Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
युनायटेड स्टेट्स, G7 आणि युरोपियन युनियन रशियावर आणखी नवीन निर्बंध लादणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे देश मिळून रशियाविरुद्ध 'सर्व नवीन गुंतवणुकीवर' बंदी घालणार आहेत. यासोबतच त्यांच्या वित्तीय संस्था, सरकारी मालकीचे उद्योग आणि रशियन सरकारचे अधिकारी यांच्यावरही नवीन निर्बंध लादले जातील.
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, यासाठी सुरू असलेल्या असलेल्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.संपकरी कामगारांनी तातडीनं कामावर रूजू व्हावं' अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना समज दिला आहे.
कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एकीकडे भाजपचे नेते करत आहे. तर दुसरीकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात कोरोना काळात औषधी व रूग्णालय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
घराणेशाहीवाले पक्ष आणि सरकारे देशाचे दुश्मन आहेत. त्यांना संविधानाशी काहीही घेणं देणं नाही हे लोकांच्या लक्षात आलं आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.