LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 20 April 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 20, 2022  |  02:18 PM (IST)
मुंबई : सांताक्रुझ पूर्व भागातील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागली आग
मुंबई : सांताक्रुझ पूर्व भागातील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागली आग
Apr 20, 2022  |  02:17 PM (IST)
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, पण....

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी मागितला ताबा

Apr 20, 2022  |  11:55 AM (IST)
नील किरीट सोमय्या यांना ५० हजाराचा अटकपूर्व जामीन

नील किरीट सोमय्या यांना ५० हजाराचा अटकपूर्व जामीन, पुढील ४ दिवसांत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेपुढे चौकशीसाठी हजर होण्याचे बंधन; मुंबईच्या उच्च न्यायालयाचा निर्णय

Apr 20, 2022  |  11:43 AM (IST)
मुंबईतील ७० टक्के मशीदींवरील लाऊडस्पीकर बंद, अनेक भोंग्याचा आवाज आला खाली

३ मेपर्यंत मशीदींवरील भोंगे हटवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यातील काही मौलवी आणि धर्मगुरूंनी भोंगे हटवणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु मुंबईत याचा परिणाम दिसत आहे. अनेक मशीदींवरील भोंगे हटवले असून अनेक ठिकाणी भोंग्यांचा आवाज कमी झाला आहे. । वाचा: 

Raj Thackeray Impact - मुंबईतील ७० टक्के मशीदींवरील लाऊडस्पीकर बंद, अनेक भोंग्याचा आवाज आला खाली

Apr 20, 2022  |  11:39 AM (IST)
एसएनडीटीच्या अंतिम वर्षाची वार्षिक परीक्षा १० मे २०२२ पासून

एसएनडीटीच्या अंतिम वर्षाची वार्षिक परीक्षा १० मे २०२२ पासून 

Apr 20, 2022  |  11:29 AM (IST)
समाजविघात असलेल्यांनी टॅप केले संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचे फोन - मुंबई पोलीस

समाजविघात असलेल्यांनी टॅप केले संजय राऊत आणि एकनाथ खडसेंचे फोन - मुंबई पोलीस

Apr 20, 2022  |  11:22 AM (IST)
सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक टी. रामा राव यांचे निधन

सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक टी. रामा राव (८३) यांचे निधन. चेन्नईत झाले निधन.

Apr 20, 2022  |  11:15 AM (IST)
अमेरिका युक्रेनला देणार शस्त्र

अमेरिका युक्रेनला ८० कोटी डॉलरची शस्त्र देणार. यात तोफा, स्फोटके, सैनिकांची वाहतूक करणारी वाहने, हेलिकॉप्टर यांचा समावेश.

Apr 20, 2022  |  11:11 AM (IST)
दिल्लीच्या जहांगिरपुरीतील अनधिकृत बांधकाम पाडण्यावर स्थगिती

दिल्लीच्या जहांगिरपुरीतील अनधिकृत बांधकाम पाडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने ११ वाजता झालेल्या तातडीच्या सुनावणीत स्थगिती लावली, पुढील सुनावणी गुरुवारी होणार. याआधी अनेक अनधिकृत बांधकामं पाडल्याचे प्रशासनाने सांगितले.

Apr 20, 2022  |  11:07 AM (IST)
दिल्लीत अनधिकृत बांधकामं पाडली

दिल्लीच्या जहांगिरपुरी भागात अनेक अनधिकृत बांधकामं पाडली अशी माहिती प्रशासनाने दिली

Apr 20, 2022  |  08:33 AM (IST)
शांघाय बंदरात जहाजांची वाहतूक कोंडी

कोरोना संकटाची तीव्रता वाढल्यामुळे चीन सरकारने शांघायमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे शांघाय बंदरात जहाजांची वाहतूक कोंडी झाली आहे. बंदरात माल उतरविणे आणि नवा माल भरुन घेणे ही प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.

Apr 20, 2022  |  08:29 AM (IST)
इन्स्टाग्राम कोलमडले

मंगळवार १९ एप्रिल २०२२ रोजी रात्री १०.४५ वाजता इन्स्टाग्राम ठप्प झाले. इन्स्टाग्रामचे फीड अपडेट होण्याची प्रक्रिया थांबली. दीर्घ काळ ही तांत्रिक समस्या कायम होती.

Apr 20, 2022  |  08:22 AM (IST)
मुंबई : आग्रीपाडा परिसरात आग

आग्रीपाडा परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आग, अग्नीशमनचे ४ बंब घटनास्थळी

Apr 20, 2022  |  08:18 AM (IST)
शिवसेनेच्या संजय राऊतांवर न्यायालयाच्या अवमानाची याचिका

शिवसेनेच्या संजय राऊतांवर इंडियन बार असोसिएशनने न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना याचिकाकर्त्यांनी सहआरोपी केले आहे.

Apr 20, 2022  |  08:16 AM (IST)
दिल्ली : जहांगिरपुरीच्या दंगलीसाठी शस्त्र पुरवठा करणाऱ्यास अटक

दिल्ली : जहांगिरपुरीच्या दंगलीसाठी शस्त्र पुरवठा करणाऱ्याला पोलिसांनी चकमकीअंती जखमी करुन अटक केले; आरोपीवर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू 

Apr 20, 2022  |  08:13 AM (IST)
भारतात ड्रोनद्वारे किटकनाशकांची फवारणी

भारतात ड्रोनद्वारे ४७७ किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे

Apr 20, 2022  |  08:10 AM (IST)
दिल्लीत बेकायदा बांधकाम पाडण्याची मोठी मोहीम

हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीच्या जहांगिरपुरी भागात दंगल झाली होती. या प्रकरणी कठोर कारवाई सुरू आहे. जहांगिरपुरी येथील सर्व बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम थोड्याच वेळात सुरू होईल. या कारवाईसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.