LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 7 Apr Latest Update: किरीट सोमय्यांविरूद्ध शिवसेनेचे राज्यभर आंदोलन

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 07, 2022  |  02:05 PM (IST)
KALYAN | डोंबिवली त शिवसेनेतर्फे किरीट सोमय्यांच्या विरोधात निदर्शने.

डोंबिवली शहर शाखेतर्फे आज भाजप नेते किरीट सोमय्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

किरीट सोमय्या याच्या INSविक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधी  घोटाळ्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी करत शिवसेने डोंबिवली पोलिसांना निवेदन दिले.तसेच सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली.

Apr 07, 2022  |  02:04 PM (IST)
Beed : किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना रस्त्यावर; सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शिवसेना आक्रमक झालीय.

बीड शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सोमय्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आलाय.

विक्रांत प्रकरणात किरीट सोमयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. यावेळी महामार्गावर ठिय्या मांडून किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलाय. तर गाढवाच्या गळ्यात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून आंदोलन केले गेले. दरम्यान सुरू असलेल्या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी झाली. लातूर आणि औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली आहे.

Apr 07, 2022  |  02:03 PM (IST)
NANDED | किरीट सोमय्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.. दत्ता पाटील कोकाटे

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शिवसेना आक्रमक झालीय.  यावेळी सोमय्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आलाय. विक्रांत प्रकरणात किरीट सोमयांवर  देशद्रोहाचा गुन्हा  दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. यावेळी  ठिय्या मांडून किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करत किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडे देखील मारले आहे

Apr 07, 2022  |  02:03 PM (IST)
NAVI MUMBAI | पनवेल मध्ये,किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना रस्त्यावर; सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन.

नवी मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पनवेलमध्ये शिवसेना आक्रमक झालीय.पनवेल शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी सोमय्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आलाय. विक्रांत प्रकरणात किरीट सोमयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे.

यावेळी शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले, किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलाय.

Apr 07, 2022  |  02:01 PM (IST)
SANGLI | भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करा या मागणीसाठी सांगलीत शिवसेनेचे आंदोलन

भाजपचे नेते किरीट सोमय्या सातत्याने महाराष्ट्र विरोधी काम करत असून त्यांनी भारतीय नौदलातील आयएनएस विक्रांत या युद्धनौच्या डागडुजी साठी लोकांकडून पैशांच्या स्वरूपात वर्गणी गोळा केली.

सदरचे पैसे हे संबंधित विभागाकडे जमा न करता त्यांनी ते पैसे खाल्ले. अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन करण्यात आले.

रिकाम्या मडक्याला सोमय्या यांची प्रतिमा लावून त्याला चपलांचा हार घालत जोडे मारत मडके फोडून निषेध करण्यात आला. यावेळी सोमय्या यांना संगलो जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.

Apr 07, 2022  |  02:00 PM (IST)
AURANGABAD | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार दा

आज गुरुवार सात एप्रिल रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला. ,भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत जहाजासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात वर्गणी स्वरूपात जवळपास 58 कोटी रुपये जमा केले होती. हा जमा केलेला पैसा ते राजभवनात जमा करण्यात येईल मात्र त्यांनी राजभवनात कोणतीही रक्कम जमा केली नाही. माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली .

तक्रारीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांनी सुद्धा पाच हजार रुपये जमा केले होते,मात्र किरीट सोमय्या यांनी हे पैसे राजभवनात जमा न करता सदरील पैशाचा मोठा अपहार करून,आपल्या देशाची फसवणूक केली आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज आज रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे.

