LIVE BLOG
More UpdatesMore Updates

पाकिस्तानची संसद विसर्जित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी ४ एप्रिलला पुढील सुनावणी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 03 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 03 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 03, 2022  |  07:29 PM (IST)
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी सोमवारी ४ एप्रिलला होणार
पाकिस्तानची संसद विसर्जित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी झाली. सोमवारी ४ एप्रिलला होणार पुढील सुनावणी. पाकिस्तानची संसद विसर्जित करण्याचा निर्णय नॅशनल असेंब्लीच्या 'डेप्युटी स्पीकर'ने घेतला. हा निर्णय घेण्याआधी विरोधकांनी सादर केलेला अविश्वासदर्शक ठराव त्यांनी फेटाळला. हे दोन्ही निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध कसे हे सांगण्यासाठी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल सोमवारी ४ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करणार. सर्वोच्च न्यायालय हा युक्तीवाद ऐकून पुढील निर्णय देणार.
Apr 03, 2022  |  07:22 PM (IST)
पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल सोमवारी सविस्तर युक्तीवाद करणार

पाकिस्तानची संसद विसर्जित करण्याचा निर्णय नॅशनल असेंब्लीच्या 'डेप्युटी स्पीकर'ने घेतला. हा निर्णय घेण्याआधी विरोधकांनी सादर केलेला अविश्वासदर्शक ठराव त्यांनी फेटाळला. हे दोन्ही निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैध कसे हे सांगण्यासाठी पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल सोमवारी ४ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करणार. सर्वोच्च न्यायालय हा युक्तीवाद ऐकून पुढील निर्णय देणार.

Apr 03, 2022  |  07:16 PM (IST)
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी सोमवारी ४ एप्रिलला होणार

पाकिस्तानची संसद विसर्जित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी झाली. सोमवारी ४ एप्रिलला होणार पुढील सुनावणी

Apr 03, 2022  |  07:14 PM (IST)
इमरान पंतप्रधान पदावर कायम

पाकिस्तानमध्ये संसद आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विसर्जित झाले. इमरान खान पंतप्रधान पदावर कायम आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे.

Apr 03, 2022  |  05:52 PM (IST)
Nashik: नाशिकमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; पवन एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवासी जखमी

नाशिक जिल्ह्यातील लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला अपघात  झाला आहे. पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले 

Apr 03, 2022  |  02:02 PM (IST)
Pakistan Political Crisis : राष्ट्रपतींनी बरखास्त केली पाकिस्तानची संसद , ९० दिवसांत होतील निवडणुका

पाकिस्तानमध्ये ९० दिवसांत निवडणुका होऊ शकतात. पाकिस्तानमध्ये मुदतीपूर्वी सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Apr 03, 2022  |  01:59 PM (IST)
विदर्भात आज उष्णतेची लाट तर 2 दिवस कोकणात अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांमध्ये तपमानात कमालीचा बदल होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा 41 पार गेला आहे. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी 40°C पेक्षा जास्त कमाल तापमान आहे. तर दुसरीकडे कोकणात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Apr 03, 2022  |  01:53 PM (IST)
pakistan live update : अविश्वास प्रस्ताव विदेशी षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप

अविश्वास प्रस्ताव विदेशी षडयंत्र, इम्रान खान यांचा आरोप