LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 21 April 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 21, 2022  |  02:33 PM (IST)
महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २०२२ रोजी सुनावणी

महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात २५ एप्रिल २०२२ रोजी सुनावणी

Apr 21, 2022  |  02:32 PM (IST)
ओबीसी आरक्षण प्रकरणी आज ऐवजी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ओबीसी आरक्षण प्रकरणी आज ऐवजी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र शासन शपथपत्र सादर करणार

Apr 21, 2022  |  02:31 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींवर कारवाई करण्याची मागणी

धार्मिक विधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मिटकरींवर कारवाई करा, महाराष्ट्रातील पुरोहितांची मागणी

Apr 21, 2022  |  02:29 PM (IST)
तीन कैद्यांना शिक्षा संपण्याआधीच जेलमधून सोडून दिल्याप्रकरणी कारवाई

नाशिक रोड जेलमधील तीन कैद्यांना शिक्षा संपण्याआधीच जेलमधून सोडून दिल्याचे उघड, जेलच्या दोन अधिकाऱ्यांसह एका लिपिकावर गुन्हा दाखल

Apr 21, 2022  |  02:28 PM (IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २४-२५ एप्रिल असा दोन दिवसांचा सोलापूर दौर करणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २४-२५ एप्रिल असा दोन दिवसांचा सोलापूर दौर करणार

Apr 21, 2022  |  01:35 PM (IST)
BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मुंबईत बस वाहतूक विस्कळीत

BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मुंबईत बस वाहतूक विस्कळीत

मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. 

Apr 21, 2022  |  01:34 PM (IST)
महाराष्ट्र : पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे केमिकल फॅक्टरीत आग
महाराष्ट्र : पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे केमिकल फॅक्टरीत आग
Apr 21, 2022  |  10:42 AM (IST)
महाविकास आघाडी सरकारच्या पोलीस बढती बदली आदेशाला २४ तासांत स्थगिती

महाराष्ट्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदलीचे आदेश बुधवार २० एप्रिल २०२२ रोजी काढण्यात आले होते. या आदेशांना २४ तासांच्या आत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Apr 21, 2022  |  08:32 AM (IST)
...म्हणून अक्षय कुमारने मागितली माफी

...म्हणून अक्षय कुमारने मागितली माफी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने जाहीर माफी मागितली. 'विमल इलायची' या उत्पादनाच्या जाहिरातीत अक्षय कुमार दिसला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात ट्रोलिंग सुरू झाले. यानंतर अक्षयने जाहीर माफी मागितली.

Apr 21, 2022  |  07:41 AM (IST)
केंद्रीय गृह मंत्रालयाने ३९ आयएएस आणि ४२ आयपीएसच्या केल्या बदल्या

केंद्रीय गृह मंत्रालयाने ३९ आयएएस आणि ४२ आयपीएसच्या केल्या बदल्या

Apr 21, 2022  |  07:35 AM (IST)
महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्या

महाराष्ट्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि अधीक्षक दर्जाच्या ३७ अधिकाऱ्यांच्या बुधवारी बढत्या आणि बदल्या

Apr 21, 2022  |  07:33 AM (IST)
कायरन पोलार्ड निवृत्त

वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली

Apr 21, 2022  |  07:30 AM (IST)
जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जहांगीरपुरीतील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. या प्रकरणात पुढील सुनावणी आज (गुरुवार २१ एप्रिल २०२२) होणार. 

Apr 21, 2022  |  07:28 AM (IST)
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे निर्णय

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता, प्रकल्प एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याचा निर्णय

शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास १०० कोटींचे भागभांडवल

गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे ३० वर्षासाठी नुतनीकरण

शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ५ टक्के निधी राखीव

महाराष्ट्रात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास मान्यता

काजूबोंडे, मोहाफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची मान्यता

Apr 21, 2022  |  07:20 AM (IST)
यूकेच्या पंतप्रधानांचा भारत दौरा

यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून (गुरुवार २१ एप्रिल २०२२) दोन दिवसांच्या भार दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरुवात ते गुजरातमधून करतील. उद्या (शुक्रवार २२ एप्रिल २०२२) जॉन्सन दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे औपचारिक सोहळ्यात सहभागी होतील तसेच गांधी समाधीचे दर्शन घेतील. बोरिस जॉन्सन नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील. भारतासोबत आर्थिक, राजकीय, संरक्षण अशा विविध मुद्यांवर चर्चा करतील. तसेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना भेटतील. दुपारी एक वाजता किंवा त्यानंतर दोन्ही देशांच्यावतीने हैदराबाद हाऊस येथून संयुक्त प्रसिद्धी पत्रक काढले जाईल. 

Apr 21, 2022  |  07:09 AM (IST)
पंतप्रधान लाल किल्ल्यावरून आज देशाला संबोधित करणार

शिख गुरु तेग बहादुर यांच्या ४००व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार २१ एप्रिल २०२२) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार तसेच एका विशेष नाण्याचे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन करणार, कार्यक्रम रात्री ९.१५ वाजता सुरू होणार