Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात
भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार
भारतात १० एप्रिलपासून खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसचा बूस्टर डोस मिळणार आहे. देशातील अठरा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक हा डोस घेऊ शकतील. कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसचा बूस्टर डोस ६०० रुपये एवढ्या रकमेत खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे. लसचा दुसरा डोस घेऊन किमान नऊ महिने पूर्ण झाले असतील तरच बूस्टर डोस घेता येणार आहे. बूस्टर डोस हा ऐच्छिक आहे आणि खासगी हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने घेता येणार आहे.
कार्ड न वापरता एटीएममधून काढता येणार पैसे
हाफिझ सईदला ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी कोर्टाने शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी एक मोठा निर्णय दिला. दहशतवादी हाफिझ सईद याला कोर्टाने दोषी ठरविले आणि ३१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हाफिझला दोन बेकायदा फंडांच्या माध्यमातून निधी संकलन केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
चीनने नाराजी व्यक्त करताच अमेरिकेच्या संसदेच्या अध्यक्षांचा तैवान दौरा रद्द
मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
russia-ukraine war : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. रशियन सैनिक सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांना लक्ष्य करून नष्ट करत आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधात मतदान न करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे अमेरिका संतापली आहे. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणावर संयुक्त राष्ट्रात मतदान न करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे आपण निराश असल्याचे गुरुवारी एका अमेरिकन काँग्रेस सदस्याने सांगितले. पेनसिल्व्हेनियाचे रिपब्लिकन काँग्रेसमॅन ब्रायन फिट्झपॅट्रिक यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की जे देश रशियावर आपले पाय ओढतात त्यांना जबाबदार धरणे आवश्यक आहे. रशियाला मानवाधिकार परिषदेतून वगळण्याचा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल असेंब्लीत शनिवार ९ एप्रिल २०२२ रोजी विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. या मतदानासाठी नॅशनल असेंब्लीचे कामकाज शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालावली. अमेरिकेचा एक डॉलर म्हणजे श्रीलंकेचे ३१४ रुपये ९६ पैसे अशी स्थिती आहे. तसेच अमेरिकेचा एक डॉलर म्हणजे पाकिस्तानचे १८६ रुपये ५ पैसे अशी स्थिती आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानच्या चलनाचे अवमूल्यन सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कळल्यानंतर इमरान खान यांनी पुन्हा स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीची बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. ही बैठक झाल्यानंतर शुक्रवार ८ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी इमरान खान पाकिस्तानला संबोधित करण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांचा अविश्वासदर्शक ठराव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने फेटाळण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला. तसेच नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे विसर्जित होण्याआधीची नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.
अमेरिकेने रशियासोबतचे सामान्य व्यापारी संबंध तोडले