Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
राज्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. परंतु कोविडची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचा अधिकार विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाला असेल.
मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात त्यानंतर परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या की ऑनलाईन याचा विचार स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं म्हटलं आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षांना जर काही गैरसमज झाला असेल तर मी पालकमंत्री म्हणून स्वत: भेटून मार्ग काढू नगरपंचायत निवडणुकीत वेगवेगळे लढलो असलो तरी महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे आपला विरोधक कोण आहे ते ओळखून महाविकास आघाडीत सामील व्हाव. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे राजकीय परिपक्व आहेत ते योग्य निर्णय घेतील. असे पालक मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार खेळाडू नीरज चोप्राला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले असून याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते 348 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
MUMBAI | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या सिल्व्हर ओक येथे आहेत. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने ते मजेत आहेत. ते सध्या त्यांना भरपूर आवडणारी गोष्ट म्हणजे वाचन.त्यामुळे पुस्तक वाचन करत आहेत.
मुंबई महपालिकेकडून चांगला निर्णय झाला आहे. विधान भवन येथे महिला पोलिस आणि पुरुष पोलिस यांच्या साठी कुठेच शौचालय नाहीये. तर विधान भवन येथे महिला पोलिस अधिकाऱ्यांसाठी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे माफियाराज सुरू- याविरोधात रस्त्यावर उतरणार.
बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सुरुवातीला आम्ही 2 वर्ष शांत बसलो होतो.
राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजा मुंडे म्हणाल्या
बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात मंत्रिपदाच्या नंबर वरून राजकारण तापलं होतं. आज पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.मी औकात नाही तर ताकद म्हटलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान मी केला नसून तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीय. मी माझ्या कामात कधीच भेदभाव केला नाही. मात्र आत्ताचे पालकमंत्री भेदभाव करतात, तर टोल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ही द्यावा. आणि इतर कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो असं म्हणत पंकजा मुंडे आक्रमक झाल्या होत्या. आज केज नगर पंचायतीच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.
जनाब संजय राऊत, तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगीर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं, कारण आपल्या सारखा ‘खुशामतगीर’ कदाचित परत होणे नाही. त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही.. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदिर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे. असो, महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही लिहित चला.
वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात.
यवतमाळ : नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाष चंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. सरसंघचालक हेडगेवार यांनी1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला.
आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पाश्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सरसंघचालक हेडगेवार यांच्यावर बोलण्यापूर्वी ऊर्जा मंत्री राऊत यांनी अभ्यास करावा, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे. ऊर्जा मंत्री देखील नागपूर येथील रहिवासी आहे.
मुळात काँग्रेस पक्षाने देशाला खरा इतिहास माहिती होऊ दिला नाही, अशी टीका करीत भुतडा यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची निंदा केली आहे.
यवतमाळ : नाशिक येथे सरसंघचालक हेडगेवार हे मुक्कामी होते. सुभाष चंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला पाठवले. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला.
यांनीच जाती जातीत भांडण तंटे उभे केले आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, या बद्दल चिंता व्यक्त केली. सरसंघचालक हेडगेवार यांनी 1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला.
आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पाश्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
खऱ्या अर्थाने संस्कृतीचा विसर पडलाय, सत्ते साठी लाचारी म्हणजे काय करावं लागत? या उद्धव यांच्या शिवसेनेनं उत्तर देणं गरजेचं आहे. टिपू सुलतान यांच्या नावाने त्या ठिकाणी वास्तू उभी राहत आहे. आणि ही वास्तू तो मंत्री उभा करतं आहे ज्याने याकूब मेमन च समर्थन केेले. आता संजय राऊत तुमची बोबडी का वळली? आता भूमिका घ्या, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
१९९२ आणि १९९३ मधल्या दंगलीत आणि बॉम्ब स्फोट घडवला. त्या याकूब मेमनला फाशी नको. असा म्हणणारा मंत्री हा ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळात का आहे. सर्जील उस्मानी भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरू फाशी दिली त्याची बरसी मनवतो. त्या सर्जिल उस्मानी बरोबर समर्थन करणारे मंत्री हे उद्धवजी तुमच्या मंत्री मंडळात का आहेत? राम वर्गणीची थट्टा तुमचे प्रवक्ते का करतात? जय श्री राम ला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी तुम्हाला नेत्या का वाटतं आहेत.असे मत आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोलापूर : आमची भूमिका तीच जी नाना पाटोलेंची आहे, नाना पटोले यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलंय, ते वक्तव्य भाजप विरोधात आहे त्यामुळं ते विरोध करणारच अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंच्या वक्तव्यावर आय लव्ह सोलापूर सेल्फी पॉईंटच्या उदघाटनाप्रसंगी दिली प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया.
मुंबई:- दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं.
हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे, असं सांगतानाच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
काल संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. त्याला भाजप नेत्या पूनम महाजन यांनी आक्षेप घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.
बीडच्या बस स्थानक परिसरातील एका टपरी चालकाला, भांडणात मध्यस्थी केल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. भाच्याच्या हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवण्यासाठी किशोर गुरखुदे गेले होते. आणि याच दरम्यान गुरखुदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव बसला, यात ते गंभीररित्या जखमी झाले.
सहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. तर आणखी दोघे जण फरार आहेत.
किशोर गुरखुदे यांच्या भाच्याच्या हॉटेलातून एका ग्राहकाची दुचाकी गहाळ झाली आणि यातून हॉटेल चालक आणि ग्राहकात वाद झाला होता. हेच भांडण सोडविण्यासाठी गुरखुदे गेले असता सदरील घटना घडून गुरखुदे यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कल्याण महात्मा फुले पोलिसांनी गेल्या आठवडाभरात चैन मोबाईल स्नेचिंग, बाईक चोरी, बॅग लिफ्टिंग अशा तब्बल 24 गुन्ह्यांची उकल करत सहा आरोपी चोरट्याना अटक केली. या आरोपीमध्ये दोन महिलाचा समावेश आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी 20 तोळे सोने ,दोन मोबाईल फोन, 9 दुचाक्या असा मिळून तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण परिसरात चैन मोबाईल स्नेचिंग ,बाईक चोरी,बॅग लिफ्टिंगच्या घटना वाढल्या होत्या. हे गुन्हे रोखण्यासाठी गुन्ह्यांना आळा घालन्यासाठी आरोपींना अटक करण्यासाठी कल्याण महात्मा पोलिसांच्या पथकाने जंग जंग पछाडले होते.
मागील आठवडाभरात कल्याण महात्मा फुले पोलीसांच्या पथकाने तब्बल 23 गुन्हे उघडकीस आले आहे.
बॅग लिफ्टिंग प्रकरणी आरती पाटील , शालिनी पवार या दोघींना अटक केलीं आहे त्यांच्याकडून 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली .
महाविकासआघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं सातत्याने समोर आणत निशाणा साधणारे भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या वादात अडकले आहेत. किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्याचा कथित फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजप नेता गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. गंभीरने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. 40 वर्षीय गंभीरला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने चाचाणी केली.सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी कोरोना चाचाणी केली. माझी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा. असे ट्विट गंभीरने केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर निर्माण झालेला दहशतवादी धोका लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. विजय चौक ते लाल किल्ला या परेड मार्गाचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी सुमारे ३० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज संध्याकाळी देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत.
देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानुसार मागच्या काही दिवसांमध्ये रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास साडेतीन लाखांवर जाऊन पोहोचली होती. या नव्या रुग्णांच्या संख्येत आता कमालीची घट झाली आहे. काल दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 नवे रुग्ण आढळून आले आहे.