LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 31 July 2022 Latest Update : Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला दुसरं गोल्ड मेडल

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 31 July 2022 Latest Update
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 31 July 2022 Latest Update

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 31, 2022  |  07:54 PM (IST)
संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात ही महाभयंकर आणीबाणी - चंद्रकांत खैरे

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी यांनी एकवेळ आणीबाणी लावली होती. त्याहीपेक्षा हे भयंकर आहे असं सांगत मोदीजी हे आता बस्स झालं अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु असून शिवसेना संपणार नाही. भाजपचे नेतेच या कारवाईच्या विरोधात असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

Jul 31, 2022  |  06:37 PM (IST)
केंद्र सरकारपेक्षा इंग्रज बरे होते, ही परिस्थिती देशात आपल्याला पहिला मिळते - माजी खासदार सुभाष वानखेडे

नांदेड - शिवसेना नेते संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमकतेच्या भूमिकेत दिसत आहेत. यापूर्वी इंग्रजांनी देखील सर्वसामान्य नागरिकांवर असेच अत्याचार केले होते पण केंद्र सरकार हे आता शिवसेना फोडण्यासाठी इंग्रजांसारखे अत्याचार करत आहेत. त्यांच्या अत्याचारांना शिवसैनिक हे बळी पडणार नाही असे कितीही संकट आले तरी आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिली.

Jul 31, 2022  |  06:10 PM (IST)
काँग्रेसकडून तीन आमदारांचे निलंबन
पश्चिम बंगालमध्ये ज्या आमदारांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली आणि अटक करण्यात आली त्या तीन आमदारांना काँग्रेसने निलंबीत केले आहे.
Jul 31, 2022  |  06:08 PM (IST)
उत्तर प्रदेशमध्ये गाडी आणि बसचा भीषण अपघात
उत्तर प्रदेशमध्ये गाडी आणि बसचा भीषण अपघात झाल आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jul 31, 2022  |  05:25 PM (IST)
ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संजय राऊत यांचं पहिलं ट्विट
ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संजय राऊत यांचं पहिलं ट्विट
Jul 31, 2022  |  04:59 PM (IST)
कोणी ईडीला घाबरत असेल तर त्यांनी आमच्या गटात आलेच पाहिजे असे नाही - मुख्यमंत्री शिंदे
संजय राऊत यांनी जर काही चुकीचे केले नसेल तर त्यांना घाबरायची काही गरज नाही असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राऊत महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. ज्यांना इडीची भिती वाटते त्यांनी आमच्या गटात आलेच पाहिजे अशी अट नाही असेही शिंदे म्हणाले. तसेच यापूर्वीही ईडीने धाडी टाकलेल्या आहेत. जर ईडी केंद्र सरकारच्या दहशतीखाली काम करत असेल तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करावी. परंतु ईडी त्यांचे काम करत आहे असेही शिंदे यावेळी म्हणाले.
Jul 31, 2022  |  04:38 PM (IST)
 संगमनेरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या आयटी कंपनीचे उद्घाटन

 संगमनेरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या आयटी कंपनीचे उद्घाटन; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्दे येथे महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामीण भागातील आयटी कंपनीचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थिती होते. कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला हाजारोंच्या संख्येने शेतकरी, माण्यवरमंडळी उपस्थित होती.तसेच हजारो युवकांना आपल्या गावातल्या गावातच नोकरी मिळणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. आगामी काळात पारेगाव हे आयटी हब बनेल अशी आपेक्षा युवकांकडून व्यक्त केली जात आहे. कपंनी ही दुष्काळी भागात उभी राहीली असल्याने येथील शेतकरी, मोलमजुरी करणारे शेतमजुर, महिला वर्ग यांच्यात आनंदाचे वातावरन पहायला मिळाले. कपंनीच्या उद्घाटना प्रसंगी सर्व पारेगाव खुर्द गाव ढोल ताशांच्या गजराने दुमदुमले होते.

Jul 31, 2022  |  03:57 PM (IST)
राष्ट्रकूल स्पर्धेत भारताच्या के जेरेमीने पटकावले सुवर्ण पदक
भारताच्या के जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्ण पदक
Jul 31, 2022  |  03:22 PM (IST)
आता बातम्या ह्याच चालणार ईडीचे छापे - बाळासाहेब थोरात

अहमदनगर : सत्तेचा उपयोग हा तपास यंत्रणा देशाच्या हिताकरता आहे. पण त्याचा राजकारणा करता केला जाणारा उपयोग हा लपून राहत नाही. राज्यपालांनी जे व्यक्तव्य केले आहे ते निषेध करणार आहे. मराठी माणसाला कमी लेखणारं आहे. बंदुभावाच वातावरण जे महाराष्ट्रामध्ये सर्व समाज्यामधे आहे. मुंबईमध्ये आहे. त्याच्यामध्ये विभाजन करणार आहे आणि हे सर्व वातावरणाचा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता बातम्या ह्याच चालणार ईडीचे छापे असे मत कॉग्रेस विधीमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

Jul 31, 2022  |  02:04 PM (IST)
खासदार राजन विचारे ठाण्यातील शेकडो समर्थकांसह मातोश्रीवर दाखल 

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राजन विचारे यांचं शेकडो शिवसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन

ठाणेकर उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचा राजन विचारेंचा दावा

ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं सांगत शक्तीप्रदर्शन

खासदार राजन विचारे यांच्यासह केदार शिंदे हे सुद्धा उपस्थित

Jul 31, 2022  |  12:57 PM (IST)
संजय राऊत निर्दोष असतील तर त्यांना कोर्ट निर्दोष सोडेल - आमदार संजय गायकवाड

बुलढाणा -  संजय राऊत यांच्या घरी ईडीची कारवाई मी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं. पण गेल्या पंधरा दिवस महिन्याभरापासून त्यांना ईडी ऑफिसमध्ये चौकशी करता बोलावले जात आहेत पण ते टाळ टाळ करून राहिले. संसद अधिवेशनाचे कारण सांगितलं आणि जात नाहीये. शेवटी ईडी एक देशाची व्यवस्था आहे आणि कधी शासकीय डिपार्टमेंट जर तुम्हाला कुठल्या चौकशीला बोलवत असेल तर आपण तिथं न जाता त्याचा अवमान करत आहात किंवा तुम्ही त्याला चॅलेंज करत आहात. म्हणून त्या टाळाटाळीमुळे शेवटी आता ईडीला त्यांना घेऊन जाऊन चौकशी करावी लागेल आणि त्यांना एवढं घाबरून जायची गरज नाही किंवा शक्ति प्रदर्शन दाखवायची गरज नाही. ते जर निर्दोष असतील तर कोर्ट निर्दोष सोडेल. त्यांना घाबरून जायची काय गरज आहे. एरवी बेलगाम पणे बोलतात. बे फार्मपणे वागतात. छाती नसताना छाती काढून आव आणायचा प्रयत्न करतात. मग आता ही जा म्हणा त्यांना सामोरे जरा त्याला. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल अशी प्रतिक्रिया बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडी चौकशी सुरू आहे त्यावर दिली आहे.

Jul 31, 2022  |  11:43 AM (IST)
बीड - माजी मंत्री सुरेश नवले यांचा शिंदे गटात प्रवेश; शिवसेनेला धक्का

औरंगाबाद येथील सिल्लोडच्या कार्यक्रमात आज माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून बीडमधून नवले समर्थक कार्यक्रमाकडे रवाना होत आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी मंत्री पद भूषवले होते. तर एकेकाळी ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले सुरेश नवले आज मात्र शिंदे गटात सामील होतायत. त्यामुळे बीडमधून हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि काँग्रेसला धक्का मानला जातोय. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Jul 31, 2022  |  10:37 AM (IST)
मी शिवसेना सोडणार नाही आणि…”, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. 
 

Jul 31, 2022  |  10:29 AM (IST)
Mumbai Mega Block Updates : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक

लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.

Jul 31, 2022  |  10:23 AM (IST)
Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंगमध्ये बिंदयाराणी देवीने पटकावलं रौप्य पदक

भारताच्या बिंदयाराणी देवीने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 55 ​​किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. मणिपूरच्या बिंदयाराणी देवी राणीने स्नॅच राऊंडमध्ये 86 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो असे एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. बिंदयाराणीने स्नॅच फेरीत पहिल्याच प्रयत्नात 81 किलो वजन उचलले. त्यानंतर स्नॅच फेरी पूर्ण करण्याच्या पुढील दोन प्रयत्नांमध्ये तिने 84 आणि 86 किलो वजन उचलले आणि नायजेरिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना मागे टाकून तिसरे स्थान पटकावले.
 

Jul 31, 2022  |  10:23 AM (IST)
Patra Chaal case चौकशी; खासदार संजय राऊतांच्या घरी आली EDची टीम दाखल

शिवसेनेच्या नेतेमंडळीमागे केंद्र सरकारने ईडीची पिडा जोरदारपणे लावल्याने शिवसेना संकटात सापडली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर ईडीची नजर आहे, दरम्यान सध्या खासदार संजय राऊत हे ईडीच्या गोत्यात अडकले आहेत. आज सकाळी खासदार राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
 

Jul 31, 2022  |  10:23 AM (IST)
DHFL Scam : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून छापेमारी सुरु आहे. यामध्ये आता पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी करत सीबीआयने एक हेलिकॉप्टर जप्त केलं आहे. तब्बल 34 हजार कोटी रुपयांच्या डीएचएफल घोटाळ्यातील आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी पुणे येथील बांधाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घरावर छापेमारी करत सीबीआयने ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केलं आहे. 
 

Jul 31, 2022  |  10:22 AM (IST)
AURANGABAD: मंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या बद्दल चर्चा झालेली नाही - उदय सामंत

औरंगाबाद दौऱ्यावर असल्याले मुख्यमंत्री दिल्लीला गेले असता  विमानतळावर आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया घेतली असतात ते म्हणाले संभाजीनगर सिल्लोडचे कार्यक्रम तसेच आहेत. जिल्हाधिकारी आढावा बैठक पत्रकार परिषद सिल्लोडचा कार्यक्रम शहरातील कार्यक्रम आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयातही जाणार असल्याचे उदय सामंत  यांनी  सांगितले. तीन तारखेपर्यंत विस्तार होईल का विचारले असता सामंत म्हणाले पूर्ण दौऱ्यामध्ये या भागातील विकासाबाबत चर्चा केली, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार काय होणार याबद्दल अजिबात चर्चा झालेली नाही.