LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 9 July 2022 Latest Update: दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Daily News Update
फोटो सौजन्य:  BCCL
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाउ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 09, 2022  |  03:20 PM (IST)
दिल्लीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद
दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद
Jul 09, 2022  |  03:10 PM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्य़ांना निर्देश
अमरावतील जिल्ह्यात विहिरीतील दूषित पाणी पिऊन ५० नागरिकांना डायरीया झाला होता. त्यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीहून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. गरज पडल्यास रुग्णांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
Jul 09, 2022  |  02:47 PM (IST)
शिंजो आबे यांना गोळी घालतानाचा व्हिडीओ आला समोर
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळी घालतानाचा व्हिडीओ आला समोर
Jul 09, 2022  |  01:49 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संतधार, शेतकऱ्य़ांमध्ये आनंदाचे वातावरण
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पावसाची संतधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यात जोरदार पावसाचा पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. या अंदाजानुसार जिल्ह्यात सर्वदूर कमी जास्त -प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती नाही. तर दुसरीकडे मात्र, जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पाऊस शेतीपिकांसाठी उपयुक्त असल्यामुळे शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
Jul 09, 2022  |  01:32 PM (IST)
हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड, ठाणे ते नेरुळ लोकलसेवा ठप्प
हार्बर मार्गावरील कोपरखैरणे स्थानका जवळ OHE वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ दरम्यान लोकलसेवा ठप्प झाली आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
Jul 09, 2022  |  01:27 PM (IST)
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
Jul 09, 2022  |  01:18 PM (IST)
श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी घरातून काढला पळ
श्रीलंकेत आंदोलनकर्त्यांचा राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या घराला घेराव, राजपक्षे यांनी काढला पळ
Jul 09, 2022  |  01:00 PM (IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार.

Jul 09, 2022  |  12:55 PM (IST)
दिल्लीतून मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन
Jul 09, 2022  |  12:31 PM (IST)
अमरनाथ : ढगफुटीमुळे १६ यात्रेकरूंचा मृत्यू
अमरनाथ : ढगफुटीमुळे १६ यात्रेकरूंचा मृत्यू
Jul 09, 2022  |  12:29 PM (IST)
संजय पांडेंची CBI चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची CBI चौकशी
Jul 09, 2022  |  12:26 PM (IST)
पूर्वज हिंदू होते, बकरी ईदला गायीचा बळी देणार नाही; म्हणाले खासदार अजमल
Jul 09, 2022  |  11:16 AM (IST)
बीड: संततधार पावसाने शहराला बकाल रूप; ठिकठिकाणी साचलं गुडघाभर पाणी
Jul 09, 2022  |  10:10 AM (IST)
मुंबईला रेड अलर्ट जारी
मुंबईत दुपारी एक वाजल्यापासून पुढील २४ तासांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
Jul 09, 2022  |  09:56 AM (IST)
भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटींच्या घरात
Jul 09, 2022  |  09:41 AM (IST)
एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील, ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत
Jul 09, 2022  |  09:47 AM (IST)
एनडीएची रविवारी बैठक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांची रविवार १० जुलै २०२२ रोजी दिल्लीत बैठक

Jul 09, 2022  |  09:38 AM (IST)
भारतात १९८ कोटी ५४ लाख ५७ हजार २५० कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्या

भारतात १९८ कोटी ५४ लाख ५७ हजार २५० कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आल्या