LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 31 Mar Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Mar 31, 2022  |  10:37 AM (IST)
माजी मंत्री लोणीकरांच्या अडचणीत वाढ!

नागपूर : महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणंमाजी मंत्री बबनराव लोणीकर यांना महागात पडणार असल्याची चिन्हं आहेत. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ.राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Mar 31, 2022  |  10:35 AM (IST)
मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत दंड ठोठावला

मुंबई : हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया), इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि हॉटेल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतरांच्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. याचिकांमध्ये महाराष्ट्र सरकारने 28 जानेवारी 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान दिले होते, ज्याने 2021-2022 साठी FL-III परवाना नूतनीकरण शुल्क निश्चित केले होते.

Mar 31, 2022  |  10:31 AM (IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसचा गदारोळ

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसही सक्रिय झाली आहे. आज काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात निदर्शने करत आहेत. या निदर्शनात राहुल गांधी देखील सहभागी झाले आहेत. या निदर्शनात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरीही सहभागी झाले आहेत.