LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 5 Apr Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्तीवर ईडीकडून जप्त

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
 

Apr 05, 2022  |  04:19 PM (IST)
आपचे नेते सत्येंद्र जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

मनी लॉन्ड्रिंग  प्रकरणात आपचे नेते सत्येंद्र जैन यांची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. 

Apr 05, 2022  |  04:16 PM (IST)
Sanjay Raut Property : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

संजय राऊत यांची अलिबागमधील  संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी  ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. 
 

Apr 05, 2022  |  09:40 AM (IST)
येत्या आठवड्यात मंत्रीमंडळात अदलाबदल

मुंबई : महाविकास आघाडीत आमदारांची नाराजींमुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंबंधी लवकरच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण आदी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. या मंत्रीमंडळ फेरबदलात विधानसभा अध्यक्ष, गृहमंत्री, ऊर्जामंत्री आदी विभागात खांदेपालट होण्याची शक्यता आहे.

Apr 05, 2022  |  09:34 AM (IST)
राजस्थानच्या करौलीमध्ये हिंसाचार उसळला

जयपूर : राजस्थानमधील करौली येथे उसळलेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. परिस्थिती पाहता डीएमने परिसरातील कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. त्याचवेळी राजस्थान काँग्रेसने करौली घटनेबाबत तीन सदस्यीय तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. या समितीत आमदार जितेंद्र सिंह आणि रफिक खान आणि करौली जिल्ह्याचे प्रभारी ललित यादव यांचा समावेश आहे. हे पॅनल करौलीला भेट देऊन आपला अहवाल राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करेल. त्याच वेळी, कर्फ्यू वाढवत असताना, डीएम म्हणाले की परिस्थिती सामान्य नाही, प्रशासन परिसरात बारीक लक्ष ठेवून आहे.

Apr 05, 2022  |  09:33 AM (IST)
Fuel Price Hike : पुन्हा महागाईचा धक्का

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत पंधरा दिवसांत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३ वेळा वाढ केली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना आणि ते प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आले असताना, दुसरीकडे त्याचे दर वाढवून सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला जात आहे. .

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा 80-80 पैशांनी वाढ झाली आहे. या वाढीव किंमतीनंतर देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 104 रुपये 61 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 95 रुपये 87 पैसे प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत गेल्या 15 दिवसांत 13व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ८४ पैशांनी तर डिझेलच्या दरात ८५ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा नवीनतम दर 119.67 पैसे तर डिझेलचा दर 103.92 पैसे आहे.