Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
Breaking News Latest Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी.
खारघर मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली प्रोटॉन थेअरी उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हा उपचार परदेशात कॅन्सरवर प्रोटॉन पध्दतीनं करण्यास मोठा खर्च येतो. पण आता हेच उपचार गरिबांसाठी मोफत करण्याची सुविधा टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडून उभारण्यात आली आहे. आयबीए कंपनीकडून ही यंत्रणा बसविण्यात आली असून यासाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
अशी माहिती आयबीए कंपनीचे संचालक पाठक यांनी दिली. काही दिवसात उपचार सुरू होणार आहेत.
भिवंडी तालुल्यातील टेंभिवली गावात वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर ( ट्रक ) मधून खाली करत असतांना ट्रकचा शॉकऑब्जर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या गवताच्या घरावर कोसळला आणि संपूर्ण कोळसा घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले.घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी तात्काळ कोळश्याच्या ढिगा-याखालुन सर्वांना बाहेर काढले.मात्र या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महिनाभरात विजेच्या समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू आमदार गिरीश महाजन.
रब्बी हंगामावर वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी राजा संकटात आला असून शासनाने महिनाभराच्या आत विजेच्या समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू व अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी तर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना आमदार गिरीश महाजन यांनी दिला आहे.
वीज वितरण चा विविध मागण्यासाठी आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित भव्य मोर्चा काढून तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे येणाऱ्या काळात जर शासनाने दखल घेतली नाही तर जिल्हास्तरावर भव्य मोर्चा काढू व तीव्र आंदोलन छेडू असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला असून यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर भाजपा जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल नगराध्यक्ष सौ साधना महाजन जि प सदस्य अमित देशमुख पंचायत समिती सभापती जलाल तडवी माजी जि प अध्यक्ष दिलीप खोडपे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील भाजपा गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक महेंद्र बाविस्कर रमेश नाईक विलास पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक शेतकरी व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या याकूब मेमन ला सोडविण्याची ज्याने मागणी केली त्या अस्लम शेख कडून आणखी काय अपेक्षा असणार त्यांच्याकडून टिपू सुलतान नाव देणे हे अपेक्षितच होतं परंतु शिवसेनेसारख्या पक्षाला सुद्धा विसर पडला आहे की मुंबई बॉम्ब ब्लास्ट मध्ये असलेला आरोपी याकूब मेमन त्याला वाचविण्यासाठी अस्लम शेख यांनी प्रयत्न केले त्यांनाच आपल्या मंत्रिमंडळात मंत्री बनवलं. त्यांना मुंबईचे पालकमंत्री बनवलं. महापौरांचा विरोध हा वायफळ आहे जे मंत्री आता टिपू सुलतानची वकिली करत आहेत ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर वकिली करत आहेत हे मुंबईकर बघत आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं अशी प्रतिक्रिया भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. पुण्यात देखील कोरोनाचा विळखा वाढत आहे. आता पुण्याचे महापौरी मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना यापूर्वीही एकदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. सोशल मीडियावर त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार इटका दिला आहे. मालेगाव महानगरपालिकेतील महापौर ताहिरा शेखसह काँग्रेसची 27 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत 27 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
रेल्वे भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप करत बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले होते. या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हिंसक वळण लागले. आंदोलनकर्ते संतप्त विद्यार्थ्यांनी गया येथे ट्रेनचे इंजिनच पेटवून दिले होते. याप्रकरणी आता एकूण 400 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यात प्रसिद्ध यूट्यूबर खान सर यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील (Maharashtra State) अनेक भागातील कमाल तापमानात (Temperature) मोठी घट बघायला मिळाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
CBSE टर्म 2 तारीख पत्रक 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE इयत्ता 10, 12 टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022 लवकरच अपडेट केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 बोर्ड परीक्षा 2022 मार्च-एप्रिलमध्ये होण्याची अपेक्षा आहे.