LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 30 October 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 30 October 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 30 October 2022 Latest Update

 Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Oct 30, 2022  |  06:23 PM (IST)
भाजपने तेलंगाणा राष्ट्र समितीचे २० ते ३० आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला, तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाचा आरोप

भाजपने तेलंगाणा राष्ट्र समितीचे २० ते ३० आमदार विकत घेण्याचा प्रयत्न केला, तेलंगाणा राष्ट्र समिती पक्षाचा आरोप

Oct 30, 2022  |  06:22 PM (IST)
तेलंगाणातही सीबीआयला बंदी

अनेक बिगर भाजप शासित राज्यांत सीबीआयला बंदी घातली आहे. आता तेलंगाणा जिल्ह्यातही सीबीआयला बंदी घालण्यात आली आहे. 

Oct 30, 2022  |  04:30 PM (IST)
अमरावतीत मोठी दुर्घटना; जुनी इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

शहरातील प्रभात चित्रपटगृहाजवळ एसलली एक जुनी इमारत अचानक कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलीस, अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. राजदीप बॅग हाऊस असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. 

Oct 30, 2022  |  04:27 PM (IST)
नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट  हा नागपूरमध्ये  होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. परंतु हा प्रकल्प हैदराबादेत जाणार आहे. 

Oct 30, 2022  |  09:41 AM (IST)
लालबागमध्ये ट्रकचा भीषण अपघात, उड्डाणपुलावर ट्रक झाला पलटी

मुंबईत लालबागमधील उड्डाणपुलावर मध्यरात्री भरधाव जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव ट्रक पुलावरच पलटी झाला. या अपघातात ट्रक चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Oct 30, 2022  |  08:33 AM (IST)
आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. जनसंपर्क विभागाकडून परिपत्रक जारी करत मेगाब्लॉकसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Oct 30, 2022  |  05:48 AM (IST)
अवघ्या 8 दिवसांत 17 डिग्रीपर्यंत घसरणार पारा:महाराष्ट्रासह 10 राज्यांना भरणार हु़डहुडी

ऑक्‍टोबर महिना सरत असताना हवामानातही बदल होणार आहे. देशात एकाच वेळी सक्रिय असलेल्या दोन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 10 राज्यांमध्ये थंडी पडेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामधील तापमानात 6 ते 7 नोव्हेंबर दरम्यान झपाट्याने घट होईल.

Oct 30, 2022  |  05:43 AM (IST)
आता बैलाला धडकली 'वंदे भारत एक्सप्रेस':गुजरातच्या अतुल रेल्वेस्थानकावर अपघात  

 देशाची सर्वात वेगवान रेल्वे असणाऱ्या वंदे भारतला शनिवारी सकाळी पुन्हा अपघात झाला. मुंबईहून अहमदाबादला जाणारी ही एक्सप्रेस गुजरातमध्ये एका बैलाला धडकली. त्यात रेल्वेचा समोरील भाग फुटला. पण अर्ध्या तासाच्या विलंबानंतर ही रेल्वे पुन्हा आपल्या नियोजित स्थळी मार्गस्थ झाली. 
 

Oct 30, 2022  |  05:41 AM (IST)
नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय  होण्याची शक्यता

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे.
 

Oct 30, 2022  |  05:38 AM (IST)
मैत्रिणीच्या फ्लॅटवर तरूणाची आत्महत्या; पोलिसांनी मैत्रिणीवर दाखल केला गुन्हा 

प्रेयसीनं लग्नास नकार दिल्यानं तरूणानं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना रत्नागिरी शहरात समोर आली आहे. साहिल मोरे असं या तरूणाचं नाव असून त्यानं 21 ऑक्टोबर रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. तरुणाने आपल्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर गळफास घेतला.

Oct 30, 2022  |  05:34 AM (IST)
दक्षिण कोरिया : हॅलोविन पार्टीवेळी चेंगराचेंगरीमुळे 120 जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियामधून मोठी बातमी समोर आली आहे. हॅलोविन पार्टीमध्ये सेलिब्रेट करत असताना चेंगराचेंगरी झाल्याने 120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यासोबतच 100 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.