LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 23 January Latest Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी : जाणून घ्या कुठे काय घडलं

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकतात.

 Daily News Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
फोटो सौजन्य:  Times Now
Daily News Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी .

Jan 23, 2022  |  10:06 PM (IST)
पाकिस्तानातील धुळीचे वादळ धडकले महाराष्ट्रात; मुंबई, पुण्यात गाड्यांवर पसरली धुळीची चादर
Jan 23, 2022  |  09:58 PM (IST)
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांना कोरोनाची लागण झाली आहे. नायडू सध्या हैद्राबादमध्ये असून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते एक आठवड्यासाठी आयसोलेट झाले आहेत. । उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरून दिली माहिती

Jan 23, 2022  |  08:36 PM (IST)
भाजपचे स्वप्न मोडून काढले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजपचे गुलामासारखे वागण्याचे स्वप्न मोडून काढले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Jan 23, 2022  |  08:32 PM (IST)
आम्ही भाजपला सोडले हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही भाजपला सोडले हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Jan 23, 2022  |  08:31 PM (IST)
दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न - - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी दिले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Jan 23, 2022  |  08:30 PM (IST)
दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी दिले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 

Jan 23, 2022  |  08:13 PM (IST)
उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद पाहा थेट प्रक्षेपण
Jan 23, 2022  |  07:42 PM (IST)
मुंबईत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे उद्घाटन
मुंबईत महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन
Jan 23, 2022  |  07:39 PM (IST)
भारतापुढे २८८ धावांचे आव्हान

भारतापुढे २८८ धावांचे आव्हान
द.आफ्रिका वि. भारत तिसरी वन डे मॅच
द. आफ्रिका ५० ओव्हरमध्ये सर्वबाद २८७ धावा
भारत १४ ओव्हरमध्ये १ बाद ७० धावा

Jan 23, 2022  |  07:35 PM (IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन
Jan 23, 2022  |  04:34 PM (IST)
Dust Strom : येत्या 12 तासात उत्तर कोकणात धुळीचे वारे, मुंबई-ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना इशारा

महाराष्ट्रात एक वेगळंच अस्मानी संकट घोंघावत आहे. येत्या 12 तासांत उत्तर कोकणात धुळीचे वारे (वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जाणवणार आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jan 23, 2022  |  03:53 PM (IST)
Netaji Awards : पी. व्ही. सिंधू, डॉ. राजम आणि टांक बुंद हनुमंतू यांना ‘नेताजी’ पुरस्कार प्रदान

नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या स्मरणार्थ एनजीओ जन ऊर्जा मंचने आयोजित केलेल्या ‘उद्घोष’ कार्यक्रमात जागतिक किर्तीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu), आर्चरी गर्ल (तिरंदाज) डॉली शिवानी, एनआयएमएसचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांना ‘नेताजी’ पुरस्काराने (Netaji Awards) सन्मानित करण्यात आले. 

Jan 23, 2022  |  03:42 PM (IST)
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने ओलांडला १६२ कोटींचा टप्पा

भारतात १ अब्ज ६२ कोटी १४ लाख ८४ हजार ५८६ कोरोना प्रतिबंधक लसचे डोस टोचण्यात आले. देशातील ९२ कोटी ९७ लाख ५ हजार ५ जणांना लसचा पहिला डोस तर ६८ कोटी ३९ लाख ९६ हजार ६७० जणांना लसचा दुसरा डोस टोचण्यात आला. देशातील ७७ लाख ८२ हजार ९११ जणांना प्रीकॉशनरी डोस अर्थात खबरदारीचा डोस टोचण्यात आला.

Jan 23, 2022  |  03:39 PM (IST)
पहिली आणि दुसरीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार
Jan 23, 2022  |  11:45 AM (IST)
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 33 हजार नवे कोरोनाबाधित

देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनारुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात कालच्या तुलनेत आज  कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 33 हजार 533 नवीन रुग्ण आढळले असून 525 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर 17.78 टक्के इतका झाला आहे. 
 

Jan 23, 2022  |  11:47 AM (IST)
Weather Forecast: मध्यरात्री राज्यातल्या काही भागात पावसाच्या सरी

मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये (Weather) सातत्याने बदल होत असल्याने राज्यातील(State) काही भागात कधी पावसाच्या (Rain) सरी तर कधी कडाक्याची थंडी (Cold) पडल्याचं चित्र आहे. मुंबई(Mumbai), पुणे(Pune) अशा मोठ्या शहरातही कधी हुडहुडी तर कधी ढगाळ वातावरण असं चित्र निर्माण झाले आहे.  सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा

Jan 23, 2022  |  11:48 AM (IST)
Indian Railway Todays Update: मध्य रेल्वेवर 14 तासांचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर (Central Railway) रविवारी (Sunday) आज पुन्हा एकदा 14 तासांचा मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येत आहे. हा मेगाब्लॉक ठाणे (Thane) आणि दिवा(Diva) दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर (Down fast lane) असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 20 मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.
 

Jan 23, 2022  |  11:49 AM (IST)
Under-19 World Cup IND Vs Uganda : भारताकडून युगांडाचा 326 धावांनी पराभव

वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) सुरू असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) भारताच्या अंडर 19 (India's Under-19) क्रिकेट संघ (Cricket team) धमाकेदार प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाने युगांडाचा (Uganda) 326 धावांनी दारुण पराभव करत भारताने सलग तिसरा विजय मिळवला आहे. या  विजयासह भारतीय संघाने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे.  सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.