अॅड. गुणरत्न सदावर्तेंना सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी एका खेळाडूला देखील कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली संघाने आगामी सामन्यासाठी पुण्याला जाणं रद्द केलं आहे.
लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपी असणारे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. तसेच, आठवड्याभरात तुरुंगात पुन्हा परतण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आशिष मिश्रा यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली.
सध्या राज्यासह देशातीस परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, 'पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.'