LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 1 Apr Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Apr 01, 2022  |  09:09 AM (IST)
उरण ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग

रायगड :  उरण तालुक्यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला मोठी आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. ड्रेनेज मधील तेल पाण्याच्या साठवण तलाव मध्ये साठविण्यात येते याच तलावाला शॉर्टसर्किट असे कारण सांगून आग लागल्याचे कळते. संध्याकाळी पाचच्या सुमारास लागलेल्या आगी वर तब्बल दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे या शाळेचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.या आगीमध्ये एक अग्निशमन दलाच्या जवळ किरकोळ जखमी झाला असून आपण पूर्णपणे विझवण्यात आली असून पुढील अनर्थ टळला आहे..

Apr 01, 2022  |  09:07 AM (IST)
एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून बडतर्फीची कारवाई

मुंबई : दिवाळीपासून सुरु असलेल्या एसटी कामगारांचा अजूनही संप सुरुच आहे. राज्य सरकाराने एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कर्मचाऱ्यांना दिलेली ही मुदत काल संपली. अजूनही एसटीचे हजारो कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाण्याची शक्यता आहे. 

Apr 01, 2022  |  09:03 AM (IST)
पंतप्रधान मोदी आज करणार ‘परीक्षा पे चर्चा’

नवी दिल्ली : आगामी परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की 'परीक्षा पे चर्चा'ची पाचवी आवृत्ती “अत्यंत महत्त्वाची आहे.  कारण कोरोना साथीनंतरच्या शैक्षणिक परिस्थितीभोवती फिरते, विशेषत: परीक्षा पुन्हा ऑफलाइन मोडवर होणार आहेत.

Apr 01, 2022  |  09:00 AM (IST)
जेट इंधनाच्या किमतीत 2% ने वाढ

नवी दिल्ली : शुक्रवारी जेट इंधनाच्या किमती 2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या वर्षातील सलग सातव्यांदा वाढ झाली असून जागतिक ऊर्जेच्या किमतींमध्ये वाढ दर्शविणारी ही सार्वकालिक उच्चांकी वाढ झाली.