LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 25 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Breaking News 25 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 25 April Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

Apr 25, 2022  |  06:40 PM (IST)
BREAKING : राणा दाम्पत्यांना कोर्टाचा दणका, FIR रद्द करण्याची याचिका फेटाळली

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा  यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात  सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. 

Apr 25, 2022  |  06:11 PM (IST)
शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन मंजूर

वैद्यकीय कारणांमुळे शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन मंजूर, किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी चार शिवसैनिकांना झाली होती अटक.

Apr 25, 2022  |  06:00 PM (IST)
किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी आज अटक केली. याच प्रकरणात शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल, हाजी आलम, शेखर वायगंणकर यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Apr 25, 2022  |  01:50 PM (IST)
हनुमान चालिसा वाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, फडणवीस आणि राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नाहीत

महाराष्ट्रात हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकरचा वाद थांबताना दिसत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये सतत शब्दयुद्ध सुरू असते. या प्रकरणाला अधिकच भर पडत असल्याचे पाहून महाराष्ट्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना सहभागी होण्याचे सांगण्यात आले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीपासून दूर राहणे पसंत केलं आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यात सहभागी होण्यास नकार दिला होता.

Apr 25, 2022  |  01:47 PM (IST)
भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटी रुपयांचे हेरॉईन
भारताने पाकिस्तानचा एक मोठा कट उधळून लावला.भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट अडवली. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
Apr 25, 2022  |  01:40 PM (IST)
राणा दाम्पत्यांची हायकोर्टात धाव, दाखल गुन्हा रद्द करण्याची केली मागणी

राणा दाम्पत्यांची हायकोर्टात धाव, दाखल गुन्हा रद्द करण्याची केली मागणी

Apr 25, 2022  |  01:37 PM (IST)
Mumbai News Live Updates : हनुमान चालीसा इथे नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची काय?- फडणवीस

हनुमान चालीसा इथे नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची काय?- फडणवीस