LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 30 July 2022 Latest Update :कोश्यारींचे ते वैयक्तिक मत - मुख्यमंत्री शिंदे

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

 Breaking News 30 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 30 July 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 30, 2022  |  04:58 PM (IST)
कोश्यारींचे ते वैयक्तिक मत - मुख्यमंत्री शिंदे
राज्यपाल भगत सिंह यांचे मुंबईवरील मत हे वैयक्तिक आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. तसेच कोश्यारी यांच्या मताशी आम्ही असहमत आहोत, राज्यपाल ही संविधानिक पद आहे, त्यांनी निती आणि संविधानाला धरून आपली मतं व्यक्त केली पाहिजे. मुंबईसाठी मराठी माणसांचे योगदान मोठे आहे असेही शिंदे म्हणाले.
Jul 30, 2022  |  04:53 PM (IST)
कोश्यारींना मला माझ्या भाषेतील शिव्या घालाव्याशा वाटतायेत - जितेंद्र आव्हाड
कोश्यारींना मला माझ्या भाषेतील शिव्या घालाव्याशा वाटतायेत - जितेंद्र आव्हाड
Jul 30, 2022  |  11:17 AM (IST)
राज्यपालांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार समाचार, १ वाजता पत्रकार परिषद
गुजराती आणि राजस्थानींमुळेच मुंबई आर्थिक राजधानी आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा सर्वस्तरांतून निषेध केला जात आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयी पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटवरून ही माहिती दिली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतील.
Jul 30, 2022  |  09:02 AM (IST)
कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक
जम्मू कश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांत चकमक उडाली आहे.
Jul 30, 2022  |  06:42 AM (IST)
मला काही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार, अभिनेत्री तनुश्री दत्ताची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकर आणि बॉलिवूडला लक्ष्य केले आहे. उद्या जर माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया जबाबदार असतील असी इन्स्टाग्राम पोस्ट तनुश्री दत्ताने लिहिली आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Jul 30, 2022  |  06:36 AM (IST)
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे बद्रीनाथ यात्रा प्रभावित झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
Jul 30, 2022  |  08:17 AM (IST)
मुंबईतील अंधेरी भागात इमारतीला आग, एका व्यक्तीचा मृत्यू
शुक्रवारी मुंबईतील अंधेरी भागात एक इमारतीला आग लागली, या आगीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे,