Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात
इम्रानविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज रात्री ८ वाजता मतदान होणार
गुणरत्न सदावर्ते यांच्या चौकशीसाठी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
आम आदमी पार्टीचे ३ प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ९ ते ११ एप्रिल दरम्यान गुजरात दौऱ्यावर
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांचा अविश्वासदर्शक ठराव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने फेटाळण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला. तसेच नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे विसर्जित होण्याआधीची नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नॅशनल असेंब्लीत शनिवार ९ एप्रिल २०२२ रोजी विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. या मतदानासाठी नॅशनल असेंब्लीचे कामकाज शनिवारी सकाळी दहा किंवा साडेदहा वाजता सुरू होणार आहे.