Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संसद भवन, दिल्ली येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासह सर्व नेत्यांनी सहभाग घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली वाहिली. तसेच मुंबई येथील चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहून नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांना हे पत्र पाठवले आहे.
मुंबई : अखेर तो दिवस आला आहे जेव्हा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे चाहते त्यांना लग्नबंधनात बांधताना पाहतील. अशा परिस्थितीत हे दोघे लग्न कधी करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. आज ते दोघे लग्नाचे बंधनात अडकणार आहेत.
भंडारा : भंडाऱ्यात जिल्ह्यात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला असता धावत्या ST बसमध्ये बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राजेश मडावी (वय १९, रा. बोदरा, जि. भंडारा) या अटक करण्यात आली आहे.