Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघाडीप दिल्याने परिसरतील बळीराजा बळीराजा मोठा चिंतेत सापडला आहे अगोदरच अतिवृष्टीतुन जगलेली पिकं कसेतरी सावरत असताना मेघराजाने बरसण्याकडे पाठ फिरवल्याने पाण्या अभावी कपाशीची, तुरीची, पेरलेल्या इतर पिकाची वाढ खुंटली असून काही पिकं उन्हाच्या मार्यामुळे करपत आहेत,तर पाण्याअभावी शेतजमिनीलाही मोठया भेगा पडल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवाळीला घरी शेतातील उत्पादनाची आस बाळगणाऱ्या शेतकऱ्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत असून शासनाने शेतकरी बांधवांना मोठी आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी रास्त मागणी परिसरातील शेतकरी बांधव करीत आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घेतली भेट
Telangana CM K Chandrashekar Rao meets Bihar CM Nitish Kumar at Patna airport. pic.twitter.com/LrD550wWP3
— ANI (@ANI) August 31, 2022
मोलकरणीला अमानुष मारहाण करणाऱया भाजप नेत्या सीमा पात्रांना अटक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन#Devendrafadnavis #Devendrafadnavis pic.twitter.com/ntKN2GZ4Dy
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) August 31, 2022
लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी भाविक महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज श्री गणेश चतुर्थी..
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 31, 2022
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ#GaneshChaturthi2022 #Ganpatifestival #Ganeshotsav2022 pic.twitter.com/Gs9xU2yCSU
ट्विटकरून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांनी शुभेच्छा ट्विटमध्ये लिहिलं की, आज श्री गणेश चतुर्थी.. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देताना पीएम मोदी म्हणाले की, श्रीगणेशाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या रिक्त पदांवर उद्धव ठाकरे नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करत आहेत. नेतेपदाची नावे घोषित केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी उपनेतेही जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहित ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरवात
चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान
ढोल ताशांच्या गजरात कसबा गणपतीची मिरवणूक सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 4 हजार 158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली आहे. ॲानलाईन पध्दतीने ही लॅाटरी काढली जाणार आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आलेली नाही. मुंबईत 106.25 पेट्रोल आणि डिझेल 94.22 मिळत आहेत.
काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझादी यांची पहिली रॅली काढणार आहेत.जम्मूमध्ये 4 सप्टेंबरला ही रॅली होणार आहे. त्याच दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय राजधानीत 'ड्राइंग पर हल्ला बोल' हा कार्यक्रम घेणार आहेत.