LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 07 July Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 07 July Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 07 July Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Jul 07, 2022  |  06:08 PM (IST)
नागपूर - नागपुरात जोरदार पाऊसला सुरवात ; माघील दोन तीन दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस

नागपूर :  नागपुरात जोरदार पाऊसला सुरवात.माघील दोन तीन दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस नागपुरात पडत होता. परंतु आज सकाळपासूनच जोरदार पाउस पडेल असे चित्र दिसत होते. दुपारनंतर पाऊसला सुरवात झाली पाहिले हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता मग जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली तर नागपूरच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या पाऊस सुरूआहे.

Jul 07, 2022  |  04:46 PM (IST)
यवतमाळ - आमदार संजय राठोड यांना रिपाईचे संरक्षण : जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांची माहिती

यवतमाळ :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना धमक्या देण्यात येत होत्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सर्व आमदारांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिपाई कार्यकर्ते आमदार राठोड यांना संरक्षण देत आहेत. यापुढेही आम्ही आमदार राठोड यांना संरक्षण देऊ, अशी माहिती रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी दिली.

Jul 07, 2022  |  04:46 PM (IST)
PANDHARPUR | पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांना सोई, सुविधा, देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद सज्ज

पंढरपूर  : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुलभ सौचालय लाईट पाणी आरोग्यवस्था उपलब्ध करून दिले आहेत तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरात नगरपालिकेच्या साडेतीनशे कर्मचारी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहे तसेच पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांना पंढरपूर नगरपरिषदेने उभा करून दिलेल्या शौचालयाचा जास्तीत जास्त वापर करावा व परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी  यांनी केले आहे. 

Jul 07, 2022  |  04:44 PM (IST)
AURANGABAD | जाधव वाडी भाजी मार्केटमध्ये शेंगा व रताळ्याची मोठी आवक

औरंगाबाद : आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद येथील जाधव वाडी भाजी मंडी मध्ये शेंगा व रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. आषाढी एकादशीला सर्वच हिंदू धर्मीय उपास ठेवतात या उपासाला शेंगा रताळे बटाटे यांचे भाव इतर दिवस स्थिर राहत मात्र तीन दिवसांमध्ये सध्या वाढलेले दिसत आहे व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असता व्यापारी म्हणाले की यावर्षी शेंगा व रताळे यांचे दहा ते पाच रुपयांनी भाव वाढले आहे पूर्वी रताळी 30-35 रुपये किलो विकायची आता 45 ते 47 रुपये भाव झालेला आहे शेंगाही 35 40 रुपये किलो होते आता 50 ते 60 रुपये किलो विक्री होत आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये ही आणखी भाव वाढू शकतात अशी शक्यता ठोक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. व्यापारी ठोक माल घेऊन रताळे 50 ते 60 रुपये किलो तर शेंगा 70 ते 80 रुपये किलो पर्यंत विक्री करत आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आणखी शेंगा ,रताळे ,बटाटे यांची आवक वाढणार असल्याचे माहिती व्यापाऱ्यांनी यावेळी दिली आहे.

Jul 07, 2022  |  04:44 PM (IST)
बीड -  पंकजा मुंडेंना शिंदे सरकारमध्ये स्थान द्या  भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे मोहटा देवीला साकडे

नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान मिळावं. या करिता बीड मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील मोहटा देवीला साकडं घालत पायी दिंडी काढली आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या दिंडीला सुरुवात झाली असून 80 किलोमीटर ही दिंडी पायी जाणारा आहे. विधान परिषदेत देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची संधी हुकली, याआधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातून वगळण्यात आलं होतं. आता मात्र या नवीन सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळावे याकरिता ही दिंडी काढण्यात आली आहे.

Jul 07, 2022  |  04:43 PM (IST)
KALYAN | हिंदुत्व आणि विकास या दोन विचारांवर शिंदे आणि फडणवीस एकत्र आले आहेत - भाजप आ. रवींद्र चव्हाण

कल्याण : गेले काही दिवस डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण हे  एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते. सुरत, गुहावटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास त्यांनी केला आणि शिंदे सरकार स्थापन होताच चव्हाण यांनी डोंबिवलीमधील आपल्या कार्यालयात हजेरी लावली. त्यावेळी  भाजप कार्यकर्त्यांनी आणि शिंदे समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि विकास या दोन विचारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत असे सांगितले.

Jul 07, 2022  |  04:41 PM (IST)
PANDHARPUR | विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणकीमध्ये अभिजीत पाटील गटाचा विजय 

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील गटाने विजय प्राप्त केला. कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा गट तसेच युवराज पाटील यांचा गट आणि अभिजीत पाटील आणि डॉ. बी.पी. रोंगे यांच्या गटात तिरंगी सामना  लागला होता. बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला  झाली. ही मतमोजणी दहा टेबलवर 1 फेऱ्यांअखेर गुरुवारी सकाळी आलेल्या अधिकृत निकालामध्ये अभिजीत पाटील गटाच्या सर्वच उमेदवारांनी विजय प्राप्त केला. या विजयामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर  परिवर्तन झाल्याचे दिसून आले.

