Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.
युरोपचे जे देश रुबलमध्ये पेमेंट करणार नाही त्यांचा गॅस पुरवठा थांबवू - रशिया
रुबलमध्ये पेमेट करण्यास नकार देणाऱ्या पोलंड बल्गेरियाचा गॅस पुरवठा रशियाने थांबविला
बिलावल भुत्तो झरदारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होणार, सूत्रांनी दिली माहिती
केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर महाराष्ट्रात सहा ते बारा वयोगटाचे लसीकरण सुरू होणार
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणार, कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविणार
मुलांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक - मोदी
पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, भाजपचा आरोप
भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले, अर्ध्या तासाच्या भेटीनंतर भाजपचे शिष्टमंडळ राजभवनातून आले बाहेर
गुंतवणूकदारांना LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकावेळी किमान १५ शेअर खरेदी करावे लागतील
LIC IPO लाँचिंग बाबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होणार
भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला रवाना, कायदा सुव्यवस्था तसेच पोलिसांकडून दिली जाणारी वागणूक, किरीट सोमय्यांवरील हल्ला, मोहित कंबोज भारतीय यांच्यावरील हल्ला, राणा दाम्पत्याला पोलिसांनी दिलेली वागणूक या मुद्यांवर राज्यपालांकडे निवदेन सादर करणार असल्याचे प्राथमिक वृत्त
भाभा रुग्णालयाने सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. त्यात सोमय्यांना जखम झाल्यावर रक्तस्त्राव झाला नसल्याचे, वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोमय्यांची वैद्यकीय तपासणी नंतर हा अहवाल समोर आला आहे.
येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची सौम्य लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
नवनीत राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार आहे.