनलाईन माहिती मागविण्यात आली होती. बदली प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांची एक वेतनवाढ थांबविण्यात येणार आहे..या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला असून, शिक्षकांनी जाणीवपूर्वक माहिती चुकीची भरलेली नाही, तर अनावधानाने चुकीची माहिती भरली जाऊ शकते. त्यामुळे शिक्षकाची एक वेतनवाढ थांबविणे अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. जिल्ह्यात 156 शिक्षक आलेले आहे..आणि 72 शिक्षक हे दुसऱ्या जिल्ह्यात जाणार होते मात्र एका शिक्षकाने अंतर जिल्हा बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे.. त्यामुळे 71 शिक्षक हे दुसर्‍या जिल्ह्य़ात जाणार आहे..तसेच चुकीची माहिती शिक्षकांनी भरली असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शिस्त आणि अपील अधिनियम नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी दिली आहे. 

Aug 30, 2022  |  04:24 PM (IST)
अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 
13 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत मुक्काम 

Aug 30, 2022  |  04:20 PM (IST)
औरंगाबदमध्ये काँग्रेसचे बिल्कीस बानो प्रकरणी निदर्शने

बिल्कीस बानोवर बलात्कारप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात यावी यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. आता काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. 'धिक्कार असो, धिक्कार असो' अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. महिलावर अत्याचार होत असतांना कारवाई न होणे हे हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचा आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. अरुण सिरसाठ यांनी केला. आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफही सहभागी झाले होते.

Aug 30, 2022  |  03:57 PM (IST)
गणेश भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न'; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला

अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी खरेदीची झुंबड उडाली आहे.पण यंदा वाढलेल्या किंमतीमळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत.गणेश मूर्तीपासून ते सर्व पूजा साहित्य आणि प्रसाद देखील यंदा महागात मिळत आहे.जवळपास 25 टक्क्यांनी महागाई वाढली असून गणेशोत्सवात ‘महागाईचे विघ्न भक्तांच्या समोर उभे ठाकले आहे.
 

Aug 30, 2022  |  02:33 PM (IST)
माजी आमदार शिवाजी चोथे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची 

 शिवसेनेचे माजी आमदार शिवाजी राव चोथे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आज घनसावंगीत जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणी पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन होणार होतं. मात्र पोलिसांनी मध्येच मोर्चा अडवला आणि आश्वासनाच्या बळावर मागे पाठवला. मात्र त्यानंतर शिवसेनेचे नेते शिवाजी राव चोथे त्या ठिकाणीआले आणि आंदोलन का धुडकावलं असा सवाल करत मी आंदोलनावर ठाम असल्याचं सांगत पोलीस स्टेशनसमोर येऊन ठिय्या मांडला. यावेळी चोथे आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली असून कायदा व सुव्यवस्थेला मी मानत नाही असं म्हणत या मूर्ती चोरी प्रकरणी एसआयटीची मागणी केलीआहे. 


 

Aug 30, 2022  |  01:32 PM (IST)
THANE | आज सकाळपासून ठाण्यात भाविकांची आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यास सुरुवात
THANE | आज सकाळपासून ठाण्यात भाविकांची आपल्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यास सुरुवात
Aug 30, 2022  |  01:26 PM (IST)
 कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या तरूणांचा अपघात; वैजापूरचे 3 तरुण ठार

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमा लागत असलेल्या वैजापूर येथील तरूण अंबावतार या गावी कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जात होते. यावेळी रात्री पिकअप वाहनाचा ड्रायव्हरच्या वाहनावरील ताबा सुटला. यात वाहन पलटी झाले. या अपघातात वैजापूरच्या चोपडा तालुक्यातील 3 तरुण ठार झाले, तर 6 जण जखमी झाले. पंकज प्रकाश बारेला (वय 17) जगदीश केरसिंग बारेला (वय 19), नीलेश शांतीलाल बारेला (22) अशी मृतांची नावे आहेत.

Aug 30, 2022  |  01:21 PM (IST)
मुंबईकरांसाठी लाईफ लाईन ठरेलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकरांसाठी लाईफ लाईन ठरेलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aug 30, 2022  |  12:24 PM (IST)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिवतीर्थावर, राज ठाकरेंची घेणार भेट

काल उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सागर बंगल्यावर भेट झाली होती. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.  बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर चर्चा होऊ शकते असे सांगितले जात आहे. 

Aug 30, 2022  |  11:26 AM (IST)
मेट्रो तीनची यशस्वी चाचणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो तीनला हिरवा झेंडा
मेट्रो तीनची यशस्वी चाचणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा

Aug 30, 2022  |  10:45 AM (IST)
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल

कांदिवलीचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्यावर हे आक्षेपार्ह ट्विट केले होते. या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार दिली होती.
 

Aug 30, 2022  |  10:31 AM (IST)
Belgaum Border Issue : बेळगाव सीमा प्रश्नी तब्बल 5 वर्षानी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षानी हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येत असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकाप्रमाणेच संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.