Jul 07, 2022  |  04:41 PM (IST)
बीड - आरक्षण बचाव आंदोलन समितीचे लाक्षणिक उपोषण

2018 साली फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र हे आरक्षण फसवं असल्याचं म्हणत आरक्षण बचाव आंदोलन समितीने आरक्षणाच्या मागणी करिता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. फडणवीस सरकारने दिलेल आरक्षण हे फसवं असून त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर आता नव्याने शिंदे सरकार सत्तेत आले आहे. त्यांनी मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतील 16 टक्के आरक्षण तात्काळ जाहीर करा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आहे

Jul 07, 2022  |  04:41 PM (IST)
बुलडाणा -   पहिली विठ्ठल दर्शन एक्सप्रेस खामगाववरुन रवाना 

बुलडाणा : ‘पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी’ असा भाव मनाशी बाळगून खामगाव येथून भाविक गुरुवारी पंढरपूरला रवाना झाले. पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना घेऊन ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेस आज गुरुवार रोजी दुपारी खामगाव येथून रवाना झाली. कोरोनाच्या विघ्नामुळे मागील दोन वर्ष आषाढी महोत्सव होवू शकला नाही. त्यामुळे 'विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात आली नाही. दरम्यान दोन वर्षांनंतर यावर्षी 'विठ्ठल दर्शन एक्सप्रेस' सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आज ७ जुलै रोजी दुपारी खामगाव रेल्वेस्थानकावरुन विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी खासदार प्रतापराव जाधव ,सागर फुंडकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखून एक्सप्रेस रवाना झाली आहे. एकूण 1405 भाविकांना घेवून ही एक्सप्रेस पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाली . 

Jul 07, 2022  |  01:40 PM (IST)
JALGAON : शेतकऱ्यांचे कापूस उत्पादन वाढवावं, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी शेती शाळा
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवावं यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात शेतकऱ्यांसाठी शेती शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्यक्ष शेतावर जाऊन कापूस पिकावर किडीचे नियंत्रण किडीचे प्रादुर्भाव खतांच्या प्रमाण पिकावर पडणारा व्हायरस हे कसं ओळखावं याबद्दल प्रत्यक्ष शेतावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन निरीक्षण करण्यात आले आहे. या उपक्रमात स्व:त शेतकरी शेती शाळेत प्रत्यक्ष निरीक्षण करून आपलं कापसाचे उत्पादन कसं वाढेल व कापूस पिकावर केळीचे व रोगाचे नियंत्रण कसे कमी होईल, यासंदर्भात मार्गदर्शन घेऊन स्व:त सहभाग होत असल्याने त्यांच्या येणाऱ्या कापसाच्या उत्पादनात नक्की वाढ होईल. असा विश्वास कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
Jul 07, 2022  |  01:34 PM (IST)
ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का; ६६ नगरसेवक शिंदे गटात

ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का; ६६ नगरसेवक शिंदे गटात

Jul 07, 2022  |  01:33 PM (IST)
अमरावतीः भाजप नेता कपिल मिश्रा अमरावतीमध्ये येऊन घेणार उमेश कोल्हे परिवाराची भेट

अमरावतीः भाजप नेता कपिल मिश्रा अमरावतीमध्ये येऊन घेणार उमेश कोल्हे परिवाराची भेट

Jul 07, 2022  |  01:33 PM (IST)
Goa Cm Pramod Sawant : गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर पूर्णपणे थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने 100 दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सीएम सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 'डबल इंजिन की सरकार'च्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 
 

Jul 07, 2022  |  11:06 AM (IST)
MUMBAI : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात दाखल.

Jul 07, 2022  |  08:56 AM (IST)
रात्रभर धो-धो पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स

मुंबईत रात्रभर पावसाची संततधार सुरूच आहे. मुंबईत पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जोरदार पाऊस आजही कायम आहे. रात्रभर धो-धो पाऊस सुरू आहे. तसंच पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.  जाणून घ्या मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स 

Jul 07, 2022  |  08:52 AM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची टीम तैनात; नागरिकांनी सतर्क राहून स्वतःसह पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन

Jul 07, 2022  |  08:52 AM (IST)
औरंगाबादः नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

औरंगाबादः संभाजीनगर नामकरणाला विरोध केल्यास जिल्ह्यात तांडव करू; मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

Jul 07, 2022  |  08:49 AM (IST)
Mukhtar Abbas Naqvi Resign: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा
मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी राजीनामा देऊ शकतात, अशी आधीपासूनच चर्चा सुरू होती. मुख्तार अब्बास नकवी यांच्या पाठोपाठ आरपीपी सिंह यांनी देखील राजीनामा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मुख्तार अब्बास नकवी आणि आरपीपी सिंह यांची भरभरून प्रशंसा केली होती.
Jul 07, 2022  |  08:44 AM (IST)
मुबंई : गोवा महामार्गावरील परशुराम घाट 9 जुलै पर्यंत बंद राहणार
02 जुलै 2022 रोजी परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्याने घाटातील रस्ता बंद झालेला होता. रात्री 03.30 वाजता दरड बाजुला करुन वाहतुक सुरू करण्यात आलेली होती. पुन्हा 05 जुलै 2022 रोजी मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतुक बंद झालेली आहे. अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे. 09 जुलै 2022 रोजी पर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट असल्याने पावसामुळे घाटातील दरडी कोसळून जिवीतहानी होवू नये याकरीता 06 जुलै 2022 पासून 09 जुलै 2022 रोजी पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात यावा असा अहवाल कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे सादर केलेला आहे.