LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 22 April 2022 Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 22, 2022  |  01:40 PM (IST)
MPSC वेबसाइट
MPSC वेबसाइट काही काळ बंद राहण्याची शक्यता
Apr 22, 2022  |  01:38 PM (IST)
दिल्ली सरकारची नवी SOP
दिल्लीतल्या शाळांमध्ये कोरोना पसरू नये म्हणून दिल्ली सरकारने प्रसिद्ध केलेली नवी SOP
Apr 22, 2022  |  01:37 PM (IST)
अमेरिकन काँग्रेसच्या महिला सदस्य इल्हान उमर यांचा पाकिस्तान दौरा हा पूर्णपणे वैयक्तिक
अमेरिकन काँग्रेसच्या महिला सदस्य इल्हान उमर यांचा पाकिस्तान दौरा हा पूर्णपणे वैयक्तिक आणि खासगी स्वरुपाचा आहे. हा अमेरिका सरकारचा अधिकृत कार्यक्रम नाही. इल्हान उमर यांच्या दौऱ्यात व्यक्त झालेली मते आणि अमेरिकेचे धोरण यांचा संबंध नाही.
Apr 22, 2022  |  01:33 PM (IST)
नारायण राणेंना दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यात दाखल एफआयआरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आणखी दोन आठवडे कोणतीही कारवाई करण्यास मुंबईच्या उच्च न्यायालयाने केली मनाई

Apr 22, 2022  |  01:24 PM (IST)
मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांप्रकरणी ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांप्रकरणी ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी
Apr 22, 2022  |  01:21 PM (IST)
मुंबई : बाणगंगेत शेकडो मृत मासे
मुंबई : बाणगंगेत शेकडो मृत मासे तरंगत आहेत. मृत माशांची विल्हेवाट लावण्याचे काम मागील ३ दिवसांपासून सुरू आहे.
Apr 22, 2022  |  01:31 PM (IST)
नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला

सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला, याचिकेच्या सुनावणीची मागणी पण फेटाळली

Apr 22, 2022  |  01:12 PM (IST)
अर्थ डे
अर्थ डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
Apr 22, 2022  |  01:44 PM (IST)
दिल्लीत भारत इंग्लंड यांची संयुक्त पत्रकार परिषद
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांच्यावतीने संयुक्त निवेदन अर्थात जॉइंट स्टेटमेंट दिले. 
Apr 22, 2022  |  10:19 AM (IST)
कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली. कारला लागलेल्या आगीत ३ मुलांसह ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Apr 22, 2022  |  09:56 AM (IST)
जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळील CISF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, ASI शहीद, 10 जवान जखमी

जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळील CISF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, ASI शहीद, 10 जवान जखमी

जम्मूतील (Jammu) चड्ढा कॅम्पजवळ (Chadha Camp) शुक्रवारी पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या (CISF) बसवर (bus) हल्ला केला. दहशतवाद्यांनी (Terrorist) बसवर ग्रेनेड (grenade) फेकले या बसमध्ये १५ जवान होते. सीआयएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर घटनास्थळी चकमक झाली, त्यानंतर चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवादी पळवून गेले. या चकमकीत एएसआय शहीद झाल्याचे वृत्त आहे,

Apr 22, 2022  |  09:42 AM (IST)
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर

कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर

कर्नाटकमधील मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत हिंदू मंदिराचे अस्तित्व आढळले आहे. जशी हिंदू मंदिराची वास्तू रचना असते तशाच स्वरुपाची रचना मशिदीच्या आत आढळली आहे.

Apr 22, 2022  |  09:23 AM (IST)
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर
Photo Credit: टाइम्स नाऊ हिंदी
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर
कर्नाटक : मंगळुरूच्या मलालीत जुन्या मशिदीच्या आत मंदिर
Apr 22, 2022  |  09:18 AM (IST)
कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत

कल्याण डोंबिवलीत पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवलीत आज (शुक्रवार २२ एप्रिल २०२२) पहाटेपासून विजेचा पुरवठा खंडीत आहे.

Apr 22, 2022  |  09:18 AM (IST)
देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा

देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर मध्यरात्री 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही घटना घडली आहे. सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळत आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता.

Apr 22, 2022  |  08:07 AM (IST)
महाराष्ट्रात विजेचे भारनियमन अर्थात लोडशेडिंग सुरू : नितीन राऊत, ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रात विजेचे भारनियमन अर्थात लोडशेडिंग सुरू : नितीन राऊत, ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य

Apr 22, 2022  |  08:02 AM (IST)
मुंबई : मालाडच्या मालवणीतून अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला अटक

मुंबई : मालाडच्या मालवणीतून अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी नायजेरियाच्या नागरिकाला अटक, ७५० ग्रॅम एमडी जप्त; जप्त केलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी रुपये

Apr 22, 2022  |  08:00 AM (IST)
जम्मूच्या सुंजवामध्ये सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक

जम्मूच्या सुंजवामध्ये सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू, एक जवान हुतात्मा आणि चार जवान जखमी

Apr 22, 2022  |  07:58 AM (IST)
हैदराबादमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दोघांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा

हैदराबादमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दोघांना प्रत्येकी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, दोघांकडून १३३५.४ किलो गांजा जप्त केला होता

Apr 22, 2022  |  07:52 AM (IST)
दिल्ली : जहांगीरपुरी मुद्यावर राजकारण तापण्याची शक्यता

दिल्ली : आज तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह आणखी काही पक्षांचे नेते जहांगीरपुरीचा दौरा करणार