Apr 07, 2022  |  01:58 PM (IST)
ठाणे -  किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेनेचे आंदोलन 

युद्धातील जहाज विक्रांत बाबत सोमय्या यांच्यावर देश द्रोहाचा ठपका लागला पाहिजे या साठी जिल्ह्याधिकारी यांना निवेदन देणार आहोत. कोर्ट परिसर असल्याने कायदा सुसवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेने पोलिसांच्या विनंतीला मान देत आंदोलन थांबवले आहे. जोपर्यंत मोठ्या प्रमाणात सोमय्या यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा सेनेच्या वतीने खासदार राजन विचारे ,आमदार रवींद्र फाटक,माजी महापौर नरेश म्हस्के  यांनी दिला आहे  तसेच यावेळी किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी देण्यात आली

Apr 07, 2022  |  01:57 PM (IST)
SOLAPUR |  शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्यांना हथोडा मारो आंदोलन

सोलापुरात आज शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्यांना हथोडा मारो आंदोलन करण्यात आले. आय एन एस विक्रांत या सैन्याच्या  नौकेला वाचविण्यासाठी किरीट सोमय्यानी पैसे गोळा केले मात्र ते राज्यपालांकडे दिलेच नाहीत त्यामुळे या पैशांमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेनं करत किरीट सोमय्यांच्या विरोधात आंदोलन केले. किरीट सोमयांच्या प्रतिमेला हातोड्याने मारत  शिवसेनेने हे आंदोलन केले.
दरम्यान किरीट सोमयांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली , तसेच किरीट सोमय्यानी उगरलेला हातोडा आता त्यांच्यावरच उलटला असल्याची प्रतिक्रिया शिवसैनकानी दिली

Apr 07, 2022  |  01:56 PM (IST)
जळगाव ।  किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी शिवसेनेचे आंदोल

विक्रांत नौका निधी संकलनासाठी  विमानतळावर उभा राहून निधी संकलन करून आय एन एस विक्रांत नौका वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला. तो निधी राजभवनावर जमा न करता स्वतःची व पक्षाची तुंबडी भरली.  सामान्य नागरिकांच्या देश प्रेमाच्या भावनेशी त्याने खेळ खेळला आहे. त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, सदर रक्कम व्याजासह जमा करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी चोपडा शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.  यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणा देण्यात आले या आंदोलनात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजू पाटील शहराध्यक्ष आबा देशमुख विकास पाटील जि प सदस्य हरीश पाटील किशोर चौधरी नरेश महाजन दीपक चौधरी दिव्यांक सावंत नंदू गवळी सुकलाल कोळी हरीश पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Apr 07, 2022  |  01:12 PM (IST)
एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा ! कोर्टाचा अल्टीमेटम

मुंबई : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज  मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल हाती आली आहे. यावेळी हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यासाठीअल्टीमेटम दिला आहे. तसेच तोपर्यंत जे कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला परवानगी दिली आहे.

Apr 07, 2022  |  10:46 AM (IST)
वाढत्या उन्हामुळे 'महाराष्ट्र केसरी'चे सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलले

सातारा : तब्बल दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात सुरु आहेत. सध्या राज्यभरात उन्हाचा कहर वाढत आहेत. साताऱ्यातही उन्हाचे चटके बसले असल्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी पाचनंतर घेतले जाणार आहेत. 

Apr 07, 2022  |  10:43 AM (IST)
सोलापूरात रेल्वे इंजिन घसरले

सोलापूर : पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावरील पारेवाडी स्टेशननजीक रेल्वे इंंजिन घसरुन अपघात झाला. वाशिंबे ते भिगवण दरम्यान रेल्वेमार्गावरील नवीन दुहेरीकरन झालेल्या लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम चालू आहे. हे काम करीत असताना बुधवार सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान करमाळा तालुक्यातील पारेवाडी स्थानकानजीक असलेल्या उजनी जलाशयावरील हिंगणी रेल्वे पूलावर या कामाचे रेल्वे इंजिन घसरून अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

Apr 07, 2022  |  10:40 AM (IST)
Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस आता केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक झाली आहे. काँग्रेस आज, गुरुवारी देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.

Apr 07, 2022  |  10:38 AM (IST)
जगन सरकारचे सर्व मंत्री आज राजीनामा देणार

AP Cabinet Reshuffle: आंध्र प्रदेश मंत्रिपरिषदेचे सर्व २३ सदस्य आज ७ एप्रिल रोजी औपचारिकपणे राजीनामे सादर करतील, जेणेकरून मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार आहेत. 11 एप्रिल रोजी नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे.